Link copied!
Sign in / Sign up
17
Shares

मुल झाल्यावर तुमच्यात हे अनपेक्षित बदल घडतात.

मुल झाल्यावर स्त्रीमध्ये अनेक शारीरिक बदल होतात हे प्रत्येकाला माहित आहे परंतु काही मुलाच्या येण्याने तुमच्यात अनेक अनपेक्षित बदल घडतात. जे तुम्हांला देखील अपेक्षित नसतात. हे बदल कोणते ते पाहणार आहोत.

१.भित्रेपणा आणि धीटपणा

भिती आणि धीटपणा हे दोन्ही विरुद्ध शब्द एकाच वेळी जरा विचित्र वाटत असलं तरी,बाळ झाल्यानंतर तुम्हांला या दोन्ही भावनांमधून जावे लागते तुम्ही मुल होण्याआधी जरी खूप धीट आणि धाडसी असला तरी तुम्ही मूळ झाल्यावर कदाचित मुलाच्या काळजीने मुलाच्याबाबतीत खुप हळव्या आणि भित्र्या होण्याची शक्यता असते. किंवा छोट्या-छोट्या गोष्टींना घाबरणाऱ्या तुम्ही तुमच्या मुलांसाठी काहीही करायला तयार होता. कशाच्या विरोधात उभे राहण्याची तुमची तयारी असत

२ .तुमचा दिनक्रम बदलतो. 

तुम्ही कितीही निशाचर असाल तरी तुम्ही मुल झाल्यावर आपोआप लवकर उठायला लागता. लवकर उठून बाळ उठायच्या आत सगळी आवश्यक कामे संपण्याचा मागे लागता. मुलाच्या झोपेच्या चक्रावर तुमचे झोपेचे चक्र अवलंबुन असते.

३. तुमचा प्राधान्यक्रम बदलतो

एकदा तुम्ही पालक झाल्यावर तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचे मुल असते तुमच्या सर्व गोष्टींचा प्राधान्य क्रम बदलतो. तुम्ही कोणत्याही गोष्टीचं प्लॅनींग करताना सगळ्यात आधी तुमच्या मुलाचा तुमच्या डोक्यात विचार येतो. त्याची/तिची सुरक्षितता त्याचे मुलाचे भविष्य याबाबत विचारा तुम्ही करू लागत. स्वतःपेक्षा मुलांच्या गरजांना प्राधान्य देऊ लागता.

४. तुम्ही गप्पा मारायला शिकता

तुम्ही कितीही अबोल असला तरी मुल झाल्यावर तुम्ही गप्पा मारायला शिकता.तुम्हांला तुमच्या मुलाच्या बाबतीत छोट्या-छोट्या गोष्टी मित्र आणि मैत्रीण तसेच कुटूंबातील सगळ्यांना सांगाव्याश्या वाटतात. तसेच बाळाशी सतत गप्पा मारायला लागल्यामुळे तुम्ही अबोल न राहता गप्पा मारायला शिकता

५. तुम्ही शांतता विसरून जाता.

शांतता काय असते हे तुम्ही पूर्णतः विसरून जाता.जर गोंधळ आणि गडबड आवडत जरी असेल तरी तुम्ही शांततेचा काही क्षण शोधायला लागता. बाळ झोपल्यावर तुम्हांला विश्रांती मिळते. तुम्ही झोपल्यावर नेमकं बाळ उठतं त्याला काय हवं नको ते बघणं आवश्यक असते. पण असे जरी असले तरी तु जास्त शांतत असेल तरी सुद्धा तुम्हांला अस्वस्थ व्हायला होते.

६. सतत मुलांचा विचार डोक्यात येतो

कोणतीही गोष्ट तुम्ही स्वतःकरता एकट्याकरता विकत घेत नाही. कोणतंही गोष्ट घेताना तुमच्या डोक्यात बाळाचा विचार सारख येत असतो.जर तुम्ही तुमच्या आवडत्या ठिकाळी जाऊन एखादा पदार्थ खाण्याचा विचार करत असताना मुलांसाठीदेखील काहीतरी खाऊ घेता. कपडे खरेदी करायला गेल्यावर आधी लहान मुलांसाठी खरेदी करता किंवा काही खर्डी केल्यावर मुलासाठी देखील काहीतरी खरेदी करतात. तुमचे असे स्वतंत्र काही राहत नाही ते तुमचे आणि मुलांचे असे होते. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon