Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

मुलांच्या मणक्याला एका बाजूला येणारा बाक - कारणे आणि उपचार


आपले मुलं आजारी पडू नये आणि त्याला कोणतीही व्याधी उद्भवू नये म्हणून पालक मुलांची सतत काळजी घेतच असतात. दुर्दैवाने आजार आणि व्याधी, मग ते छोटी असो किंवा मोठी अपरिहार्य झाले आहेत. अशीच एक व्याधी जी मुलांना होऊ शकते म्हणजे स्कोलियोसिस (मणक्याला एका बाजूला बाकी येणे). हे खूप लोकांना माहित नाहीये, पण यात मणक्याची एकच बाजू वक्राकार होते, खासकरून मागच्या बाजूने बघितले असतात ते स्पष्ट दिसून येते. विविध शोधांनुसार पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया स्कोलियोसिस बाबत जास्त संवेदनाक्षम असतात. (९ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांवर जास्त परिणाम करते). याकडे जर का दुर्लक्ष केले आणि उपचार घेतले नाहीत तर स्कोलियोसिसमुळे गुंतागुंती आणि अस्वस्थता उद्भवू शकते.

मुलांमध्ये स्कोलियोसिस कशामुळे उद्भवू शकते?

स्कोलियोसिस खालील काही घटकांमुळे उद्भवू शकतो, त्याची कारणे पुढील प्रमाणे

१. काही मुलांमध्ये, ही स्थिती जन्मापासून असू शकते. याला जन्मजात स्कोलियोसिस देखील म्हणतात, मणक्यांच्या आंशिक निर्मितीमुळे किंवा मणक्यातील वर्तुळाच्या अभावामुळे ही समस्या येते. जन्मजात स्कोलियोसिस मणक्याचे अयोग्य विभाजन झाले असेल तरी देखील होऊ शकतो, या मुलांचा मणका (एस किंवा सी आकारात) वक्रकार दिसतो.

२. स्कोलियोसिस काही मज्जातंतूच्या विकारांचा परिणाम देखील असू शकतो जसे की, न्युरोफिब्रोमाटिसिस, स्नायुंचा विकृती, सेरेब्रल पक्षघात, पाठीच्या कण्याला होणारे ट्युमर, इत्यादींचा परिणाम त्या व्यक्तीवर उठ बस करताना किंवा चालताना होतो आणि यामुळे मणका अनैसर्गिकपणे वक्रकार होतो. याला न्यूरॉमसक्युलर (मज्जासंस्थेसंबंधीचा) स्कोलियोसिस म्हणतात.

३. काही प्रकरणांमध्ये स्कोलियोसिसच्या नेमक्या कारणांचा उलगडा करून सांगणे कठीण असते. याला अनाकलनीय (इडिओपॅथिक) स्कोलियोसिस म्हणतात, ही स्थिती एखाद्या निरोगी मुलावर परिणाम करू शकते ज्यांची कोणतीही न्यूरोलॉजिकल किंवा संबंधित विकारांचा भूतकाळाचा इतिहास नाहीये ज्यामुळे त्यांना हा आजार झाला असावा. अनाकलनीय स्कोलियोसिस यांपैकी कोणालाही होऊ शकतो

अ) ० ते ३ वर्षांच्या दरम्यानच्या बाळांना (तान्ह्या मुलांचा (इनफंटाइल) स्कोलियोसिस)

ब) ३ ते ९ वर्षांची अल्पवयीन मुलं (अल्पवयीन (जुवेनील) स्कोलियोसिस)

क) ९ ते १८ वर्षांची किशोरवयीन मुले (किशोरवयीन (ऍडोलेसेंट) स्कोलियोसिस)

तान्ह्या मुलांचा (इनफंटाइल) स्कोलियोसिस हा प्रामुख्याने मुलांमध्ये बघायला मिळतो, तर मुली किशोरवयीन (ऍडोलेसेंट) स्कोलियोसिसला अधिक संवेदनाक्षम असतात. संशोधन आणि विविध वैज्ञानिक अभ्यासांवरून असे सूचित होते की, स्कोलियोसिस हे खालील गोष्टींचे प्रकटीकरण असे शकते

१. मणक्याला झालेला संसर्ग किंवा तीव्र इजा

२. अनुवांशिक पूर्वस्थिती

उपचार

फलदायी परिणामासह यशस्वी उपचार सुरु करण्यासाठी अचूक आणि लवकर निदान होणे महत्त्वाचे ठरू शकते. मणक्याचा एक्स-रे त्यानंतर सीटी स्कॅन किंवा एम.आर.आय (काही प्रकरणांमध्ये) स्कोलियोसिसचे निदान करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

उपचाराचा प्रकार हा मुलांचे वय आणि त्याच बरोबर किती मोठा प्रादुर्भाव व अस्वस्थता किती आहे यावर अवलंबून असते.नवजात बाळांच्या बाबतीत त्यांच्या हाडांची वाढ खूप हळू होत असते, अशावेळी त्या बाळांना निरीक्षणाखाली ठेवले जाते, त्यातून त्यांच्या आजाराचे व वक्रताचे स्वरूप अभ्यासले जाते.

पाठीच्या काण्यात जर का २५ अंशांपेक्षा जास्त वक्रता असेल (हाडांची वाढ सातत्याने होत असताना) किंवा वक्रता जर का २० ते २९ अंशांच्या दरम्यान असेल (परिस्थितीत काहीच सुधारणा होत नसेल) तर डॉक्टर तुम्हाला ब्रेसेस (कंबर पट्टा किंवा चौकटी कंस (पाठीवरून फुलीसारखे खांद्यावरून घेऊन कमरेजवळ अडकवलेले पट्टे) वापरण्याचा सल्ला देतात कदाचित तो पूर्ण दिवसभर लावून ठेवावा लागू शकतो किंवा काही ठराविक वेळेला. कोणत्या प्रकारचा पट्टा वापरावा लागेल हे पाठीचा कणा किती वक्राकार झाला आहे आणि मुलाच्या वयावर अवलंबून असते. खूपच गंभीर प्रकरणात, जिथे पाठीच्या काण्याची वक्रता ४५ अंशांपेक्षा जास्ती असते आणि ब्रेसेसमुळे योग्य तो आधार मिळत नाही अशावेळी डॉक्टर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ल

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon