Link copied!
Sign in / Sign up
16
Shares

मुलांच्या रागाला कसे हाताळाल ?

                                                   

प्रत्येक व्यक्तीची मनस्थिती आजूबाजूचे वातावरणांवर अवलंबून असते आणि त्याला अनुकूल अशाच भावना तो व्यक्त करत असतो. कुणालाही राग येणे आणि भावनांचा उद्रेक होणे अगदी साहजिक असते. काही वेळेला रागावरचे नियंत्रण सुटणे आणि प्रत्येकाला राग येणे हे समजण्यासारखे आहे,अगदी तुमची लहान मुलही याला अपवाद नाही. न आवरता येणाऱ्या  संतापाशी राग ही भावना निगडित आहे जिचा एकूणच परिणाम हा नकारात्मक असतो. राग अनेक पद्धतींनी व्यक्त होत असतो. जसे की,मोठ्याने रडणे, किंचाळणे,ओरडणे आणि हिंसक बनणे. जेव्हा ५ वर्षांचे एखादे छोटे मुल उद्धटपणे वागते आणि सांगितलेले ऐकायला नकार देते, तेव्हा आपण मोठी माणसे ही रागाने लालबुंद होतो ना?  कधी कधी लहान मुलांमध्ये हि असाच भावनांचा उद्रेक होतो.तुमच्या मुलांना राग आलेला असतानाची परिस्थिती योग्य प्रकारे कशी हाताळावी हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.

१. मुल रागात असतांना त्याच्यावर ओरडू नका.

तुमचे मूल आधीच चिडलेले असतांना त्याच्यावर ओरडून आणि किंचाळून परिस्थिती आणखी चिघळते.असे केल्यास तुमचे मूल अजूनच संतापते,याउलट अशा वेळी शांत रहाणेच तुमच्यासाठी योग्य ठरते. तुमचे मूल रागाने धुमसत असेल तरीही चिंता न करता संयम बाळगा.

२. मुल रागात असतांना त्याला कोणतेही तर्क शिकवू नका.

आपल्या रागावलेल्या मुलाला समजावताना बरेच पालक तार्किक पद्धतीने बोलतात.मोठ्यांशी बोलतांना हे योग्य आहे पण लहान मुलांना समजावताना याचा फारसा उपयोग होत नाही. कारण लहान मुलांची मने अगदी कोवळी,संवेदनशील असतात आणि मोठ्यांप्रमाणे सर्व काही समजून घेण्याची मानसिक परिपक्वता त्यांच्यात नसते, म्हणूनच त्यांची चूक काय आहे किंवा त्यांनी नेमके काय केले आहे हे तत्वज्ञान शिकवू नका.      

३. स्वतःच्या प्रतिक्रिया तपासून पहा.

मुल चिडलेले असतांना तुमच्या प्रतिक्रिया आणि शारीरिक हावभाव रागाचेच असतील तर मुलांसाठी आणखी भडकण्याचे हे एक कारण असते. हे याची तुम्हाला कदाचित जाणीवही होत नसेल. तुम्ही काहीही न बोलता तुमचा राग मुलांना कळतो आणि या सर्व गोष्टीतून तुम्ही शांत होण्याऐवजी अजून जास्त रागात येता.जेव्हा तुम्हाला उघडपणे प्रतिक्रिया द्यावीशी वाटते तेव्हा तुमचे हृदय जोरजोरात धडधडू लागते आणि तुमच्या ऍड्रेलायीन संप्रेरकाचा स्त्राव मोठ्या प्रमाणात होतो.

४. राग कसा हाताळावा हे मुलांना शिकवा.

कोणत्याही मुलाचा स्वभाव स्वतःच्या भावंडांपेक्षा वेगळा असू शकतो. तुमचे मुलांना कधीकधी राग येतो. त्यांना राग येत आहे असे लक्षात येताच त्याला वेगळे पाडण्या ऐवजी स्वतःच्या विचार आणि भावनांवर कसे नियंत्रण कसे ठेवावे हे शिकवण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही गोष्टीवर लगेचच राग येऊ नये. हे मुलाच्या लक्षात येण्यासाठी आणि स्वतःला प्रेरित करण्यासाठी त्यांची मदत करा.मुलांना स्वतःच्या खास टिप्स द्या आणि रागावर नियंत्रण ठेवण्याच्या नव्या युक्ती शिकवा.  

५. मुलांशी कठोरपणे वागणे टाळा.

तुमचे मूल रागात असतांना त्याच्याशी कठोरपणे वागून तुमच्या दोघांतील नात्याचे बंध तुटू शकतात.आधीच चिडलेल्या मुलाला लगेचच शिक्षा देऊन भविष्यातील अडचणी आणि भांडणे यांना आयतेच आमंत्रण मिळते.तुम्ही मुलांसोबत जेवढे जास्त कठोर आणि कडक वागाल तेवढे जास्त तुमचे मूल वैतागेल,जे तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलासाठी हे नक्कीच सुखावह नसते. शिक्षा म्हणून मुलांच्या आवडत्या वस्तू किंवा खेळणी काढून घेतल्यास तुम्हाला राग यायला मुले भाग पाडतात.

वर सांगितलेल्या सोप्या युक्तीचा अवलंब करून तुम्ही तर शांत रहालाच पण तुमचे मूल हि स्वतःच्या रागावर नियंत्रण कसे ठेवावे हे शिकेल.      

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon