Link copied!
Sign in / Sign up
21
Shares

मुलांमध्ये लोभीपणा (हावरटपणा) वाढू नये या करता या गोष्टी करा.

आपल्याला एखाद्या गोष्टीची आऴश्यकता नसतानाही ती गोष्ट आपल्याकडे असावी असं वाटतं असतं. त्यामुळे बऱ्याचवेळा आपण नेहमीचं एखाद्या ठिकाणी 'सेल'चालू असेल तर आकर्षित होतो आणि आवश्यक नसलेल्या गोष्टींचीही खरेदी करतो. सर्वोत्तम गोष्ट आपल्याकडे असावी, असं आपल्याला वाटतं, पण त्यापेक्षाही जास्त प्रमाणत ती गोष्ट आपल्याकडे असावी, असी आपली इच्छा असते.

आपला हाच गुणधर्म मुलांमध्येही उतरतो. ते आपला लोभीपणाचा हा स्वभाव आत्मसात करतात. बऱ्याच वेळा आपलं ताट पूर्ण भरलेलं आहे की नाही, यापेक्षा दुसऱ्याच्या ताटात पुरेसं अन्न आहे का ? हे जास्त महत्त्वाचं आहे हे मुलांना शिकवायला हवं.

मुलं पाच-सहा वर्षाचं झाल्यावर ते बालवाडीत जायला लागतं. तिथे त्यांची नव्या मित्रांशी ओळख होते. त्यामुळे त्या मित्रांकडे असलेल्या वस्तू आपल्याकडेही असाव्यात यासाठी मुलं हट्ट करायला लागतात. ही खूप सामान्य बाब आहे. पण त्यांच्या या स्वभावावर पालक म्हणून तुम्ही नियंत्रण ठेवणं खूप आवश्यक आहे.

जर एखादी गोष्ट आवश्यक असेल आणि मुलं त्यासाठी हट्ट करत असतील, तर ती त्याला घेवून द्या. त्यांच्याकडे असलेल्या गोष्टींचे त्यांना महत्त्व पटवून द्या, तसेच त्यांना न मिळालेल्या गोष्टींसाठी त्रागा करणं कसं चुकीचं आहे हेही सांगा. त्यासाठी पुढील गोष्टी करणं खूप आवश्यक आहे.

१. मुलांचा हावरटपणा वाढण्याचे प्रमूख कारण त्यांचे मित्र असतात. 'जर त्याच्याकडे एकादी वस्तू आहे, तर माझ्याकडे का नाही ?' असं मुलांना वाटतं असतं. असा परिस्थिती त्यांना लगेच रागवू नका. तसेच त्यांना ' आपल्या कुंटूंबात असं...' अशी कारणं सांगत समजावू नका. त्यांना तुम्ही एखादी वस्तू घेवून देणार नसाल, तर त्यामागचे कारण प्रामाणिकपणे सांगा.

२. मुलांमध्ये हावरटपणा वाढण्याचा आणखी एक स्रोत म्हणजे टीव्ही. जाहिराती उद्यान्मुख इंडस्ट्री म्हणून समोर येत आहे. लहान मुलं कशानं आकर्षित होतात हे त्यांना चांगल्याप्रकारे माहिती आहे. बऱ्याच वेळा टीव्हीवर लहान मुलांसाठी योग्य नसलेल्या गोष्टींचीही ते अशाप्रकारे जाहिरात करतात, की तुमची मुलं तुमच्याकडे त्या वस्तुंचा हट्ट धरतात.

अशा परिस्थितीत त्यांची मागणी लगेच धुडाकावून लावू नका. ते काय मागताहेत हे शांतपमे ऐकून घ्या. जर त्यांची मागणी उचित असेल, तर ती मान्य करण्यात काहीही चुकीचं नाही. पण जर त्यांची मागणी उचित नसेल, तर ती गोष्ट कशी चुकीची आहे, हे त्यांना पटवून द्या. योग्य तर्काने अनेक गोष्टीवर विजय मिळवता येतो.

३. आजी आजोबा आपल्या नातवंडांचे सर्व हट्ट पुरवतात. त्यांच्या कोणत्याही गोष्टीला ते नाही म्हणत नाहीत. ते त्यांच प्रेम असतं. पण त्यांच हे प्रेम मर्यादेत असलं पाहिजे यावर तुम्ही लक्ष ठेवणं आवश्यक आहे. मुलांचा प्रत्येक हट्ट पुरवतं गेलं, तर मुलांना चुकीच्या सवयी लागू शकतात.

काही वेळा पालकही जाणतेपणे किंवा अजाणतेपणे त्यांच्या मुलांच्या सर्वच मागण्या मान्य करत त्यांचे हट्ट पुरवतं असतात. पण त्यांना काही वर्षांनी त्यांच्या या चुकीची जाणीव होते. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे तुम्ही योग्य वेळीच काळजी घ्या. त्याऐवजी तुमच्या मुलांना बचतीची सवय लावा. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. त्यामुळे त्यांना हव्या असलेल्या गोष्टी ते त्यांच्या बचतीतून खरेदी करू शकतील.           

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon