Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

मुलांच्या कुतुहूलपूर्ण प्रश्नांची उत्तरे कशी द्याल

घरात लहान मुले असली की अनेक प्रश्न येतात. लहान मुले ही अति चौकस असतात. त्यांना सतत प्रश्न पडलेले असतात त्याची उत्तरे दिली की पुढचा प्रश्न तयार असतोच. पालक थकतात पण मुलांचे कुतुहल शमत नाही की प्रश्न संपत नाहीत. पालकांना मात्र मुलांना इतक्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कशी आणि कोणती द्यायची हे कळत नाही. कारण मुलांना त्यांच्या पातळीची किंवा क्षमतेची उत्तरे द्यावी लागणार असतात. अर्थात प्रत्येक पालक मुलांच्या पातळीचा विचार करुन उत्तर देऊ शकत नाही त्यामुळे पालक असे प्रश्नच टाळताना दिसतात आणि अगदीच मुले हट्टाला पेटली तर त्यांना रागावून गप्प बसवतात. या दोन्ही गोष्टी मुलांच्या मानसिक विकासाच्या दृष्टीने फायदेशीर नाहीत. मग मुलांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे कशी द्यावी असा प्रश्न पालकांना भेडसावतो.

मुले झाल्यानंतर सुरुवातीच्या काळ हा मुलांना सांभाळण्यात, संरक्षणात आणि त्यांना जेवायला घालणे त्यांची डायपर बदलणे यामध्ये जातो. पण जशी मुले बोलायला लागतात आणि त्यांना प्रश्न पडू लागतात तेव्हा मात्र आईवडिल त्यांच्यासाठी सर्वज्ञानीच असतात. मुले प्रश्न विचारून पालकांना भंडावून सोडतात. मुख्य म्हणजे मुलांचे जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत ते प्रश्न विचारत राहातात. त्यांना पालकांकडून खरे उत्तर अपेक्षित असते. मुलांचे प्रश्न असे असतात की पालक भंडावून जातात. वानगीदाखल मुलांचे प्रश्न आणि पालकांची काय उत्तरे द्यावी पाहूया..

१. पोटात बाळ कसे येते, मी कसा झालो

मुलांना शेजारीपाजारी एखादी गर्भवती महिला दिसली की हा प्रश्न पालक म्हणून आपल्यावर आदळलाच म्हणून समजा. हल्ली टीव्हीमुळे मुलांना अनेक गोष्टींचे ज्ञान मिळत असते. मग मुलांना पोटात बाळ कसे आले, ते कुठुन बाहेर येणार, ते पोटात काय खाते असे प्रश्न पडतात. हे प्रश्न त्यांना चारचौघात पडतात आणि मुलंच ती बिनधास्त विचारून आपल्याला कानकोंडे करतात. तेव्हा शांतपणे त्यांना बागेत घेऊन जावे आणि फुले कशी तयार होतात ते समजावून सांगून आईच्या पोटात तयार होऊन बाहेर येतात. ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.

२. पालकांच्या लग्नात माझा फोटो का नाही ?

 हा प्रश्न पालकांच्या लहानपणी त्यांना पडलेला असेलच मग मुलांना आईबाबांनी आणलेच नव्हते असे समजावून सांगावे.

३. मुलगा आणि मुलगी यांचे जननेंद्रिये वेगळी का किंवा मुली बसून आणि मुले उभे राहून का शू करतात-

 खूप लहान असताना मुलांना शारिर अवयवांची माहिती देता येत नाही. पण प्रत्येक एक व्यक्ती वेगळी असते आणि त्यामुळे शारिरीक रचनाही वेगळी असते. उदाहरणार्थ मुलगी आणि मुलगा यांच्या शरीराची ठेवण वेगळी असते. जसे प्रत्येक प्राण्याची ठेवण वेगळी असते. तशीच तुमची आहे.

४. सॅनिटरी पॅडच्या जाहिरातीमुळे पडणारे प्रश्न

 हे मोठ्यांचे डायपर असतात ना आई अशा प्रश्न माझ्या मुलीने केला. तेव्हा मी हो म्हटले. नंतर तिला सांगितले की मोठ्यांच्या गुप्तांगाची काळजी घेण्यासाठी नॅपकिन वापरले जातात. जसे तुझ्यासाठी डायपर वापरतो तसेच हे डायपर आहेत. त्यापेक्षा अधिक तिला काही सांगायची गरज लागली नाही. पण ती कांती झाल्यावर मी तीला योग्य प्रकारे समजवून सांगितलं 

५. चुकीचे शब्द किंवा शिव्या

 मुलांच्या कानावर मोठ्यांच्या तोंडून काही शिव्या किंवा असभ्य शब्द पडतात. काही दिवसांनी मुलेही तेच शब्द वापरू लागतात. उदा. च्यायला. हा शब्द बोलता बोलता पालक सहजपणे वापरतात. मग मुलांनी तो वापरला की त्यावर पालक लगेच ओरडण्याचे किंवा फटका देण्याचे अस्त्र वापरतात. पण मुळातच हे चुकीचे शब्द असतात आणि कोणीही ते वापरू नयेत असेच त्यांना सांगावे.

६. लोक मरतात म्हणजे काय

 हा प्रश्न तर हरेक लहान मूल विचारतेच. घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा पाळीव प्राणी हे मुलांसमोर मरण पावले तर त्यांना हा प्रश्न पडणे अगदीच साहाजिक आहे. अशा वेळी मुलांना जीवन - मरण, आयुष्याचे चक्र असल्या गोष्टी सांगण्यापेक्षाही मरणानंतर माणूस आकाशात तारा होतो आणि नंतर पुन्हा नव्या रुपात जन्माला येतो हे सांगणे योग्य. का़रण आकाशात असंख्य तारे दिसत असल्याने मुलांना या गोष्टी सहजपणे पटतात. आपल्याला काहीतरी खोटे सांगितले आहे असे वाटत नाही.

७. आईवडिलांचे वाद

घरातील मोठ्यांचे qकवा पालकांचे वाद तर प्रत्येक घरात होतात. पण त्याचा मुलांच्या मनावर परिणाम होतो. पालक लहान मुलांना भांडू नये असे सांगतात त्यामुळे मोठे का भांडतात असा प्रश्न त्यांना पडतोच. मात्र मुलांना खेळात जशी भांडणे होतात तसेच एखाद्या गोष्टीविषयी मते न पटल्याने वाद होतात हे सांगावे.

८. आईवडिलांची जवळीक

काही वेळा मुले पालकांना जवळ आलेले पाहातात आणि मग हे तुम्ही काय करता असा प्रश्न त्यांना पडतो. तेव्हा प्रेम करणाèया व्यक्ती एकमेकांना मिठी मारतात असे समजावणीच्या सुरात सांगावे. अगदीच मोठ्या मुलांना लैंगिक संबंधांचे ज्ञान असेल तर ते त्याविषयी प्रश्न विचारतात. तेव्हा त्यांच्या प्रश्नांना सकारात्मक उत्तरे द्यावी मात्र आत्मविश्वासाने बोलावे आणि न रागावता, चिडता खूप चर्विचरण न करता उत्तरे द्यावी.

९. भावंडांपैकी अधिक प्रेम कोणावर

 घरात दोन मुले असतील तर हा प्रश्न पडतो. दोन मुलांमधील प्रत्येक गोष्टीत स्पर्धा असते. आणि मोठ्या मुलाला लहानावरच जीव आहे असे वाटत राहाते. त्यामुळे मोठ्या मुलांना पालकांच्या प्रेमाविषयी थोडी असुरक्षितता वाटते. मग मुलांच्या मनात हे प्रश्न येतात. त्यांचा प्रश्नाला उडवून न लावता संवदेनशीलपणे त्यांच्या प्रश्नाला उत्तरे द्या. कारण एखाद्या पालकाचा एका मुलाप्रती असलेला ओढा दुसèया मुलाला त्वरीत जाणवतो.

मुलांना अजूनही बरेच प्रश्न पडलेले असतात. त्यांना प्रश्न पडतात, चिकित्सा करत असतात. त्यांच्या वयानुरुप प्रश्नांना उत्तरे द्यावीत. मुलांचा टीव्ही पाहण्याचा, मोबाईल खेळण्याचा वेळ सीमित करावा. तसेच इंटरनेटचा मर्यादित वापर करायची परवानगी द्यावी. त्यामुळे प्रश्न संपणार नाहीत मात्र त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती नक्कीच जाणार नाही.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon