Link copied!
Sign in / Sign up
12
Shares

अश्याप्रकारे मुलांना शाळेत जायला तयार करा.

 

शाळा हा मुलांच्या सामाजिक जीवनाची सुरवात करणारा खूप मोठा टप्पा मानला जातो. शाळेचा पहिला दिवस हा बऱ्याच मुलांसाठी त्यांच्या पालक आणि सांभाळणाऱ्या लोकांपासून खूप वेळ दूर राहण्याचा आणि अगदी अनोळखी लोकांनी भरलेल्या ठिकाणी जाण्याचा पहिलाच दिवस असतो. तुमच्या मुलाची अभ्यासाची तयारी करवून घेणे हि तर खूप नंतरची गोष्ट आहे,त्या आधी भावनिक आणि सामाजिकदृष्टया मुलाला शाळेत जाण्यासाठी तयार करणे गरजेचे ठरते. शाळा हे असे ठिकाण असते जिथे नियम,शिस्त आणि रोजच्या वेळा पाळाव्या लागतात-ज्याची सवय मुलांना घरी असतांना नसते.शाळेत मुलांना वर्गामध्ये खूप वेळासाठी एकाच ठिकाणी बसून राहावे लागते. या सर्व नवीन गोष्टींची सवय होण्यासाठी मुलांना थोडा वेळ लागतो आणि यात तुम्ही नक्कीच मुलाची मदत करू शकता. शाळेत जाणे सुरु केल्यानंतर मुलाला कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागेल,यासाठी त्यांना तयार करा.

खाली दिलेल्या या मार्गांनी तुम्ही मुलाला शाळेत जाण्यासाठी तयार करू शकता:

१] आता एका नव्या वेळापत्रकाची सुरुवात होणार आहे हे ति/त्याला सांगा. ठरलेल्या वेळेवर झोपावे आणि उठावे लागेल यासोबतच दररोज काही ठराविक तासांसाठी ती/त्याला शाळेत राहावे लागणार आहे हे हि सांगा.

२] मुलासोबत शाळेला भेट द्या जेणेकरून तिथल्या परिसराशी तो परिचित होईल. शक्य असल्यास शिक्षकांनाही भेटi.

३] तुमच्या मुलाला सांगा की ,शाळेत त्याला भेटणारी सर्व मुले त्याच्याइतकीची घाबरलेली आणि अस्वस्थ असणार आहेत पण यासोबतच त्याला विश्वासात घेऊन हे हि सांगा कि त्याला काही नवीन आणि खूप छान मित्र मिळणार आहेत आणि त्याला खूप मजा येणार आहे.

 ४] शक्य असल्यास,शाळा सुरु होण्याआधी तुमच्या मुलाशी मैत्री होऊ शकेल अशा एखाद्या वर्गमित्राशी त्याची भेट घालून द्या. याने शाळा सुरु होताच त्याचे आधीच मित्र बनलेले असतील.

५] तुमच्या मुलाने या आधी बालवर्ग पूर्ण केलेला असेल तर आई बाबांपासून जास्त वेळासाठी दार राहणे त्या/तिच्या साठी जास्त अवघड जाणार नाही.

६] शाळेविषयी मुलांशी सकारात्मक बोला -म्हणजेच शिकणे,कोणत्याही समस्येचे उत्तर शोधण्यासाठी विचार करणे या गोष्टीबद्दल त्यांना हलक्याफुलक्या पद्धतीने समजावून सांगा आणि शाळेबद्दल मुलांना कोणतीही शंका/ प्रश्न असल्यास तुमच्याशी बोलायला मुलाला प्रोत्साहित करा.

७] मुलाला स्वावलंबी बनण्यासाठी प्रोत्साहित करा जेणेकरून मदतीसाठी त्याला शाळेत कुणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.जसे कि,स्वतागृहाचा वापर एकट्याने करणे,स्वतःच्या पाण्याच्या बाटलीतून पाणी पिणे,स्वतःच्या सर्व वस्तुंची काळजी घेणे त्याला शिकवा.

८] स्वतःचे नाव विचारल्यानंतर आणि तीर कुणी बोलावल्यानंतर कसा प्रतिसाद द्यावा हे मुलांना शिकवा. शिक्षक आणि इतर मुलांना स्वतःचा परिचय कसा द्यावा हे हि मुलांना सांगा.

९] मुलांना नेहमी प्रोत्साहित आणि उत्साहित करा. शाळेत एखादा दिवस चांगला गेला नाही तर नेहमीच असे होत नसते आणि उद्या येणारा नवीन दिवस चांगल्या गोष्टी घेऊन येत असते म्हणून तर शाळेत जाणे हि खूप छान गोष्ट आहे, असे मुलांना सांगत राहा.  

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon