Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

मुळा खाल्याने पोटच्या समस्यांवर हे फायदे होतात


मुळा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.हा एक प्रकारचा कंद आहे.याची भाजी, कोशिंबीर किंवा परोठे करतात. मुळाला एक प्रकारचा उग्र वास असतो. मुळा उष्ण गुणधर्माचा आहे. शास्त्रीय मताप्रमाणे मुळ्यात प्रथिने, कर्बोदके,फॉस्फरस आणि लोह असते. त्याची राख क्षारयुक्त असते. या मुळ्याचे आरोग्यविषयक फायदे पुढील प्रमाणे

आरोग्यविषयक फायदे

१. मुळ्याच्या ताज्या पानांचा रस आणि बियांमुळे लघवी स्वच्छ होते. मूतखडाही बरा होतो.

२. थंडीत भूक वाढते. अशा वेळी मुळा खावा. त्यामुळे गॅसेसचा त्रासही कमी होतो.

२. मूळव्याध असणाऱ्या रुग्णांना मुळ्याची पाने अथवा त्यांचा रस दिल्याने फायदा होतो. मुळ्याच्या कंदांपेक्षा त्याच्या पानाच्या रसात अधिक गुणधर्म आढळतात

३. जेवणात कच्चा मुळा खावा. कोवळ्या मुळ्याची कोशिंबीर खाल्ल्याने चांगली भूक लागून अन्न व्यवस्थित पचते.

४. मुळ्यात ज्वरनाशक गुण आहेत. त्यामुळे तापात मुळ्याची भाजी खाल्ल्यास खूप फरक पडतो.

५. मुळ्याच्या पानांचा रस प्यायल्याने लघवी आणि शौचास साफ होते.

६. मुळ्याची पाने पचण्यास हलकी, रुची निर्माण करणारी आणि गरम आहेत. ती कच्ची खाल्ल्यास पित्त वाढते, मात्र तीच भाजी तुपात घोळवल्यास भाजीतल्या पौष्टिक गुणधर्मात वाढ होते.

असा हा बहुगुणी मुळ्याच्या विविध प्रकाराने आहारात वापरण्यात येतो. पुढील काही प्रकारे मुळ्याच्या आहारात वापर करण्यात येतो.

भाजी, कोशिंबीर आणि थालिपिठे-कोशिंबिरीसाठी पांढरा मुळा स्वच्छ धुवून, मुळ्याची भाजी करताना मुळा पाल्यासकट धुवून, बारीक चिरून घ्यावा. मुळ्याची पानांचीही भाजीही बनवता येते. कोवळ्या मुळ्याचे लोणचे .करतात मुळ्याची भाजी घालून ‘मुळा ढोकळी' केली जाते. कित्येक लोक मुळ्याची पाने चिरून त्यात हरबऱ्याच्या डाळीचे पीठ पेरून स्वादिष्ट भाजी करतात.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon