Link copied!
Sign in / Sign up
11
Shares

तुमच्या मुलांशी भावनिक नाते दृढ कराण्यासाठी या पाच गोष्टी करा

प्रत्येक पालकांना आपल्या मुलांशी असलेले आपले नाते  हे भावनिक दृष्ट्या घट्ट असावे असे वाटत असते  परंतु हे नेहमीच असे होईल असे नाही, जसे आपल्या मुलाचे वय वाढत जाते तसतसे ते कदाचित आपणसुद्धा वेगळ्या पद्धतीने वागू लागतो. परंतु ही एक सुधारण्याची परिस्थिती आहे ज्यामुळे आपण जास्त काळजी करण्याची गरज नाही. पुढील काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्ही मुलांशी भावनिक नाते जोडू शकता.

१. तुमचे त्यांच्यावर किती प्रेम आहे हे कृतीतून दर्शवा 

 मुलांसाठी आपल्याकडे नेहमीच अफाट प्रेम असते, परंतु मुलांना ते तुमच्या कृतीतूनच समजते. येथे तुम्ही केवळ 'आय लव्ह यू' , 'आय मिस यू' एवढे बोलणे पुरेसे नसते. सकाळी जेंव्हा तुम्ही उठता, आणि मुलांसाठी शाळेची तयारी करता तेव्हा त्यांना सोडताना एका मिठी मारा, गोड पापा द्या. या सर्व गोष्टी मुलांना ते सुरक्षित वातावरणात असल्याचा फील देतात.

२. सरप्राईज द्या.

 

 आश्चर्यचकित होयला कोणाला आवडत नाही. विशेषतः मुलांना दैनंदिन रुटीनचा कंटाळा आलेला असताना त्यांनी एखादे काम केल्यावर किंवा अभ्यास झाल्यावर सरप्राईज दिल्यास आनंदून जातात. हे केवळ खूप मोठ्या गोष्टी करून मिळते असे नाही तर एखादे चॉकलेट बार देऊन सरप्राईज देऊ शकता. येथे भेटवस्तू महत्वाची नसते तर तुम्ही त्यांना दिलेला आश्चर्याचा धक्का हा असतो.

३. त्यांचे म्हणणे ऐका 

 सर्व पालकांनी एका गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे मुलांकडे दुर्लक्ष करणे टाळावे. कदाचित ते खूप निरर्थक बोबडे बोला बोलत असतील, पण ते तुम्ही ऐकणे हे तुमचे काम आहे. जेव्हा तुमचे मूल तुम्हाला काही तरी सांगत असते तेव्हा ते त्याच्या भावना तुमच्याशी शेअर करत असते त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका, यामुळे ते दुखवू शकतात. मुलांचे बोलणे ऐकून नेहमी त्यांना काय करावे? काय करू नये? हे सांगा. रोज आल्यावर शाळेत काय झाले? मित्रांशी काय बोलणे झाले? असे विचारल्याने तुमचा तुमच्या मुलांशी संवाद खुलून येईल.

४. माफी मागायला शिका.

 आपल्या मुलाला आपण 'थँक यू' ,'आय एम सॉरी' या गोष्टी शिकवतो, पण तुम्ही तसे तुमच्या आचरणात आणत नसाल तर त्यांना नुसते शिकवणे अर्थहीन होते. प्रौढ असून देखील आपल्या कडून काही ना काही चुका होताच असतात. मुलांसमोर तुमच्या चुका तश्याच सोडून देऊ नका उलट जर का त्या त्यांच्याशी निगडित असतील तर त्यांची माफी मागा. हे अगदी छोट्या छोट्या गोष्टीत देखील दाखवा, समजा चुकून तुम्ही त्यांच्या पेन्सिलीवर बसलात आणि ती तुटली तर ही गोष्ट हसण्यावारी न नेता त्यांची माफी मागा, या कृतीमुळे त्याना तुम्ही किती स्वाभाविकपणे वागता हे समजेल.

५. त्यांना स्वातंत्र्य द्या.

ही गोष्ट कदाचित तुम्हाला विचित्र वाटेल पण जेव्हा मुलांनी आपल्या जवळ यावे असे वाट असेल त्यांना थोडे स्वातंत्र्य द्यावे. काही परिस्थितीमध्ये ही गोष्ट लागू पडते. हे महत्वाचे असून परिस्थिती ओळखून त्यानुसार वागणे आवश्यक असते. उदा. तुमची मुलं एकमेकांशी भांडत असतील तर दर वेळी तुम्ही त्यामध्ये हस्तक्षेप करू नका. ती समस्या त्यांची त्यांना सोडवू द्या.

आम्ही आशा करतो, तुमचे तुमच्या मुलाशी संबंध वाढत्या वयासोबत आणखी दृढ कराल. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon