Link copied!
Sign in / Sign up
28
Shares

तुमच्या मुलांची एकमेकांविषयी तुलना करू नका


तुलना करणे हे आपल्या आसपास सहजपणे आढळून येते. "त्या ललिताच्या मुलीला ९०% मिळाले! आणि तू … अशी किंवा असा " स्वतःच्या मुलाच्या क्षमतांचे मूल्यमापन करण्याचे हे भारतीय पालकांकडून अगदी सामान्यपणे वापरले जाणारे साधन. असे पालक स्वतःच्या मुलाच्या आत्म सन्मान १०० पासून ० पर्यंत कमी करतात आणि एका अतिशय घातक स्पर्धेला चालना देतात. तुमच्या मुलासोबत तुम्ही करत असलेली दुसरी अतिशय वाईट गोष्ट म्हणजे मुलांना स्वतःच्या भावंडांसोबत तुलना करणे.

काही मोजके पालक असे करतात असे नव्हे तर सर्वच पालक असे वागतात ही वस्तुस्थिती आहे, पण हे स्वीकारायला कचरतात. तुम्हाला कदाचित जाणीवही नसेल पण अशी तुलना करन्याने तुम्ही तुमच्या मुलाचा आत्मविश्वास, स्वयंप्रतिमा आणि त्या/तिची मनोवस्था उद्ध्वस्त होते. "टवाळक्या करत फिरणे बंद कर आणि शिकवणीला जा! तुझ्या मोठ्या भावाकडे बघ...!!'' असे खोचक टोमणे मुलांना मारता. जराही विचार न करता तुम्ही मुलांना असेच खूप काही बोलून जाता.

मुलांची स्वतःच्या भावंडांसोबत तुलना करण्याचे परिणाम काय असू शकतात याची कल्पना तुम्ही केली आहे काय. अशी तुलना का करू नये याची कारणे आम्ही तुमच्यासाठी देत आहोत.

१] समाजात वावरतांना घाबरणे :

मुलांची तुलना इतरांशी करत रहाण्याने ती स्वतःला कमी समजतात. जेव्हा तुमच्या घरी पाहुणे येतात आणि तुम्ही मुलांना गुणप्रदर्शन करायला सांगता तेव्हा ती लाजण्याची आणि सामाजिकदृष्ट्या संकोचून जाण्याची शक्यता असते.तुमच्या सततच्या ओरडण्याने,टोमणे मारण्याने आणि उपहास करण्याने मूल सामाजिक संवादात सहभागी होण्याचे टाळते खासकरून जेव्हा तुम्ही त्यांच्या सोबत असता.

२] "तू त्याच्यासारखा का बनत नाही..." हे वाक्य तुमच्या शब्दकोशातून काढून टाका

तुमची ईच्छा झाली तरीही अशी वाक्ये मुलासमोर उच्चारू नका. मुलांशी बोलतांना काळजीपूर्वक शब्द काळजीपूर्वक वापरा.त्तुम्ही कितीही रागात असाल आणि मुलाला हाताळणे कठीण वाटत असेल तरीही अशी भयंकर वाक्ये त्या/तिच्या साठी कधीही वापरणे टाळा.

३] कमी आत्मसन्मान

जेव्हा तुम्ही तुमच्या मुलास सतत टोमणे घायाळ करता तेव्हा आपोआपच त्यांनाही आपण इतर मुलांपेक्षा कमी आहोत असे वाटायला लागते. आपल्यात काही तरी कमतरता आहे असे जाणवण्यात आणि मुलांचे भविष्य खराब करण्यास तुम्ही ठरता .

४] भावंडासोबतचे कटू संबंध

तुम्ही तुमच्या मुलांमध्ये तुलना करत असाल तर त्यांच्यात निर्माण होणाऱ्या कडवट संबंधासाठीही तयारी असू द्या.सरणाऱ्या काळासोबत मुले हि गोष्ट विसरत जातात असे नव्हे तर बरेचदा,हि समस्या येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत चालू राहू शकते अगदी मूले मोठी झाल्यानंतरही !या सर्वांचा परिणाम म्हणून तुमचे धाकटे मूल आकस बाळगणारे आणि तुमच्या समोर स्वतःला नं . १ सिद्ध करण्यासाठी टोकाचे पाऊल गाठू शकते.

५] तुमच्याशी अंतर ठेवून वागणे

तुमचे मूल तुमच्याशी अंतर राखून राहत असेल तर त्यासाठी तुम्ही त्याला दोष देऊ शकत नाही कारण मुलाची तुलना इतर मुलांसोबत आणि भावंडांसोबत करून तुम्हीच ही परिस्थिती निर्माण केलेली आहे. आपण काहीही केले तरी त्याने पालक नाराज होतात आणि त्यांना त्रास होतो याची जाणीव मुलांना होते आणि या साऱ्या नकारात्मक वातावरणाचे मूळ (जे तुम्ही स्वतः आहात ) त्यापासून मुले दार राहण्याचा प्रयत्न करतात. अशा पद्धतीने मूल हळूहळू तुमच्यावर असणारा विश्वास गमावते आणि तुमच्या कडे एक संकट म्हणून पाहते. s

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon