Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

तुम्ही मुलांचे फाजील लाड करताय का ?


लहान मुलाचा लाड करायला सर्वांनाच आवडतं. त्याच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी सर्व जण जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतात. पण जर हे लाड अतिप्रमाणात झाले, तर त्यातून काही चुकीच्या गोष्टी होण्याची शक्यताही असते. अतिलाडात वाढलेली मुलं ही हट्टी, नेहमी लक्ष वेधून घेणारी आणि स्वार्थी होण्याचा धोका असतो. पण बऱ्याच वेळा आपला मुलगा तसा बनतोय हे आपल्याला कळतच नाही. आम्ही पुढे तुमचा मुलगा अति लाडात तसा बनतोय का हे ओळखण्यासाठी काही लक्षणे सांगतोय

1. मुलगा प्रत्येक गोष्ट गृहीत धरतो. 

2. मुलगा थोडी अवघड असलेली गोष्ट शिकण्यासाठी मेहनत घेत नाही. कारण तुम्ही किंवा इतर कुणी तरी त्याच्यासाठी ती गोष्ट कराल हे तो गृहीत धरून चालतो.

3. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या लोकांना तो कमी समजायला लागतो.

4. त्याला पाहिजे असलेली गोष्ट मिळवण्यासाठी तो कोणत्याही पातळीला जातो. जर तुम्ही त्याची इच्छा पूर्ण केली नाही, तर तो खोटे बोलू शकतो. किंवा क्रोधित होऊ शकतो.

5. एखाद्या गोष्टीविषयी खात्री पटल्यानंतरही ते आपलं मत बदलण्यास तयार नसतात.

6. त्याच्या सवंगड्यांकडे आहेत त्यापेक्षा स्वत:कडे जास्त गोष्टी असाव्यात असं त्याला नेहमी वाटतं. स्वत:कडे आहे त्या गोष्टीत समाधान माननं ही गोष्ट तो समजून घेत नाही.

7. अशी मुलं जास्त वेळ लक्ष्य केंद्रीत करू शकत नाहीत. त्यामुळे आजूबाजूस घडणाऱ्या गोष्टींना ते लवकर कंटाळतात.

8. त्यांला मिळालेल्या गोष्टींचा ते कधीही आनंद घेत नाहीत. ते नेहमी आणखी काही तरी मिळावं यासाठी मागमी करतात.

जर तुमच्या मुलात यापैखी काही लक्षणे आढळथ असतील, तर तुम्हाला निश्चित विचार करावा लागेल. जर तुम्ही तुमच्या मुलांना प्रत्येक पुरवणार असाल, तर त्यांचे फाजील लाड वाढू शकतात.

- जर तुम्ही त्यांना विविध वस्तु घेऊन देत असाल, तर मुलं चुकीच्या वळणाकडे जाण्यासाठी ते महत्तवाचे कारण ठरू शकते. तुमच्या मुलाची आवडती खेळणी किंवा आवडते मऊ ब्लॅंकेट घेवून देण्यापर्यंत ठिक आहे. पण त्यांची प्रत्येक गोष्ट तुम्ही ऐकायला लागला, तर मात्र वाईट ठरू आहे.

- जर तुम्ही मुलांना फक्त रागवणार असाल पण त्यानुसार वागणार नसाल, तर ते तुम्हाला सहजपणे घ्यायला लागतील. त्यामुळे त्याच्या वर्तनात बदल होणार नाही. जर तुम्ही त्याला म्हणालात की, ‘ जर तू लवकर उठून ब्रश केला नाही, तर तुला या आठवड्यात मी चॉकलेट घेवून देणार नाही.’ तर तसं वागा. त्याबद्दल स्वत:ला वाईट वाटून घेऊ नका. मुलांना शिस्त लावण्यासाठी ही गोष्ट खूप आवश्यक आहे.

- बऱ्याच वेळा मानवी भावभावनांपासून मुलांना दूर ठेवण्याचं काम पालक करत असतात. ते मुलांसाठी धोकादायक ठरू शकतं. उर्वरित जीवनात त्यांना त्या गोष्टींना सामोरं जायचं असतं. त्यामुळे मुलांवर परिणामही होणार नाही आणि त्यांना त्याची माहितीही असावी या दोन्ही गोष्टींचे बॅलन्स राखणे खूप आवश्यक आहे.

- तुमच्या मुलानं एखादी गोष्ट करावी, असं तुम्हाला वाटतं असेल, तर तुम्ही त्या गोष्टीविषयी क्लिअर असणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा मुलं प्रौढ व्यक्ती कसे वागतात याचं आचरण करत असतात. त्यामुळे त्यांच्या मनात गोंधळ होणार नाही याची काळजी घ्या. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon