Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

मुलांना अति लाडावू नका, त्यांना स्वतःचे निर्णय घेऊ द्या !


बहुतांशी पालकांकडून नकळतपणे अतिपालकत्वाची चूक घडते. जर कुणी हे लक्षात आणून दिले नाही, तर त्यांना कळतही नाही की ते अतिपालकत्वाचे अपराधी आहेत. परंतु हे त्यांच्या लक्षात येईपर्यंत उशीरही झाला असेल; कारण अवास्तव लक्ष देणारे पालक बनणे हा मूल वाढवण्याचा योग्य मार्ग असू शकत नाही. तुम्ही अतिकाळजी करणारे पालक आहात की नाही, हे ओळखण्याची ५ चिन्हे खाली दिलेली आहेत:

१) त्याला त्याचे निर्णय घेऊ द्या 

बहुधा तुम्हाला तुमच्या अपत्याच्या भवितव्याची इतकी चिंता वाटत असते की, तुम्हाला तुमचे मूल नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीत कार्यरत असावे असे वाटते. मग तुम्ही त्यांना आवड नसेल अशाही क्लासेसमध्ये त्यांना भरती करता; कारण तुम्हाला वाटते की त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होईल. खरेतर हे करताना तुम्ही आपल्या बाळाला त्याच्या गतीने विकसित व्हायचा वेळ देत नाही.  वेगवेगळ्या वयोमानात मुले वेगवेगळ्या गोष्टींना प्राधान्य देतात; म्हणून त्यांच्यावर जास्त गोष्टी लादू नका.

२) त्यांना जबाबदाऱ्या न देणे 

त्यांची दैनंदिन कामे तुम्हीच करता; कारण तुम्हाला वाटते की ते करायला ती समर्थ नाहीयेत किंवा ते करताना ती चुकली, तर त्या सुधारण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाहीय!

त्यांना थोडया जबाबदाऱ्या द्या. म्हणजे जसजशी ती मोठी होत जातील; तसे त्यांना कळून येईल की प्रत्येक कृतीला परिणाम असतात.

३) हेलिकॉप्टर पालक 

हेलिकॉप्टर पॅरेंट ही संज्ञा अशा पालकांसाठी वापरतात, जे नेहमी आपल्या पाल्यांभोवती भिरभिरतात. जर तुमच्या पाल्याला परिक्षेत कमी गुण पडले म्हणून तुम्ही शिक्षकांना फोन करून त्यांच्याशी हुज्जत घालत असाल; तर तुम्ही हेलिकॉप्टर पॅरेंट आहात! दुसरे प्रौढ तुमच्या पाल्याला कशी वागणूक देतात, यावरुन त्यांच्याशी वाद घालणे हे योग्य लक्षण नाही.  कोणाबरोबर आपला वेळ खर्च करणे योग्य आहे आणि कोणाबरोबर नाही; हे त्यांनी शिकणे गरजेचे आहे.

४) अपयश पचवता न येणे 

आपले मूल अपयशी होताना पाहणे हे कोणत्याही पालकाला आवडत नाही. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना अपयश येऊच नये यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करावेत! पालक म्हणून तुम्ही नेमके करावयाची गोष्ट म्हणजे त्यांच्या अपयशाच्या वेळी आणि जेव्हाही त्यांना आधाराची गरज लागेल, तेव्हा त्यांच्या सोबत राहा. नेहमी त्यांचा अपयशापासून बचाव करणे हे त्यांची सज्ञान बनण्याची आणि त्यांच्या चुकांपासून शिकण्याची संधी हिरावून घेते.

५) त्यांच्या पसंतीविरुद्ध वाद घालणे

तुम्हाला जरी वाटत असेल की एखादी गोष्ट तुमच्या पाल्यासाठी सर्वोत्तम आहे; पण तुमच्या पाल्याचे मत वेगळे असू शकते. कदाचित तुम्ही बरोबर असू शकता की, तुमचे मूल त्यांना पाहिजे त्या कपड्यांमध्ये अथवा हेअरकट मध्ये किती हास्यास्पद दिसेल! पण तुमची मते त्यांच्या गळी उतरवणे हे त्यांना तुमचा आदर करण्याऐवजी तुमच्यावर चीड आणण्यास प्रवृत्त करु शकते. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon