Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

तुमच्या मुलांसोबत बाहेर जाताना या गोष्टी लक्षात ठेवा

आपल्या लहानग्यांसोबत बाहेर जाणे म्हणजे थोडे तयारीचे काम असले तरी त्यांचा निरागस आणि लडिवाळ सहवास मजेशीर असतो. बाहेर असतांना वातावरण आणि त्यांचा मूड कसा आहे यावर बरेच अवलंबून असते आणि सोबतच त्या दिवशी तुमचे नशीब पण चांगले असावे लागते.! प्रसंगाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन बदलल्यास अनेक गोष्टी सहज होतील. तुमची बाहेर एखादी पिकनिक असेल तर तुमच्या लहानग्यांना कसे सांभाळावे याच्या काही टिप्स आम्ही तुमच्यासाठी खाली दिल्या आहेत .

१) मुलांवर लगेच रागावू नका 

एक गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की लहान मुलांना नखरे करणे चांगलेच जमते. तुमच्यासोबत बाहेर असतांना त्यांच्या या नखर्यांचा सामना तुम्हाला करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. इथे महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही अशावेळी धीर बाळगायला हवा. शांततेने घेतल्यास काम सोप्पे होते. लहान मुलांना त्यांच्या मनातल्या गोष्टी कशा व्यक्त करायच्या हे माहित नसते. 

२) समान वागवणूक

चांगल्या अनुभवासाठी तुमच्या पाल्याला समानतेने वागवा. त्यांना समानतेने वागवणे गरजेचे आहे. जर तुम्ही दोघांनी काय करायचे ते ठरवले तर मुलांना त्यांच्या निर्णयांच्या महत्त्वाची जाणीव देखील होईल. दोघांच्या आवडी एकमेकांना सांगा. गप्पा-गोष्टी करण्यापेक्षा अजून कोणती पद्धत तुमच्यातले नाते घट्ट करण्यात चांगली असू शकेल?

३) जागरूक राहा, लक्ष दया

लहान मुले नेहेमीच प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत उत्सुक असतात, ही गोष्ट तुम्हाला माहीतच आहे. आणि घराबाहेर तर त्यांची उत्सुकता अजूनच वाढलेली असते. आणि या उत्सुकतेच्या जागा वाढवणारे बाहेरचे जग तर घरापेक्षा शेकडो पटीने मोठे असते. अशावेळी या मुलांकडून काही ‘तुफानी’ गोष्टी घराबाहेर असतांना घडू शकतात. मुले सगळीकडे फिरणार, पळणार, मस्ती करणार. तेंव्हा तुम्ही नेहमी सतर्क राहणे गरजेचे असते. कारण तुमची काही क्षणासाठी नजर हटते आणि मुले सरकन इथून तिथे गेलेले असतात. 

४) तयार राहा

तयार राहा. यास दुसऱ्या शब्दात सांगणे नाही. कधी कोणती आणि कशाची गरज पडेल हे सांगता येत नाही. तुमचे बाळ अजूनही डायपर घालत असेल तर एखादे जास्तीचे सोबत राहू द्या. नेहमी एक प्रथमोपचार म्हणजे फर्स्ट एड कीट सोबत ठेवा. आत्ताच आपण पहिलं की मुले किती खेळकर असतात ते. त्यांचे लक्ष न देता धावणे, पळापळी करणे यातून अंगाला काही लागण्याची किंवा जखम होण्याची शक्याता टाळता येत नाही. थोडक्यात, बाहेर जातांना तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना गरजेच्या असू शकतील अशा गोष्टी सोबत ठेवा. जसे की, त्यांचे आवडते खेळणे, टोपी, स्वेटर इत्यादी. सर्वांसाठी तयार राहा.

५) सनस्क्रीन

तुम्ही एखाद्या दिवशी उन्हात बाहेर जाणार असाल तर तुमच्या मुलांना सनस्क्रीन लावणे विसरू नका. आणि पर्यायाने तुम्ही पण ते लावा. लहान मुलांची त्वचा नाजूक असते. सूर्याच्या उष्णतेने त्यांची त्वचा लगेच संवेदनशील बनते. लाल चट्टे, टॅन, त्वचेची आग होणे हे सर्व टाळण्यासाठी नेहेमी बाहेर जाण्याच्या अर्धा तास अगोदर सनस्क्रीन जरूर लावा. नंतर त्रास सहन करण्यापेक्षा आधीच काळजी घ्या.

६) खाद्यपदार्थ

 चिडलेले लहान मुल म्हणजे भूक लागलेले लहान मुल. तुम्ही याकडे सकारात्मकतेने पाहिल्यास याचाच अर्थ- पोट भरलेले असले की मुले आनंदी राहतात- असा देखील होतो. तुमच्या बाहेर जाण्याच्या वेळेला पुरेल असे खाद्यपदार्थ सोबत ठेवा. हे स्नॅक्स जंक फूड असावे असे काही नाही. फळे, वेजिटेबल सॅन्डविच आणि बिस्किटे अशा स्वरुपात काही खाद्यपदार्थ बाहेर जाताना सोबत असु दया.

७) पाणी

अनेकजण दिवसभरात किती पाणी प्यायलो याचा हिशोब चुकवतात. तुमच्या मुलांच्या बाबतीत हे होऊ देऊ नका. इकडे तिकडे खेळतांना, मस्ती करतांना त्यांना भान राहत नाही. ऊन असेल तर पाण्याची अजूनच गरज लागते. त्यामुळे बाहेर जाताना पाण्याची बाटली सोबत ठेवा किंवा गरज पडल्यास विकत घ्या. पाणी न पिल्याने होणारे डीहायड्रेशन झाल्यास अजून एक नवीन समस्या तुमच्यासाठी उद्भवेल.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon