Link copied!
Sign in / Sign up
11
Shares

मुलींशी मासिक पाळीबाबत कधी बोलाल

        भारतामध्ये मासिक पाळी नेहमीच निषिद्ध विषय ठरत आलेला आहे. अनेक वर्षांपासून जसजसा सोशल मीडियाचा प्रसार झालाय; तसेतसे लोक सामाजिक समस्यांबाबत भरपूर जागरूक आणि मनमोकळे होऊ लागले आहेत. आपण आजकाल सामाजिक रूढी आणि अन्यायकारक प्रथांना नष्ट करण्यासाठी अनेक लोकांना पुढाकार घेताना पाहतो. मासिक पाळी हा असाच एक विषय आहे; जो भरपूर घरांमध्ये मोकळेपणाने चर्चिला जात नाही.

घरी इंटरनेट आपल्या मुलांना हवी ती माहिती पुरवत असले; तरी आपण काही गोष्टींविषयी त्यांच्याशी बोलणे, हे त्यांनी त्याच गोष्टी चुकीच्या पद्धतीने जाणून घेण्यापेक्षा केव्हाही चांगले! बहुतांशी पालक दीर्घ काळापर्यंत या विषयी बोलणे टाळतात आणि खूप वेळा मुली या गोष्टी बाह्य जगातून जाणून घेतात.

तुम्हाला सुरुवात करण्यासाठी येथे काही टिप्स दिलेल्या आहेत:

१. योग्य वेळ 

बहुतेक मुलींची मासिक पाळी बारा ते तेरा  वर्षे वय असताना सुरू होते. या अगोदरच त्यांच्याशी पाळीबाबत बोलणे हे महत्त्वाचे आहे, म्हणजे तुम्ही जी माहिती सांगत आहात; त्यावर विचार करायला आणि मानसिक तयारी करायला त्यांना वेळ मिळेल. काही पालकांना असे वाटते की, त्यांच्या मुली अशी बोलणी करायला खुप लहान आहेत; आणि कालांतराने त्यांना कळून चुकते की याला खूप उशीर झालेला आहे! असे होणार नाही ना, याचे भान ठेवा. तसेच तुम्ही तुमच्या मुलींना नेमके काय सांगणार आहात, याचे नियोजन करणे गरजेचे आहे. तुम्ही त्यांना घाबरवून सोडणे अपेक्षित नाही; पण तसेच तुम्ही सगळी जरुरीची माहिती त्यातील महत्त्वाच्या घटकांसह सांगणे गरजेचे आहे.

२. बोलणे सकारात्मक आणि खुले ठेवा

ही अतिशय मोठी घटना असल्यासारखे भासवू नका; नाहीतर तुम्ही प्रत्यक्ष बोलण्या अगोदरच तुमच्या मुलींना भयभीत करून टाकाल. ते अनौपचारिक आणि संवादात्मक ठेवा. काही गोष्टी त्यांना थोड्या थोड्या अंतराने सांगायचा प्रयत्न करा; म्हणजे सुरुवातीला तुमच्या मुलीला थोडीफार कल्पना येऊ लागेल. मासिकपाळी ही अतिशय भीतीदायक गोष्ट ठरू शकते; म्हणून काही तथ्ये सांगताना शक्य तितके सकारात्मक राहा. काही वेळा विशिष्ट गोष्टी स्पष्टपणे सांगणे अवघड ठरु शकते. अशा वेळी तुम्ही गोष्टी चांगल्या प्रकारे समजावून सांगण्यासाठी जवळपासच्या वाचनालयाला भेट देऊ शकता किंवा इंटरनेटचा वापर करू शकता.

एकदा तुम्ही माहिती द्यायला चालू केली; मग तुमच्या मुलींनाही त्याबद्दल आणखी जाणून घ्यावेसे वाटेल. त्या काही बावळट प्रश्न विचारू शकतात; पण तुमचा संयम ढासळू देऊ नका आणि सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे द्या.

मासिकपाळी चालू झाल्यानंतर हे  समजावून सांगावे. 

तुम्हाला तुमच्या मुलींबरोबर फक्त पाळी येण्याअगोदरच बोलायचे असते असे नव्हे; तर त्यानंतरही त्याविषयी नियमितपणे बोलायचे असते. फक्त त्याविषयी बोलणे आणि खरोखर त्याचा अनुभव घेणे या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. शांत आणि समंजस राहा; त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करा. पाळी येताना त्यांच्यात होणारे शारीरिक बदल आणि लक्षणे यांबद्दल चर्चा करा.

हे सर्व करतच आहात; तर तुम्ही याचाच आधार घेऊन मासिक पाळीचा जीवनाच्या इतर बाजूंशी- जसे की गरोदरपणा आणि जन्म यांच्याशी कसा संबंध आहे, हे देखील सांगू शकता. तुमच्या मुली आता नवीन माहिती जाणून घेण्यासाठी सज्ञान झाल्याच आहेत; तर त्यांच्याशी समागमाविषयी बोलणे देखील एक चांगली कल्पना आहे. फक्त तुम्ही त्यांना कोणत्याही परिस्थितीत योग्य वेळी योग्य माहिती देत आहात ना आणि त्यांना घाबरवत नाही ना; याची खबरदारी घ्या.

बंगळुरूच्या मॉमसाठी, खुशखबर .

टाईनी स्टेप नैसर्गिक घटक असणारे  फ्लोर क्लीनर लॉन्च करत आहे जे आपल्यासाठी, आपल्या बाळाला आणि आपल्या घरासाठी सुरक्षित आहे. तर मग आता  जंतू आणि रसायनयुक्त फ्लोर क्लीनर नाही म्हणा! प्रीलाँच ऑफरचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा. 
http://bit.ly/tinystep-blogs

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon