Link copied!
Sign in / Sign up
32
Shares

मुलांची दृष्टी सुधारा या ५ उपायांनी

 मुलांच्या छोट्या-छोट्या आरोग्य समस्या तुम्हाला काळजीत टाकतात कारण एक पालक म्हणून आपण नेहमीच जागरूक असता.तुमच्या मुलाची नजर कमजोर झाली आहे आणि त्याला तात्पुरता नव्हे तर कायमचा चष्मा वापरावा लागणार असेल तर काळजी करू नका ,कारण आम्ही तुमच्यासाठी एक चांगली बातमी घेऊन आलो आहोत.काही सोप्या उपायांनी तुम्ही मुलांची नजर कमजोर होण्यापासून वाचवू शकता.

चला तर, असेच काही साधे परंतु परिणामकारक उपाय पाहूया ज्यामुळे मुलांची दृष्टी सुधारण्यास नक्की मदत होईल.

१. व्यायाम

नजर तीक्ष्ण करण्यासाठी काही साधे व्यायाम जसे कि,डोळे गोल फिरवणे. (जेव्हा तुम्ही मुलांना काही समजावत असता तेव्हा मुले बरेचदा अशाच पद्धतीने डोळ्यांची हालचाल करतात!) घड्याळाच्या उलट आणि सुलट दोन्ही दिशेने डोळ्यांची हालचाल करण्याने या व्यायामाची सुरवात करायला सांगा. तुमचे मूल बराच वेळासाठी टीव्ही किंवा कॉम्पुटर समोर बसत असेल तेव्हा २० ते ३० वेळा डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करायला सांगा. याने डोळ्यांचा कोरडेपणा कमी होईल 

एकाच ठिकाणी नजर स्थिरावण्याने डोळ्यांवर बराच ताण येतो यासाठी वेगवेगळ्या अंतरावरील वस्तू वर नजर फिरवत राहण्याने फायदा होईल. तुमच्या मुलाच्या डोळ्यांसमोर त्याचे बोट किंवा एक पेंन्सिल धरायला सांगा आणि भिंतीपासून सुमारे १० फुटाच्या अंतरावर त्याला उभे करा. पेन्सिल वर नजर स्थिर करू द्या आणि थोड्या वेळानंतर भिंतीवर नजर स्थिर करू द्या.मुलांचे काही स्मरणशक्तीचे खेळ घ्या ज्यात एक चित्र बघायचे असते आणि ते चित्र डोळ्यांसमोरून जाण्याआधी त्यातील जास्तीत जास्त गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात.

२. आहार

नजर सुधारण्यासाठी योग्य आहार घेणे खूप महत्वाचे ठरते आणि यासाठी पालक,ब्रोकोली आणि कोबी खाण्याचा सल्ला आर्वजून दिला जातो कारण यात कॅल्शियम,अ,ब आणि क १२ हि जीवनसत्वे मोठया प्रमाणात असतात.गाजर,ढोबळी मिरची,अंडी आणि काजू,बदाम यामुळे हि दृष्टी सुधारण्यास मदत होते. यांचा वापर ज्युस आणि सलाद च्या रूपात तुमच्या मुलांच्या रोजच्या आहारात करा.डोळ्यांच्या रेटिनाचे आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर असणारे ओमेगा ३ हे माशामध्ये भरपूर प्रमाणात आढळते. तुमच्या मुलाच्या आवडीनुसार मासे फ्राय करून किंवा त्यांची भाजी बनवून जास्तीत जास्त खायला घाला.

३. बाहेर फिरायला जा.

तुमचे मूल घरात असते तेव्हा शक्यतो टीव्ही बघत असते किंवा कॉम्पुटर किंवा स्मार्ट फोनवर गेम खेळत असते. या सर्व गोष्टींमुळे नजर कमकूवत होते आणि डोळ्यांवर मोठ्या प्रमाणात ताण येतो.तुमच्या मुलाला रोज बाहेर फिरायला घेऊन जा जेणेकरून नैसर्गिक सूर्यप्रकाश आणि हिरवाई यामुळे त्याच्या नजरेत खूप सुधारणा होईल आणि दूरचे न दिसण्याची समस्या आटोक्यात येईल.

४. चष्मा काढून ठेवा.

तुमच्या मुलाला चष्मा लागला असेल तर दररोज किमान काही वेळासाठी त्याला चष्मा काढून ठेवायला प्रोत्साहित करा.याने डोळ्यांच्या स्नायूंना मिळेल कारण,चष्मा काढून ठेवल्यानंतर नजर एका ठराविक ठिकाणी स्थिर करून पाहण्याची गरज उरत नाही.घरी असतांना जेवण किंवा दातांना ब्रश करण्यासारखी छोटी -छोटी कामे करतांना तसेच बाहेर फिरायला जातांनाही चष्मा उतारावल्याने मुलांच्या डोळ्यांना खूप आराम मिळू शकतो.

५.तपासणी

मूल कमी दिसत असल्याची तक्रार करत नसेल तरीही नियमितपणे डोळ्यांची तपासणी करवून घेणे अत्यंत गरजेचे असते. आता बहुतेक शाळांमध्ये हि कॉम्पुटर द्वारे डोळे तपासणीची शिबिरे भरवली जातात.

तुमच्या मुलाला चष्मा लागलेला असला तरीही नजर सुधारण्यासाठी आणि दृष्टी चांगली राहण्यासाठी वरील उपाय नक्की करून पहा आणि दर ६ महिन्यांनी एकदा डोळे तपासून घ्या.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon