Link copied!
Sign in / Sign up
809
Shares

लहान मुलांसाठी काही खाद्य रेसिपी

मुलांना आवडेल आणि पौष्टिक देखील असेल असे काय करावे असा प्रश्न सगळ्याच आयांना पडतो म्हणून आम्ही काही मुलांना आवडेल आणि पौष्टिक देखील असेल अश्या काही पाककृती देत आहोत

घरगुती पौष्टिक मिश्रण

साहित्य- ज्वारी ,बाजरी, गहू, उकडा तांदूळ, उडीद, शेंगदाणे, डाळ, प्रत्येकी एक वाटी, १० ग्राम वेलदोडे, बदाम २५ ग्राम, खस  खस.  

कृती

सर्व धान्य भाजून घ्यावे, मग एकत्र दळून घ्यावे. त्यात बदाम, खस खस  पूड घालावी  

हे मिश्रण ५ ते ६ महिने हि टिकते.भारताच्या दक्षिणेत या मिश्रणाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.

लागेल त्यावेळी एक ते दीड  चमचा वरील मिश्रण पाण्यात उकळी आणून शिजवाजे व त्यात दूध साखर घालून बाळाला द्यावे.

वयोगट - वयोगट ६ महिने १८ महिने

मिश्र भाज्यांचे आणि भाजणीचे  थालपीठ

भाजणी-  ज्वारी,बाजरी, गहू , हरभरा,डाळ, तांदूळ-प्रत्येकी एक वाटी, उडीद मुग चवळी,मटकी अर्धी वाटी, जिरे पाव वाटी

 
 
 

घरात असतील त्या भाज्या उदा -( गाजर, मुळा,पालक, कोबी, कोथिंबीर,)

कृती

सर्व धान्य भाजून दळून घ्यावं.जरुरी प्रमाणे भाजणी घेऊन हळद, मीठ ,गूळ ,मसाला चवीप्रमाणे घालून त्यात घालून तेलावर थालपीठ करावे

वयोगट २ वर्ष  ते पुढे व शाळेच्या डब्यासाठी उत्तम आहे.

पौष्टिक लाडू

नाचणीचे पीठ १/२ वाटी, डाळीचे पीठ म्हणजेच बेसन १/४ वाटी, तीळकूट १ चमचा, दाण्याचा कूट १ चमचा, पिठीसाखर ३/४ वाटी

कृती

नाचणीचे पीठ व डाळीचे पीठ तुपात भाजा व गार करा व त्यात तीळचे व दाण्याचे कूट घालावे.  

पिठी साखर घालून लाडू वळावे. या लाडवांमध्ये मध्ये खारकेची आणि बदामाची पूड घातल्यावर पौष्टिकता अजून वाढते

मुगाच्या डाळीचा तुपातील शिरा

साहित्य

मुगाची डाळ, साखर पाणी,दूध, तूप प्रत्येकीएक वाटी काजु आणि बदाम मनुका

कृती  

मुगाची डाळ २ तास पाण्यात भिजवा, मग मिक्सर मधून काढून बारीक काढा. तुपावर तांबूस भाजा त्यात एकवटी दूध व पाणी घाला साखरेचा कच्चा पाक करून त्यात वरील मिश्रण घालावं दहा-पंधरा मिनिटे मंद आचेवर शिजवा.

वयोगट-९ महिने आणि पुढे

मुलाचे वजन वाढण्यास याचा उपयोग होतो

 

---

हॅलो मॉम्स... आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया... हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon