मुलतानी माती हि अनेक वर्षपासून सौंदर्यासाठी वापरण्यात येते. याचे मोठे खडे उगाळून किंवा हल्ली त्याची पावडर देखील मिळते ती माती फेसपॅकसारखी लावता येते. या मातीतील घटकामुळे त्वचेवरील पुटकुळ्यामुळे पडलेले डाग तसेच वांग कमी होण्यास मदत होते. तसेचजर त्वचा तेलकट असेल तर त्वचेचा तेलकटपणा कमी करायला देखील उपयुक्त ठरते. हि माती फिकट पिवळसर रंगांची असते. या मातीचे त्वचेच्या प्रकारानुसार मातीचे सौंदर्यविषयक उपयोग आणि फायदे जाणून घेऊ
तेलकट त्वचेसाठी
ज्यांची त्वचा तेलकट आहे या त्यांच्यासाठी मुलतानी माती ही वरदान आहे. या प्रकारची त्वचा असणाऱ्यांनी मुलतानी माती गुलाबपाणी, तुळशीची पाने किंवा रस गुलाबपाणी आणि एक चिमटी हळद हे एकत्र करून त्यात पेस्ट होईल इतकं पाणी घालून पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट चेहऱ्याला लावावी आणि वाळल्यानंतर लगेच धुवून टाकावे.यामुळे चेहऱ्याचा तेलकटपणा कमी होतो आणि चेहऱ्याला नवीन तजेला मिळतो. हा पाक १५ दिवसातून एकदा लावावा.
माध्यम प्रकारची त्वचा
ना तेलकट ना कोरडी अश्या माध्यम प्रकारच्या त्वचेसाठी या मातीत दूध आणि बदामाची थोडी पूड किंवा बदाम उगाळून मातीत मिक्स करून पॅक करावा. या प्रकारच्या पॅकमुळे दूध आणि बदामामुळे त्वचेतील स्निग्धता राखली जाते आणि मुलतानी मातीमुळे त्वचा तेलकट होत नाही दोन्ही गोष्टींचा समतोल राखला जातो.
कोरड्या त्वचेसाठी
या मातीमध्ये बदाम आणि दुधाचे प्रमाण जास्त घालावे तसचे दूध ऐवजी साय घातल्यास उत्तम तसेच एक चिमूट चंदन पावडर घालावी यामुळे त्वचेतील रुक्षता कमी होऊन त्वचा तुकतुकीत होईल.
त्वचेवरील डागांसाठी पॅक
अनेकदा पुटकुळ्या येऊन गेल्यावर त्याचे डाग चेहऱ्यावर तसेच राहतात आणि हे डाग सौंदयमध्ये बाधा आणतात अश्यावेळी मुलतानी मातीमध्ये टोमॅटोचं रस चंदन पावडर मिक्स करावे आणि पॅक तयार करावा आणि चेहऱ्याला लावावा.त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होईल
पुटकुळ्या आणि काळी वर्तुळे
तारुण्यपिटिका आणि पुयुक्त पुटकुळ्या येत असतील तर पोटात औषधे घेणे आवश्यक असते. तसेच अश्या त्वचेसाठी आणि पुटकुळ्यासाठी या मातीत कडूनिंब रस किंवा पावडर घालवे तसेच गुलाबपाणी घालावे आणि हा पॅक चेहऱ्या वर लावावा. तसेच जागरण, कॉम्प्युटर काम किंवा मानसिक ताण यामुळे डोळ्याखाली वर्तुळे आल्यास या मातीमध्ये दही पुदिना आणि गुलाबपाणी घालून गालावर डोळ्यांपासून लांब पण डोळ्यांजवळ हा पॅक लावावा.
खूप कोरडी त्वचा असणाऱ्यांनी नुड्त्या मुलतानी मातीचा लेप लावू नये थंडीत या मातीचा लेप कमी वेळा वापरावा.... लेप वळला कि लगेच धुवावा...हे लेप महिन्यातून दोनदा किंवा तीनदा लावावे.
