Link copied!
Sign in / Sign up
17
Shares

मुली आणि स्त्रीने स्वतःची स्वच्छता कशी ठेवायची त्याविषयी. . .


स्वतःच्या स्वच्छतेविषयी सजग राहणे खूप महत्वाचे आहे. कारण त्यातून तुमचे आरोग्य चांगले राहतेच पण तुम्हाला उत्साह व आत्मविश्वास भरल्या सारखा वाटतो. म्हणून काही स्त्रिया व मुली ह्या खूप नीटनेटक्या राहतात. नीटनेटके राहणे ह्याचा अर्थ म्हणजे काही खूप मेक अप करणे नव्हे. तेव्हा ह्या ब्लॉगमधून तुम्हाला स्वतःची स्वच्छता कशी करता येईल त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल त्याविषयी.

१) स्त्रीच्या स्वच्छतेविषयी

* घरातील बायकांनी एकमेकीचे पाळीचे कपडे न वापरणे .

* मासिक पाळीचे कपडे साबणाने स्वच्छ धुवून उन्हात वाळत टाकावेत.

* मासिक पाळीच्या वेळी रोज आंघोळ करावी.

* अंघोळीच्या वेळी मायांग सुद्धा स्वच्छ धुवावे.

* मायांग स्वच्छ कपड्याने व्यवस्थित कोरडे करावे.

* पाळीचे घ्यायचे कपडे दिवसातून २-३ वेळा तरी बदलावेत.

* संडासला जाऊन आल्यानंतर जागा पुढून मागे धुवावी.

* मायांगाचा बाहेरील भाग स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.

शक्य असल्यास पाळी पूर्ण बंद झाल्यानंतर सर्व कपडे स्वच्छ धुवून डेटोलच्या पाण्यात भिजत ठेवून स्वच्छ कडक उन्हात वाळवून पुढच्या वेळी वापरण्याकरिता घडया करून ठेवाव्यात.

2) शरीराची चांगली काळजी घेण्यासाठी

* वयात आल्यानंतर, घामाचे प्रमाण वाढते. अंघोळ केल्याने स्वच्छता राखता येते आणि सुगंध चांगला येतो.

* दात किडणे टाळण्यासाठी आणि चांगला श्वास राखण्याकरिता दिवसातून दोनवेळा दात स्वच्छ करा.

* तैलग्रंथी सीबम (एक तेलकट द्राव) अधिक प्रमाणात निर्माण करु लागल्यानं, तारुण्यपिटीका तयार होतात. कुमारवयात तारुण्यपिटीका होणे ही नैसर्गिक प्रक्रीया आहे त्यांना पूर्णतः टाळण्याचा कोणताही मार्ग नाही. त्वचा स्वच्छ ठेवणे हाच त्यावरील सर्वोत्तम उपाय आहे.

* पोषक आहार आवश्यक आहे. अतिशय गोड पदार्थ आणि तळलेले पदार्थ खाणे टाळावे.

* चांगल्या आरोग्यासाठी आणि सुदृढ मनासाठी डोकं शांत ठेवणं आणि सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे.

३) मनाची स्वच्छता

मनाची स्वच्छता करण्यासाठी फक्त मन शुद्ध हवे. आणि जर तुम्हाला मनाला शुद्ध करायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीविषयी मनात चांगलाच विचार आणावा. कुणाचेही भले होईल असेच चिंतन करायचे.

* जमलेस तर सकाळी उठून प्रार्थना करावी. प्रार्थना म्हणजे काही कर्मकांड नाही.

* ध्यान जर तुम्हाला जमत असेल तर ते करावे.

* आणि तुमच्याकडे असलेल्या गोष्टी इतर गरजू लोकांना देऊन मदत करावी. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon