Link copied!
Sign in / Sign up
11
Shares

मुल झाल्यानंतर प्रणय (रोमांस) टिकवण्यासाठी पत्नीसाठी हे नक्कीच करा.

तुमच्या आयुष्यात नवीन पाहुण्यांचे आगमन झाल्यानंतर नवीन जबाबदाऱ्या वाढतात. काही महिने तुमच्या दोघांचे सगळे आयुष्य त्या बाळा भोवती फिरत असते हे दिवस खूप सुंदर असतात. परंतु या सगळ्या सुरवातीच्या दिवसानंतर तुमच्या दोधांमधील देखील प्रणय (रोमांस)टिकवून ठेवणे आवश्यक असते. त्यासाठी काही छोट्या-छोट्या गोष्टी देखील स्त्रियांना आनंद देतात. त्यांच्यासाठी थोडा वेळा काढा आणि पुढील काही गोष्टी नक्की करा

१. दोघांनी मिळून एखादा छंद जोपासा.

दोघांनी मिळून वेळात वेळ काढून एखादा छंद जोपासा. एखादा खेळ,खेळणे एकत्र सिनेमा बघणे, किंवा एखादी गोष्ट शिका. किंवा बाळाला एकत्र फिरायला घेऊन जा. यामुळे तुम्ही पत्नीबरोबर जास्त वेळ घालवू शकाल. तसेच त्यांना रोजच्या दिनक्रमामधून थोडा मोकळा वेळ मिळेल.

२. त्यांच्या आवडीच्या गोष्टी करा.

त्यांच्यासाठी एखादा नवीन पदार्थ करा, त्यांना शॉपिंगला घेऊन जा. त्यांना आवडत असेल तर प्रेमाने हेड मसाज द्या. त्यांना आवडणाऱ्या गोष्टी करण्याचा प्रायत्न करा. या छोट्या-छोट्या-गोष्टी देखील तुमच्यातलं प्रेम आणि रोमांस टिकवून ठेवायला मदत करतात.

३. रोमँटिक डेटला घेऊन जा.

एखादा दिवस सिनेमा आणि त्यानंतर रोमँटिक डिनरला घेऊन जा. किंवा एखाद्या आवडत्या रिसॉर्टला जाऊन पूर्ण दिवस त्यांच्या बरोबर घालावा.

४. सरप्राइज द्या.

प्रत्येकाला सरप्राईज हे आवडतं . यासाठी तुम्हांला खुप काही करायची गरज नाही. एखादा दिवस ऑफिस मधून लवकर घरी जा. किंवा जर तुमच्या पत्नी नुकत्याच ऑफिसला पुन्हा रुजू झाल्या असतील तर त्यांचा ऑफिस सुटायच्या वेळी त्यांना घ्यायला जा. फुले,गाजर चॉकलेट या गोष्टी आवडत असतील तर त्या आठवणीने ने घेऊन जा.

५. बेड टाईम फन

नाही..नाही बेड टाईम फन म्हणजे इथे आम्हांला ते खास क्षण सुचवायचे नाहीयेत. तर लवकर झोपायला जाऊन एकमेकांची मजा मस्करी करणे,एकमेकांचा दिवस कसा गेला याबाबत विचारपूस करणे. दिवसभरातुन कमीत-कमी दोघांसाठी हा रात्रीचा अर्धा तास एकमेकांसाठी राखून ठेवा. आणि या गप्पा नंतर जर तुमचे बाळ उठणार नसेल आणि जर तुमचा मूड असेल तर त्या खास क्षणांचा देखील आनंद घेऊ शकता. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon