Link copied!
Sign in / Sign up
51
Shares

मुल झाल्यावरही तुमच्यातले प्रेम असे टिकवा


मूल झाल्यानंतर जोडप्यातील नातेसंबंधात काही मूलभूत बदल होतात. याचे कारण त्यांचा बहुतांश वेळ हा मुलांच्या गरजा पूर्ण करण्यातच जात असतो आणि त्यांना स्वतःसाठी किंवा एकमेकांसाठी अत्यंत कमी वेळ मिळतो. बाळाची किंवा मुलांच्या वाढत्या मागण्या किंवा अपेक्षांशी कसे जुळवून घ्यायचे आणि दोघांत तिसरे आल्यानंतरही नवरा बायको म्हणून दोघांमधील प्रेम कसे बहरेल किंवा वृद्धींगत होण्यासाठी वेळ कसा काढावा ते जाणून घेऊया.

१) तारीख ठरवा आणि जुळवून आणा

 बाळ होण्याआधीही कदाचित आपण कामात व्यग्र असू आणि आता बाळाला सांभाळण्यासाठी आळीपाळीने व्यग्र राहात असाल. ते शक्य होते ते अर्थातच दोघांचा म्हणून असलेल्या वेळाचा त्याग करूनच. त्यामुळे एखादी तारीख किंवा दिवस ठरवून आपल्या जोडीदाराबरोबर चांगला दर्जेदार वेळ घालून एकमेकांचे बंध पुन्हा जुळवून घेऊ शकता. रात्री एकमेकांच्या साथीने केलेले किंवा एकमेकांसाठी केलेले जेवण एकत्र करू शकता. यामागची संकल्पना हीच की नियमितपणे आपल्या जोडीदाराबरोबर वेळ घालवावा. हा वेळ घालवण्याला प्राधान्य द्यावे आणि ही गोष्ट बाजूला पडू नये.

२) रात्रीचा फेरफटका

बाळ झोपी गेल्यानंतर दोघेच चांदण्या रात्री मोकळ्या हवेत फेरफटका मारा. मोकळ्या हवेत गेल्यावर मोेकळे वाटेल. बाळ जर बाबागाडीत झोपले असेल तर त्याच्या आरोग्याच्या दृष्टीनेही मोकळी हवा उत्तमच. चंद्रप्रकाशातील रस्त्यावरून फिरताना दिवसभराच्या घडामोडी एकमेकांना सांगा. अर्थात यासाठी शांत रस्ता किंवा बाग यांची निवड करा आणि तिथे प्रकाशाचा आणि वाहनांचा आवाज नसावा जेणेकरून बाळ झोपेतून जागे होणार नाही.

३)  आपले प्रेम व्यक्त करा

जोडीदाराने आपल्यासाठी केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी आठवा त्यामुळे पुन्हा प्रेमात पडाल. जसजसा काळ पुढे जातो तसा या सर्व गोष्टी गृहित धरायला सुरुवात होते. हीच वेळ आहे पुन्हा नव्याने शिकण्याची आणि आपल्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी जोडीदाराचे कौतुक करण्यास किंवा त्याची प्रशंसा करा. आनंदाचा प्रत्येक क्षण मिळावा यासाठी त्याने प्रयत्न केलेला असतो.

४) एक दिवस जोडीदाराला द्या सुट्टी

अगदी पूर्ण दिवस शक्य नसले तरीही जोडीदाराच्या कामात थोडीफार मदत केल्यास थोडासा रिकामा वेळ त्यालाही मिळू शकतो. दोघेही आळीपाळीने असे करू शकता. जोडीदारापैकी एकाने बाळाची काळजी घेतली तर दुसऱ्याला थोडी डुलकी काढायला किंवा आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर थोडा वेळ घालवता येईल त्यामुळे पुन्हा ताजेतवाने होण्यास अवसर मिळेल. त्यामुळे जोडीदाराला आपली, आपल्या कामाची, जबाबदारीची किंमत वाटते आहे आणि आपल्याला गृहित धरले जात नाही याची त्यांना सकारात्मक जाणीव होईल. त्याशिवाय नात्यांमधील प्रेम टिकवून ठेवण्यासाठी आपल्याकडून होणाऱ्या प्रयत्नांची जोडीदाराकडून दखल घेतली जाईल किंवा त्याची प्रशंसा होईल.

५) रोजच्या रोज हवा संवाद

रोज आपल्या जोडीदाराबरोबर बोलण्यासाठी कमीत कमी पाच मिनिटांचा तरी वेळ काढावा. बाळाच्या पालनपोषणात व्यग्र झाल्यानंतर एकमेकांच्या आयुष्यात काय घडते आहे याचा मार्ग विसरला जाणे सहजसोपे असते. दोघांमधल्या संवादात दरी निर्माण होता कामा नये. प्रत्येक दिवशी दिवसातील पाच मिनिटे काढून जोडीदाराला त्याचा दिवस कसा गेला हे विचारा आणि त्यांनाही आपल्या दिवसाविषयी जाणून घेऊ द्या. यावेळी एकमेकांच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष देण्याची खबरदारी जरुर घ्या. आपला जोडीदार काय सांगतो आहे याविषयी तर्क न करता किंवा निष्कर्ष न काढता ऐकून घ्या. स्वतःला जोडीदाराच्या जागी ठेवून पहा जेणेकरून अगदी थोडीशी सहानुभुती एकमेकांना घट्ट जोडून ठेवण्यास किती हातभार लावते ते पाहून आश्चर्यचकित व्हाल

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon