Link copied!
Sign in / Sign up
18
Shares

मुलांची एकाग्रता कशी वाढवाल

लहान मुलं खूप चंचल असतात. त्यांचं लक्ष खूप लवकर भटकतं. ते एकाच वेळा अनेक गोष्टी करत असतात. लहान मुलं ही निसर्गत:च खूप उत्साही असतात. तसेच एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून स्वत:ला एकाग्र ठेवणं त्यांच्यासाठी अशक्य असतं. त्यामुळं मुलांना हातातील एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करून ते पूर्ण करण्यास शिकवणं हे पालकांसमोरील मोठं आव्हान असतं. आपण इथं मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी काही पद्धतींची चर्चा करणार आहोत.

१.  खेळातून एकाग्रता वाढवणे

लहान मुलं ही खेळातून खूप गोष्टी शिकतात हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी खेळांचा आधार घ्यावा. तसेच त्यांनी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि रोजच्या खेळण्यांपासून दूर ठेवा. ज्या खेळांसाठी नियोजन व विचार करावा लागतो. तसेच बुद्धीच वापर करावा लागतो असे काही खेळ त्यांना शिकवा. त्यामुळे त्यांची एकाग्रता वाढण्यास मदत होते. पिक्चर पझल आणि क्रॉसवर्डसारखे काही खेळ त्यांना व्यस्त ठेवून त्यांची एकाग्रता वाढवतात.

२.  आरोग्यदायी आहार

तुमची मुलं काय खातात त्यावर त्यांची एकाग्रता अवलंबून असते. साखरेचे प्रमाण जास्त असलेला आहार मुलांना सुस्त आणि मंद बनवतो. साखरेचे लहान मुलांमध्ये नैसर्गिक आकर्षण असते. पण त्यावर नियंत्रण ठेवणे खूप आवश्यक आहे. अंडी, बदामसारखे प्रोटीनसमृद्ध पदार्थ मुलांची एकाग्रसता वाढवण्यास मदत करतात. तसेच हिरव्या पालेभाज्यांचाही फायदा होतो.

३.  वातावरण

मुलांची एकाग्रता ही आजूबाजूच्या वातावरणावरही अवलंबून असते. काही मुलांना शांत वातावरण आवश्यक असते. तर काही मुलांसाठी काही तरी अॅक्टीव्हिटी सुरू असलेले वातावरण आवश्यक असते. तुम्हाला तुमचं मुलं कोणत्या प्रकारात मोडते हे तुम्ही ओळखणं आवश्यक आहे. पण मुलांचा लक्ष्य भटकवणाऱ्या गोष्टांपासून जसे मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेटपासून मुलांना दूर ठेवणे कधीही चांगले. तसेच मुलांना लागणाऱ्या गोष्टी त्यांच्या हातारासून जवळच्या अंतरावर ठेवा. त्यामुळे त्यांची एकाग्रता भंग होणार नाही.

४.  मुलांना बक्षीस द्या, त्यांचं कौतूक करा

 मुलांना एखाद काम पार पाडल्यास त्यांना बक्षीस द्या. त्यामुळे त्यांना एखाद्या गोष्टीवर फोकस करून ते पुर्नात्वास नेण्यास प्रोत्साहन मिळते. त्यामुळे त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पण तुम्ही त्यांना काय बक्षीस देता हेही तेवढंच महत्त्वाच आहे. मुलांना कोणतं बक्षीस हवंय हे त्यांना विचारणं कधीही योग्यच. तसेच त्यांना नेहमी वेगवेगळे बक्षीस द्या. तुम्ही त्यांना नेहमी एकच बक्षीस देत गेला, तर त्यांची त्या गोष्टीतील आवड कमी होईल.

५. धीर धरा

 तुमच्या मुलांशी संबंधित सर्वच प्रश्नांवर धीर धरणं हा सर्वोत्तम उपाय आहे. तुमची मुलं एखादी गोष्ट पूर्ण करत असताना तुमच्याही संयमाची परीक्षा असते. त्यावेळी तुम्हीही निराश आणि हताश होऊ शकता. पण जर तुम्ही रागात आला आणि स्वत:वरील नियंत्रण गमावले, तर परस्थिती आणखीच चिघळेल. आपल्या मुलावर चिडण्यामुळे त्यांच्या मनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही रागावलात, तर रागावणं ही खूप सामान्य बाब असल्याची शिकवणं त्यांच्या मनावर होते. त्यामुळे अशाप्रसंगी पालकांनी धीर धरणे आणि शांत राहणे खूप आवश्यक असते.       

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon