Link copied!
Sign in / Sign up
58
Shares

मुले प्रत्येक गोष्ट तोंडात का घालतात ?/माऊथिंग

त्याचा/तिचे आवडतं खेळणं,आवडतं गोष्टीचं पुस्तक,पांघरुणाचा धागा जे काही मिळेल ते सगळं बाळ तोंडात घालत असत, फरशीवर पडलेले काहीही ते तोंडात घालत असतं.त्याला त्याची चव समजत असते का ?का त्याला चावायला आवडत असतं असा का करत असते हा विचार मात्र आईच्या डोक्यात येत असतो पण बाळ असं का करतं हे मात्र कळत नाही, तर आपण हेच जाणून घेणार आहोत की बाळ प्रत्येक गोष्ट तोंडात का घालत असतं

माऊथिंग म्हणजे काय ?

माऊथिंग म्हणजे बाळ कोणतीतरी सतत कोणती तरी वस्तू ओढत आणि ती तोंडात घालते याला माऊथिंग म्हणतात आणि ही गोष्ट कोणतंही असू शकते एखादा विशिष्ट वास किंवा चव आवडते म्हणून ती वस्तू बाळ तोंडात घालत नाही तर त्याला असं काही कारण नसतं याचा

बाळा प्रत्येक गोष्ट तोंडात का घालते

मानवी शरीरत अनेक संवेदनशील अवयव असतात . ज्ञानेंद्रिये असतात. लहान मुलांमध्ये सुरवातीची काही महिन्यामध्ये मोटार स्किलची म्हणजे त्याच्या हातचे स्नायू किंवा हात आणि अवयवाचा एखादी कृती करताना समन्वय कसा साधायचा याबाबतीतील कौशल्याची त्याच्यात कमतरता असते. त्यांना त्यांची बोटे हात यांचा वापर कसा कसा करायचा याची क्षमता त्याच्यात आलेली नसते. सात महिन्याचे होईपर्यंत बाळाला योग्य पद्धतीने आणि अंदाजाने वस्तूला फटका मारणे अंदाजाने वस्तू पकडणे किंवा ढकलणे हे कौशल्य आलेले नसते.परंतु लहान मुलांचे तोंड हे तो पर्यंत प्रभावीपणे कार्यरत झालेले असते. त्यामुळे बाळ दिसेल ती वस्तू हाताला लागेल ती वस्तू तोंडात घालत असते. साधारणतः १० महिन्यापर्यंत बाळ हातांचा वापर मोठ्या प्रमाणात करू लागते

या काळात घ्यायची काळजी

· बाळ जर काही वस्तू तोंडात घालताना दिसले तर त्याला ओरडू नका त्यामुळे ते घाबरून जाईल आणि त्याचा परिणाम पुढे कोणतीही गोष्ट करताना घाबरेल.

· बाळाला ज्यावेळी खाली सोडाल त्याआधी बाळाला इजा पोहोचवणाऱ्या वस्तू उचलून ठेवा

· विषारी द्रव्ये किंवा औषधें, साबण मी नेलपेंट अश्या गोष्टी बाळाचा हात पोहचणार नाही अश्या ठिकाणी ठेवा

·घरात झाडे असतील तर ती देखील नीट तपासात राहा किंवा बाळाला त्यापासून दूर ठेवा कारण झाडाची पाने अतोन्डात घातली तर त्यावेळी त्यावर फवारलेली औषध बाळाच्या पोटात जाण्याची शक्यता असते

· बटन, सोंगट्या, झाकणे अश्या बाळाच्या घश्यात अडकणाऱ्या गोष्टी उचलून ठेवा

माऊथिंगचे फायदे

१. आसपासच्या जग बद्दल माहिती घेण्याचा मार्ग

नवजात बाळाची प्रत्येक गोष्ट तोंडात घालण्याची सवय त्यांना त्याच्या आसपास असणाऱ्या वातावरण विषयी माहिती देत असते जसे स्पर्श कडक -मऊ गोष्टी पण या गोष्टी तुम्ही नीट पारखून आसपास ठेवाव्या

२.स्वच्छतेबाबतचा अभ्यास

त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सूक्ष्म धूळ-धूलिकण यामुळे बाळाची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. परंतु बाळाचे हे उदयोग चालू असताना कोणीतरी मोठ्याने आसपास असणे अपश्यक असते

३.तोंडाच्या स्नायूंचे कौशल्य वाढण्यास मदत

प्रत्येक गोष्ट तोंडात घालण्यामुळे चावणे ओठांची हालचाल,जिभेचा वापर,जबड्याच्या स्नायूंचा वापर अश्या तोंडाच्या विविध कौशल्य विकसित होण्यास मदत होते. हात तोंडाचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात येतो. याचा उपयोग त्यांना पुढे स्वतःच्या हाताने खाताना होतो

४. संवेदना विकसित होतात 

वस्तूचे पोत, त्याबाबतच्या संवेदनचे म्हणजे ही गोष्ट तोंडात घेतली कि टोचते हि गोष्ट मऊ आहे या संवेदना विकसित व्हायला लागतात

५. मुलं शांत होतात. त्यांची चिडचिड कमी होते.

माऊथिंग वस्तू तोंडात घातल्याने मुलं स्वतःहून शांत होतात. त्यांची चिडचिड कमी होते.

बाळाने वस्तू तोंडात घालण्याचे फायदे जरी असले तरी गोष्टी तोंडात घालताना आजकाल बाळाला तोंडात घालण्यासाठी काही खास खेळणी मिळतात ती किंवा आसपासची स्वच्छ निर्जंतुक वस्तू असू द्याव्या निर्जंतुक करतांना जर काही औषध वापरलं असेल तर ते पूर्ण निघालं आहे ना याची काळजी घ्यावी. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon