Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

मुलगा जन्माला घालण्याचा दबाव कसा हाताळाल

आज काळ कितीही बदलला, व तरी अजूनही काही कुटुंबांमध्ये मुलाच्याच जन्माची आतुरतेने वाट पाहिली जाते. प्रत्येक कुटुंबापरत्वे ही कारणे विविध आहेत. स्त्रियांना कोणत्या प्रकारची शारीरिक हानी न पोहचवता भावनिक दबाव टाकून मुलगा हवा हे मनावर बिंबवण्यात येते.  या सर्व गोष्टींचा तुमच्या गर्भारपणावर येणारा ताण घालविण्यासाठी गर्भवती मातेने नेहमी शांत आणि सकारात्मक राहणे आवश्यक असते. हा दबाव कसा हाताळला व कोणत्या गोष्टी पासून स्वतःला दूर ठेवा हे सांगणार आहोत. 

१. स्वतः खंबीर राहा आणि पतीला विश्वासात घ्या. 

तुम्ही जेव्हा खंबीर असता आणि पती तुमच्या साथीला असतो त्यावेळी तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असते. आताच्या जगात सुद्धा या गोष्टीना सामोरं जाणे हि एक लाजिरवाणी गोष्ट आहे. परंतु हे तुम्ही स्वतः खंबीर असणे या काळात अत्यंत गरजेचे असते. 

२.तथ्ये जाणून घ्या. 

वास्तविकपणे बाळाचे लिंग हे आईवर अवलंबून नसते. शास्त्रानुसार, बाळाचे लिंग हे पतीच्या शुक्राणूवर अवलंबून असते. गुणसूत्र आणि अनुवंशिकतेनुसार पुरुषांमध्ये एक्स वाय आणि महिलांमध्ये एक्सएक्स अशी गुणसूत्रांची जोडी असते. जर शुक्राणू वाय अंड्याशी जोडला गेला तर मुलगा होतो. जर शुक्राणू एक्स अंड्याशी जोडला गेला तर मुलगी होते. मुलभूतपणे तुमच्या बाळाचे लिंग हे पतीवर अवलंबून असते त्यामुळे, होणारे बाळ मुलगा असेल हे तुमच्यावर फक्त ५० टक्केच अवलंबून असते.

३.बुवाबाजीपासून दूर रहा. 

गर्भधारणे दरम्यान गर्भ वाढत असताना गर्भाचेलिंग बदलासाठी काही बनावट वैद्य आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली औषधे देतअसल्याचे तुम्ही ऐकले असेल. अशा खोट्या भूलथापांना तुम्ही बळी पडू नये. तांत्रिक आणि त्यांचे डावपेच असे चमत्कार घडवू शकतील अशा बाता तुम्हाला ऐकायला  मिळतील. एका संशोधनानुसार,‘भारतात अशा अनेक घटना घडत आहेत की, मुलाच्या लोभापायी, वारसापोटी आंधळेपणाने अशा बुवाबाजीवर विश्वास ठेवतात. अश्या व्यक्तीच्या औषधे अंगारे यामुळे  तुमच्या आणि तुमच्या पोटातील बाळाला हानी पोहचण्याची शक्यता असते. अनेक महिला घरातील दबावाला, मुलाचा हव्यास या हट्टाला बळी पडून काहीतरी गोळ्या घेतात. या गोळ्यांमुळे तुमच्या गर्भातील बाळाला खरोखरच काही अपंगत्व निर्माण होऊ शकते. 

४. हे करू नका.
 

दबावाला कंटाळून तुम्ही पर्याय शोधायला लागता आणि यात इंटरनेटची मदत घेता आणि  इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या हजारो कल्पनांमध्ये मुलगा जन्माला येण्यासाठी तुमच्या जीवशैली आणि आहारात काय बदल करावेत अशा भ्रामक कल्पनांची देखील भर पडली आहे. सुदैवाने या सर्व घटकांचे वैद्यकीय पुरावे नाहीत. तुमच्या बाळाचे लिंग हे सर्वस्वी शुक्राणूंवर अवलंबून असते.

५. दबावाला बळी पडू नका

लिंग जाणून घेण्याचा हट्ट धरणार्यांना त्यां एकच सांगा की, शांत रहा आणि वाट बघा. कुतुहलाने ज्या पध्दतीने बाळाचे लिंग  जाणणे हे कायदेशीररित्या देखील चुकीचेआहे. घरातील सदस्यांना याविषयी कुतुहल असणे हे स्वाभाविक आहे. बाळाचे लिंग निदान करण्यासाठी ते तुमच्यावर दबाव आणू शकतात आणि वारंवार डॉक्टरांना भेटूनलिंग निदान करायला सांगतील. हे निदान केल्यानंतर ते त्यांना हवे तसे नसेल तर त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी ते कोणत्याही पातळीलाउतरू शकतात. आपल्या देशात असे अजूनही घडते आहे ही अत्यंत खेदाची,बाब आहे. भारतात काही राज्यात अजूनही काही राज्यात स्त्री-पुरुष गुणोत्तर असंतुलित आहे.

५. विश्वासू व्यक्तीशी बोला.

एकीकडे मुलगा जन्माला येण्याचा ताण आणि एकीकडे गर्भारपणामुळे बदलणारे मूड या दोन्ही परिस्थिती कशा हाताळायच्या हे समजत नाही. अशावेळी तुमच्या जवळच्या मुख्य म्हणजे विश्वासू व्यक्तीशी बोला ज्या तुमची परिस्थिती माहित आहे qकवा तो तुम्हाला समजून घेऊ शकतो.

६. आरोग्यदायी बाळ हेच तुमचे प्राधान्य असले पाहिजे.

तुम्हाला मुलगा होणार की, मुलगी हे खरंच तितके महत्वाचे आहे का? सरतेशेवटी आपल्याला काय हवे असते. एक गोंडस,हसरे बाळ जे तुमच्याकडे अतीव प्रेमानी आणि आशेनी त्याच्या छोट्या किलकिल्या डोळ्यांनी बघत असते

महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा,भारतीय दंडविधानानुसार १९९४ मध्ये केलेल्या कायद्यानुसार जन्मापूर्वीच बाळाचे लिंगनिदान करून घेणे हा गुन्हा आहे. सोनोग्राफीदरम्यान तुम्हाला एक अर्जावर सही करण्यास सांगितले जाते की, डॉक्टर कोणत्याही पध्दतीने डॉक्टर बाळाच्या लिंगबाबतमाहिती उघड करू शकत नाहीत.

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon