Link copied!
Sign in / Sign up
20
Shares

मुलांशी संवाद साधण्याच्या बाबांसाठी काही टिप्स

पालकत्व ही काही फक्त एकट्या आईची जबाबदारी नाही तर वडिलांचीही ही तितकीच जबाबदारी असते. बऱ्याचदा आईच्या तुलनेत वडील मुलांपासून काही अतंर राखून असल्याचे पहायला मिळते त्याच परिणाम म्हणून मुलांची वडिलांशी फारशी जवळीक नसते. आईवडील म्हणून बाळाचे दोन पालक असतील तर बाळाला दोघांचीही समप्रमाणात ओढ आणि जवळीक असायला हवी. वडील त्यांच्या भावना कायमच लपवत असल्याने वडिलांना त्यांच्या मुलांशी जवळीक वाढवणे अवघड जाते हे समजू शकते, मात्र आपल्या मुलगा किंवा मुलगी यांच्याशी जवळीक आणि संवाद साधू न शकल्याचा प श्चाताप भविष्यात होऊ शकतो. त्यामुळे आपल्या मुलांशी  संवाद साधण्यासाठी आणि जवळीक साधण्यासाठी काय मार्ग निवडता येतील पाहूया.

१. वडील आणि मुलगा किंवा मुलगी फिरायला जा. 

वडील मुलगा किंवा वडील मुलगी एकत्र फिरायला गेलात तर या नात्यात एकदम जादुई बदल घडू शकतात. सुरुवातीला असे फिरायला जाणे कदाचित अवघडल्यासारखे वाटेल पण काही काळानंतर अशा फिरण्याची नक्की सवय होऊन जाईल.

२. मुलांचा दिनक्रम जाणून घ्या. 

आपल्या मुलांचा दिवस कसा गेला हे जाणून घेणे पालकांसाठी गरजेचे आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मुलांना सतत आज काय झाले हे विचारल्यास काही दिवसांनी मुले आपोआप त्यांच्या दिवसातल्या घडामोडी सांगू लागतील आणि मुलांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्याची संधी पालकांना मिळेल.

३.अभ्यासात मदत करा. 

मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत वडील थोडे कठोर आणि भीती वाटणारे असल्याचे बहुतेकदा पहायला मिळते. ते गरजेचे असते. पण मुलांबरोबर प्रेमळ बंध निर्माण करायचे असतील तर मात्र वेगळा दृष्टीकोन ठेवला पाहिजे. कठोर होण्यापेक्षाही त्यांच्याबरोबर एक तासभर बसून त्यांना अभ्यास पूर्ण क़रण्यात मदत करा. त्यामुळे त्यांना तुमच्याविषयी अधिक विश्वास निर्माण होईल आणि त्यांना कोणत्याही वेळी कोणताही प्रश्न विचारण्यासही शिकवा.

४. जबाबदारी वाटून घ्या. 

मुलांना वाढवणे आणि त्याविषयीच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणे ही एकट्या आईची जबाबदारी नाही. जबाबदाऱ्या वाटून घ्यायचा प्रयत्न करा. अगदी बाळाचे लंगोट किंवा डायपर बदलण्याच्या वेळांपासून सर्वच वाटून घ्या आणि काही कळायच्या आतच वडील म्हणून आपोआपच सर्वच गोष्टींत गुंतायला लागता.

५. मित्रत्वाचे नाते 

मुलांचे वडील आहातच आपण आणि वडीलांप्रमाणे मुलांशी वागायलाही हवे. पण काही वेळा मात्र मुलांना आपल्या अधिक जवळ येण्यासाठी आणि मोकळेपणाने बोलण्यासाठीही मुलांचे वडील होण्यापेक्षाही मित्र होणे अधिक चांगले आहे.

वडील असणे त्या जबाबदाऱ्या निभावणे सोपे काम नाही आणि तरीसुद्धा ते महत्त्वाचे आहे. पितृसत्ताक समाजात अजूनही, वडिलांकडे घरातील कर्ता पुरुष ज्याला आपल्या मुलांबरोबर घालावायला वेळ नाही, तर मुलाच्या जन्माबरोबर त्याच्याशी निगडीत येणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या आईच्या अशाच दृष्टीने पाहिले जाते. पण कुठेतरी बाबा लोकांच्या मनात, आपल्या मुलीशी किंवा मुलाशी आपण जवळीक साधू शकतो नाही याविषयी पश्चातापाची भावना असते. त्यामुळे हे सर्व मागे टाकून आजच ठरवा आणि आपल्याला जसा पिता किंवा बाबा व्हायचे आहे तसेच व्हा.

टीप- सर्व आयांना एक खास विनंती - हे विचार जरुर सगळ्यांना शेअर करा आणि आपल्या पतीराजांना टॅग करा जेणेकरून ते देखील या टिप्सचा वापर करु शकतील. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon