Link copied!
Sign in / Sign up
27
Shares

मुलांसमोरील भांडणाचा मुलांवर विपरित परिणाम


लहान मुले मातीचा गोळा असतात असे म्हटले जाते त्यामुळेच त्यांच्यावर अनेक गोष्टींचा परिणाम होत असतो. अगदी सुरुवातीच्या विचारात या गोष्टी तुमच्या लक्षातही येणार नाहीत. पालक म्हणून मुलांच्या अपरोक्ष एखाद्या बंद खोलीत झालेल्या भांडण किंवा वाद विवाद यांचे साक्षीदार मुले होणार नाहीत असे वाटू शकते. पण परिस्थिती थोडी वेगळीच आहे.

लग्न झालेले असो किंवा प्रियकर प्रेयसी असो जोडप्यांमध्ये भांडणे होत नाहीत हे अवास्तविक आहे. पण भांडणे कोणत्या प्रकारची होतात आणि ती आपण कशी सोडवता ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर भांडणांमध्ये शाब्दिक किंवा शारिरीक शोषण किंवा अत्याचार केले जात असेल किंवा आपण मौनराग धारण करतो पण त्याचा आपल्या मुलांवर विपरित परिणाम होत असतो हे लक्षात येत नाही. कारण मुले पालकांचे निरिक्षण करता आणि त्यांच्याकडूनच शिकत असतात.

याचा अर्थ जेव्हा ते मोठे होतील तेव्हा त्यांच्या नातेसंबंधांमध्येही ते तसेच वागतील जसे आपण वागत असतो. विशेषतः मुले पालकांपैकी एकाला आपले आदर्श मानत असतात तेव्हा हे विशेषत्वाने जाणवते. सततची भांडणांमुळे मुलांवर मानसिक परिणाम होतो त्याची जाणीव ते मोठे होतात तेव्हा जाणवतो. सततची भांडणे पाहून ते मानसिकरित्या स्वतःला बंद करून घेतात आणि भावनिकरित्या पुन्हा पुर्वपदावर येणे हे त्यांच्यासाठी आव्हानात्मक असते. मुलांच्या इतरांबरोबरील नातेसंबंधांमध्ये आणि त्यांच्या सामाजिक सोयींमध्येही दिसून येते. जर भांडणांमध्ये शोषण किंवा हाणामारी होत असेल तर मुले जेव्हा त्यांच्या नावडत्या परिस्थितीला तोंड देण्यास असमर्थ असतात तेव्हा हिंसेचा वापर करू शकतात.

मुली आणि मुले भांडणांशी वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देतात. सहसा मुले भांडणे बंद करण्याच्या मागे लागतात आणि भांडणावर उपाय म्हणून नकाराचा वापर करताना दिसतात तर मुली भांडणामध्ये पडून ती सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

जोडप्याने आपल्यातील भांडणे किंवा वादविवाद योग्य पद्धतीने हाताळावा आणि अधून मधून एकमेकांच्या गोष्टी अमान्य होणे किंवा न पटणे ह्यात काही चुकीचे नाही. सर्वकाही आलबेल नसताना आलबेल असल्याचे दाखवणे यापेक्षा भांडण करणे आणि वादाचा मुद्दा सोडवणे हे योग्य आहे. याचा अर्थ आपल्या जोडीदारावर प्रेम नाही असा त्याचा अर्थ नसतो किंवा त्याच्या पालकांवर प्रेम करत नाही. अर्थात वादविवाद घालताना किंवा भांडणे करतानाही सन्मानीय तोडगा काढण्याचा प्रयत्न जरुर करावा.

राग आल्यावर दहा आकडे मोजा आणि आरडाओरडा करण्यापेक्षा वस्तू फेकण्यापेक्षाही मोठ मोठ्याने आकडे म्हणा रागावर नियंत्रण ठेवण्याची ही योग्य सोपी पायरी आहे. आपण बाहेर भांडत असलो तरीही आपण आपल्या जोडीदाराबरोबर राहू शकत नसल्याचे संकेत मुलांना मिळतात. त्यातून आपल्या पालकांच्या वादाला आपणच कारणीभूत असल्याचा दोष ते स्वतःवर घेऊ शकतात. त्यापेक्षा मुलांना थोडेसे वादाचे मुद्दे आहेत ते माहिती करून द्या जेणेकरून आपला त्यांच्यावर सत्य सांगण्याइतका पुरेसा विश्वास आहे याची मुलांना कळेल. आपले मूल विवाद सोडवण्यात भावनिकरित्या पुरेसे समझदार आहे असे वाटत असल्यास त्या परिस्थितीवर त्यांचे मत काय याविषयी त्यांचे मतही विचारात घ्यावे.

शेवटी आपल्या वादाचे किंवा भांडण सोडवल्यानंतर मुलांना कोणताही अगदी वाईटातील वाईट समस्या किंवा प्रश्नही शांतपणे, समजूतदारपणे आणि थोड्या प्रमाणातील जुळवून घेतल्याने सोडवता येतो. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon