Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी स्वत:ची मानसिक तयारी कशी कराल ?


आपल्या मुलाची जेव्हा एखादी पर्यायी शस्त्रक्रिया करावी लागते तेव्हा ही गोष्ट पचविणे एक पालक म्हणून थोडे जड जाते. पर्यायी शस्त्रक्रियेची तारीख ही संभाव्य असते. अचानक कराव्या लागणार्‍या शस्त्रक्रियेपेक्षा पर्यायी शस्त्रक्रिया ही वेगळी असते. पर्यायी शस्त्रक्रियेपूर्वी तुम्हाला स्वत:ला आणि मुलाला शाररिक, मानसिक, भावनिक तयारी करायला वेळ मिळतो.

१) माहिती जमवा 

ज्याक्षणी तुम्ही मुलाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेता तेव्हापासून त्या शस्त्रक्रियेची सर्वंकष माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या ज्ञानातदेखील भर पडते. शस्त्रक्रियेची प्रक्रिया समजून घ्या. सर्व माहिती, प्रक्रिया आणि पालकांसाठी व मुलांसाठी असलेली माहिती साधने विचारा.

२) शस्त्रक्रियेविषयीचा दौरा करा 

अगोदर ऑपरेशनविषयी सर्व विचारून घ्या. यामुळे आपल्याला शस्त्रक्रियेच्या दिवशी नेमके काय आणि कसे घडणार आहे याची माहिती मिळते आणि आपण त्या परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार राहू शकतो. यामध्ये शस्त्रक्रियेच्या दिवशी तुम्हाला बरोबर काय न्यायचे आहे आणि कोणत्या सुविधा मिळणार आहेत याची सविस्तर कल्पना मिळते.

३) प्रश्नांची यादी करा 

शस्त्रक्रियेसबंधी काही शंका किंवा मनात प्रश्न असतील तर ते एका कागदावर लिहून काढा. असे प्रश्न पडणे स्वाभाविक असल्याने त्या विषयी कमीपणा संकोच वाटून घेण्याची गरज नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही बालरोग तज्ज्ञांना क्लिनिक रुग्णालयात भेटाल तेव्हा ही यादी घेऊन जा आणि त्रासदायक वाटणारे सर्व प्रश्न विचारा.डॉक्टरांचे पूर्ण बोलणे झाल्यानंतर तुमचे प्रश्न विचारा.

४) भावनिकदृष्टया सक्षम आणि प्रामाणिक रहा 

तुमची मुले तेव्हाच उत्तम प्रतिसाद देतात जेव्हा तुम्ही त्यांच्याशी प्रामाणिकपणे वागता. या सर्व प्रक्रियेविषयी मनात भिती दु:ख,शंका असणे स्वाभाविक आहे. तुमच्या मनात नेमकी काय चलबिचल सुरू आहे हे मुलांसमोर दाखवू नका. याउलट त्यांना हे सांगा की, तुम्हाला देखील त्याची काळजी आहे.

५) स्वत:ची काळजी घ्या 

आपल्या मुलाला शस्त्रक्रियेसाठी तयार करणे ही सोपी गोष्ट नव्हे. रोज स्वत:साठी थोडा वेळ काढा. मनावर आलेला ताण घालवण्यासाठी काही तरी आवड जोपासा. मनावरचा ताण घालविण्यासाठी विश्वासू व्यक्तीशी बोला. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon