Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

लहान (नुकत्याच चालू लागलेल्या) मुलांचा चित्र काढणे आणि लिहिणे याबाबतचा विकास

बाहेर पाऊस पडतो आहे आणि आपल्या घरातील लहानगे तुफान बाहेर जाऊन पावसात खेळण्यासाठी आतुरले आहे. किंवा आपण कामात व्यग्र असताना नुकतेच चालू लागलेले बाळ आपले लक्ष वेधण्यासाठी त्रास देत असेल अशा वेळी या छोट्यांना कशात गुंतवून ठेवावे असा प्रश्न भेडसावतोच. त्यासाठी लहानग्यांना थोडे रंगीत खडू आणि एक भला मोठा कागद द्या. त्यांना हे रंगीत खडू कसे वापरायचे ते शिकवा. त्यामुळे लहानगे एका जागी बसतील पण व्यग्र राहातीलच परंतू त्यांची कृतिकौशल्ये (मोटार स्कील्स)विकसित होण्यास मदत होते आणि लिहिणे आणि चित्रकला यांच्यासारख्या सर्जनशील गोष्टीं शिकण्याचा एक मैलाचा दगड पार करतील.

चित्रकला आणि लिहिण्याचे वय

लिहिणे आणि चित्र काढणे ही एक शिकण्याची हळुवार प्रक्रिया आहे. अर्थात हे शिकण्याच्या प्रक्रियेची घाई नाही बाळाचे पहिले वर्ष पूर्ण होण्याच्या काही महिने आधीपासून बाळाची कृतिकौशल्ये, ताकद आणि हात-डोळे यांचा समन्वय साधण्यास सुरुवात होते आणि मग मूल लिहीण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करते.

पंधरा महिन्यांचे असताना मूल हळहळू रेघोट्या मारणे किंवा लिहिण्याचा प्रयत्न करू लागते. १८ महिन्यांचे झाले की मूलाला चित्रकलेची मजा वाटू लागते आणि खडूने रंगवणे, रंगाचा वापर करू लागते. याच वयात त्यांना खडू बोटांमध्ये पकडता येतो किंवा ब्रश हातात पकडून हातांच्या हालचालीने चित्र काढता रंगवता येते. दोन ते तीन या वयामध्ये मुलांना अंगठा आणि पहिली दोन बोटे यांच्यात खडू किंवा ब्रश व्यवस्थित पकडता येतो.

मुलांना प्रोत्साहन द्या

 कागद टेबल किंवा जमिनीवर चिकटवा. वॉलपेपरचाही यासाठी वापर करता येईल. मग मुलांना खडू देऊन त्यांच्या मनाला वाटेल ते चित्र रंगवू द्या.

मुलांना खडू देताना जाड आणि टिकाऊ असालेत आणि धुता येणारे पेन असावेत त्यामुळे मुलांना ते सहजपणे पकडता येतील आणि विविध रंगांनी रंगकाम करता येईल. दगडांची किंवा पेव्हिंग स्टोन्सच्या फरशीवर चंकी स्टोन्सचा वापर करता येऊ शकतो. मुलांबरोबर स्थानिक बागेमध्ये जावे किंवा घरातच बाग असेल तर विविध प्रकारची, आकाराची आणि पोत असलेली पाने गोळा करावी. मुलांना ही पाने रंगात बुडवून एका कागदावर ठेवण्यास सांगावीत. अशा प्रकारे सर्व पानांची चित्रे आणि विविध आकार आपली मुलांनी केली आहेत ते पहावे. अर्थात सगळीकडे रंगच रंग आणि पानांचा पसारा होईल मात्र मुलांना या सगळ्यातून खूप मजा वाटेल.

मुलांना विविध प्रयोग करण्यासाठी आणि अनुभव घेण्यासाठी प्रेरणा द्या. त्यांना खडू किंवा रंग कसे वापरायचे हे सांगण्याव्यतिरिक्त कोणत्याही सूचना देऊ नका. त्यांना रंगात हात घालू द्या ते एकत्र करू द्या. ते कोणता रंग तयार करतात ते पहा आणि त्यांना रंगवू द्या आणि लिहू द्या. त्यामुळे मुलांना खूप मज्जा वाटेल आणि या सर्वांतून त्यांचा आत्मविश्वासही वाढीस लागेल.

मुलाचे कौतुक करावे, त्यांच्या प्रयत्नांना दाद द्यावी. त्यांनी केलेली चित्रकला किंवा काढलेले चित्र भिंतीवर  किंवा फ्रीजवर लावावे. मुलांना त्यांची चित्रे आणि ओढलेल्या रेघोट्या किंवा लिखाणाचे कौतुक केले जाते हे मुलांना कळेल आणि त्यामुळे त्यांना अधिकाधिक चांगले चित्र रेखाटण्यास मदत मिळेल.

 

चित्र काढण्याचे आणि लिखाणाचे फायदे

चित्र काढणे आणि लिखाण यांच्यामुळे मेंदूचा विकास होण्यासाठी आणि कृतिकौशल्यांमध्ये सुधारणा होण्यासाठी तसेच एकाग्रता वाढण्यासाठी मदत होते.

१. कारण आणि परिणाम यांचा परस्परसंबंध

स्क्रीबलिंग किंवा कागदावर सहजच काही रेघोट्या ओढल्या तरीही मुलांना त्यातून कारणे आणि परिणाम यांच्यातील परस्परसंबंध शिकायसा मिळतो. एखाद्या कागदावर सहज म्हणून ओढलेली रेष तशीच राहते किंवा त्यांच्या खुणा शिल्लक राहातात. कालांतराने रेघोट्यांना आकार येत जातो आणि मुलांच्या लिहिण्याच्या कौशल्य विकासात ह्या रेघोट्यांचा आकार महत्त्वाचा ठरतो.

२.  स्वनियंत्रण

 कागदावर स्वतःला व्यक्त करण्याचे स्वातंत्र मिळाल्यामुळे मूल स्वनियंत्रण, स्वातंत्र्य आणि त्यांच्या स्वतःच्या निर्णयाची जबाबदारी घ्यायला शिकवते.

३. सर्जनशील विचार

आपल्या मुलाला कागदावर स्वतःला अभिव्यक्त करण्यासाठी दिलेले स्वातंत्र्य थेट तो किती सर्जनशील होईल ह्याच्याशी निगडीत असते. तयार चित्रांची पुस्तके मुलांच्या सर्जनशीलतेला मर्यादित करतात. त्यामुळे मुलांच्या हातात खडू आणि कोरा कागद आणि त्यांना मनाला वाटेल ते रेखाटू द्या.

४. दृश्य परिणाम

 आपण जे खडू वापरतो त्याच्या खुणा मागे शिल्लक राहातात हे मुलांना समजते. त्यामुळे मुले अंतिम चित्र कसे दिसेल यांची कल्पना करु लागतात आणि सांकेतिक विचार करु लागतात म्हणजे आपले चित्र काही गोष्टीं दर्शवते हे मुलांना समजू लागते.

५. धोके पत्करणे

सर्जनशील जगाची ओळख झाल्यानंतर मुलांना ते कागदावर काढतात त्या प्रत्येक रेषेचे महत्त्व कळू लागते आणि मग मुले स्वतःच धोका पत्करण्याचे प्रशिक्षण घेऊ लागतात.

६. समस्या सोडवणे

जेव्हा मुले रेघोट्या मारण्याच्या किंवा लिहीण्याच्या नियंत्रित टप्प्यात असतात तेव्हा मुले समस्या कशा सोडवता येतील त्याची तंत्रे आत्मसात करतो.

७. ठोस आणि उत्तम कृति कौशल्य

विकासनियंत्रित लिखाणामुळे ठोस आणि उत्तम कृतिकौशल्यांमध्ये सुधारणा होण्यात मदत मिळते.
Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon