Link copied!
Sign in / Sign up
17
Shares

मुलं एकदम हिंसक का होतात ?


भरपूर वेळा आपल्याला आपल्या बाळांमध्ये अधीरेपणाची आणि संतापाची भावना निदर्शनास येते. बहुतेकजण याला हट्टीपणाचे वा बालिशपणाचे नाव देतात. तरीही कधीकधी हे अधिक प्रमाणात उफाळून येते. हे तुमचे बाळ अधिक रागीट बनत चालले आहे, याचे लक्षण असू शकते. पण वास्तवात तसेच आहे का? आणि असल्यास ते का बरे होत आहे?

पालक म्हणून तुम्ही अशा काही गोष्टी करत असाल, ज्यांचा तुमच्या मुलांवर नकारात्मक प्रभाव पडतो. प्रथम अशा गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊ. 

१) काही करण्यापासून थांबवणे

जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला त्यांनी जी गोष्ट करू नये, ती करण्यापासून थांबवता; तेव्हा त्यांना वाटू शकते की, तुम्ही त्यांचे ऐकूनच घेत नाहीय आणि त्यांच्यासाठी कोणतीही मदत उपलब्ध नाहीय. हे त्यांच्या निराशा आणि चिंतेचे कारण बनू शकते; जे नंतर रागामध्ये परावर्तित होते.

२) चिडवणे

खूप वेळा तुम्ही तुमच्या बाळाभोवती त्याला चिडवत वा त्याची नक्कल करत खेळत असता. जरी हे सर्व गंमत आणि खेळ म्हणून चाललेले असते; तरी कधीकधी त्यांना राग येतो आणि त्यांना वाटते की, तुम्ही त्यांची कदर वा किंमत करत नाही. हे निराशा, संताप आणि नंतर नकारात्मक परिणामाकडे झुकू शकते.

३) नकारार्थी वाक्ये

भरपूर नकारार्थी वाक्ये वापरणे- जसे की 'हे करू नको' आणि 'तुझे हे वागणे वाईट आहे'! हे खूप वेळा तुमच्या बाळाच्या आत्मजाणिवेला हानी पोहचवते. हे त्यांच्यात नकारात्मक दृष्टिकोन निर्माण करते; जे नंतर तुम्हाला तुमच्या बाळाला सांभाळणे अवघड करून टाकते.

४) आज्ञा देणे

जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला काय करायचे ते सांगता; तेव्हा त्यांना त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे, असे वाटू शकते. हे त्यांना चिंताग्रस्त करते आणि ते शक्तिहीन आहेत, असे त्यांना वाटू लागते. यामुळे ते ही भावना आक्रमकपणात आणि संतापात व्यक्त करू लागतात.

५) पण का?

आपल्याला आपल्या मुलांनी काय करावे आणि काय करू नये, हे सांगायची सवय लागलेली असते. तरीदेखील हे आपल्याला एकदाही लक्षात येत नाही की, आपण जे सांगतोय; ते का सांगतोय हे त्यांना स्पष्ट करून सांगावे. यामुळे त्यांना बहुतेक वेळा त्यांनी जे केले, ते चुकीचे आहे आणि ते जे करताहेत, ते का बरे करत आहेत; हे समजत नाही. या संभ्रमाचे नैराश्यात रूपांतर होते आणि ते नंतर बाळाच्या स्वभावावर आणि पूर्ण व्यक्तिमत्त्वावर परिणाम करते.

हे घडणे आपण कसे रोखू शकतो?

जर तुम्ही आताच तुमच्या बाळाला काहीतरी चुकीचे केल्यावरून खडसावले असेल किंवा तुम्ही त्यांना विशिष्ट पद्धतीने वागण्यास सांगत असाल; तर त्यांना तुम्ही तसे का करत आहात, याचे स्पष्टीकरण द्या. यामुळे त्यांचे काय चुकत आहे आणि तुम्ही त्यांना विशिष्ट पद्धतीनेच वागण्यास का सांगत आहात; हे त्यांना कळण्यास मदत होते आणि नंतर ते आपोआप तुम्हाला पाहिजे तसेच भविष्यात वागू लागतात. तसेच हे त्यांचे संभ्रमितपणा आणि नैराश्यही टाळू शकते आणि तुमच्याबरोबर त्यांचे वागणे सुधारू शकते.

कधीकधी हे घडताना तुमच्या लक्षातही येणार नाही. म्हणून तुम्ही तुमच्या बाळाला काय म्हणता आणि ते कसे म्हणता; हेदेखील महत्त्वाचे असते. मुले ही अतिशय संस्कारक्षम असतात; म्हणून त्यांच्यावर योग्य ते संस्कार होत आहेत ना, याची खबरदारी घ्या. तुमच्या बाळाबरोबर ती जास्तीची काळजी आणि श्रम घ्या; कारण नंतर त्या सर्व कष्टाचे चीज होणारच आहे!

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon