Link copied!
Sign in / Sign up
10
Shares

मुलांची काळजी घेत असताना या टिप्सचा वापर करा.

सुरवातीची काही वर्ष घरात लहान बाळ असणे खूप आव्हानात्मक असते तेच काही वर्षांनंतर ते थोडे सुसह्य होत जाते. नुकतीच चालायला लागलेली मुले ही सगळ्याच गोष्टीत त्यांच्या पालकांवर अवलंबून असतात. याच वयात त्यांच्या मनावर सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी बिंबवल्या जातात. ज्या त्यांच्या बरोबर आयुष्यभरासाठी सोबत असतात. मुलांच्या मनात कायमच वेगवेगळी कुतुहल आणि थोडे संशयास्पद विचार येत असतात यामुळे पालकांना कायमच तयार राहिला लागते. माणसांच्या ज्या विविध प्रवृत्ती असतात, त्यातलीच एक म्हणजे जोखीम घेणे, मुलांमध्ये हीच प्रवृत्ती अधिक असते, जी चांगली पण आहे आणि वाईट पण. हे अशामुळे की, ते खूप नवीन गोष्टी स्वतः शिकत असतात. पण दुसऱ्या बाजूने बघताना, जर का त्यांच्यावर सारखे नीट लक्ष ठेवले नाही तर, ते स्वतःला काही तरी दुखापत करून घेऊ शकतात.

१. वैद्यकीय गरजा 

त्यांच्या सगळ्या वैद्यकीय गरजा आणि डॉक्टरांची अपॉइंटमेंट याकडे काळजी पूर्वक लक्ष द्या. त्यांना द्यायच्या सगळ्या लसी नीट लक्षात ठेवा कोणतीही चुकवू नका, जर का अगदीच काही अपरिहार्य कारणामुळे तुम्हाला जाणे शक्य होत नसेल तर तुमच्या जवळच्या कोणाला त्यांना जवळच्या लसीकरण केंद्रावर घेऊन जाण्यास सांगा. आपल्या बाळाच्या, बालरोग तज्ज्ञांबरोबर नियमित आरोग्य तपासणीची देखील व्यवस्था करा. यामुळे तुमच्या मुलांची परिपूर्ण वाढ होईल आणि भविष्यात देखील त्यांचे आरोग्य चांगले राहील.

२. स्वच्छता आणि काळजी 

 अशा काही अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्या नजरेतून सुटतात, पण त्याचा आपल्या मुलांवर खूप मोठा परिणाम होतो. त्यांच्यासाठी कपडे निवडताना अगदी मऊ कापड असलेलेच निवडा त्यामुळे त्यांना सारखे खाजणार नाही. अगदी छोट्या पण खूप महत्त्वाच्या अशा काही गोष्टी त्यांच्या मनावर बिंबवा जसे की,जेवणाच्या आधी व नंतर किंवा आपल्या पाळीव प्राण्यांसोबत खेळल्यावर हात पाय तोंड स्वच्छ धुवा, दिवसातून दोन वेळा दात घासा इ.

३. पौष्टिक व सकस आहार 

एकदा का तुम्ही मुलांना सगळी फळे, भाज्या द्यायला लागलात की, त्यांच्या संपूर्ण पौष्टिक गरजा पूर्ण होतील याची काळजी घ्या. काही पौष्टिक सामग्रीसह नवीन पदार्थ तयार करण्याचा प्रयत्न करा. तसेच अगदी लहान वयातच त्यांना सगळ्या गोष्टी खायला शिकवा म्हणजे पुढे जाऊन ते सर्व खायला शिकतील. त्यांना रोज सकाळ पौष्टिक न्याहरी (ब्रेकफास्ट) द्या आणि त्यांना वेळेवर आणि दोन्ही वेळा जेवणाचे फायदे देखील शिकवा. तसेच, त्यांच्या आहारात जास्तीत जास्त फळांचा आणि भाज्यांचा समावेश करा.

४. भावना व्यक्त करा 

 मुले पालकांकडून सगळे शिकत असतात आणि त्यामुळे मुलांना योग्य भावनांची ओळख करून द्यायला हवी हे पालकांसाठी अत्यावश्यक आहे. काही मूल्ये त्यांच्या मनावर बिंबवावी लागतात जसे की, सहानुभूती, कृतज्ञता, दया, नियमितता यामुळे तुमचे मुलं हे भविष्यात एक आदर्श व्यक्ती म्हणून घडू शकेल. त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी वेळ द्या, त्यांना दडपून ठेवू नका. त्यांना जर का रडावसे वाटत असेल तर रडू द्या. पण त्याच वेळी, त्यांना हे समजावून सांगा की, तुम्ही त्यावेळी त्यांची ती इच्छा पूर्ण का केली नाहीत.

५. स्व-संरक्षण आणि विकास 

आपल्या विकासास प्रोत्साहन देण्यासाठी आपण आपल्या लहान मुलांना प्राथमिक संरक्षणाचे धडे देणे आवश्यक आहे. आपल्याला कितीही आवडत असले तरी देखील अनोळखी व्यक्तींकडून कोणत्याच प्रकारचे चॉकलेट किंवा तत्सम वस्तू घ्यायच्या नाहीत आणि शाळेच्या सहलीला गेले की, कायम सगळ्यांबरोबर एकत्र मिळून मिसळून राहायचे असे जवळपास सगळेच पालक आपल्या मुलांना सांगतात. त्यांना नवीन वेगवेगळ्या पुस्तकांची, शैक्षणिक खेळण्यांची लहान वयातच ओळख करून द्या जेणे करून ते जेव्हा शिशु गटात जातील तेव्हा ते लवकर त्या गोष्टी शिकू शकतील. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon