Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

तुमच्या मुलं नसलेल्या मैत्रिणींशी या गोष्टी बोलू नका


आपल्यापैकी प्रत्येकाचेच असे काही मित्र-मैत्रिणी असतील, की ज्यांचे लग्न तर झालेय पण त्यांना अजून मुलंबाळ नाहीये. कदाचित ही त्यांची वैयक्तिक पसंती असू शकते किंवा वंध्यत्व समस्याही असू शकते. त्यामुळे याविषयी त्यांच्याशी बोलताना तुमच्याकडून काही असंवेदनशील वक्तव्य होणार नाही याची काळजी घ्या. बऱ्याच वेळा तशी वाक्य बोलत असताना आपण विचार करत नाही. आपण त्या वाक्यांना खूप सहज किंवा विनोदीपणे घेतो. पण तुमच्या बोलण्याने समोरचा व्यक्ती दुखायला जायला नको म्हणून है गोष्टी कधी बोलू नका.

१) तुला मुलं कधी होणार आहे ?

तुम्हाला कदाचित हा प्रश्न खूप सामान्य वाटेल. पण एखाद्या पार्टीत किंवा गेट-टुगेदरमध्ये जेव्हा लोकांचे तुमच्या बोलण्याकडे लक्ष असते अशावेळी तुम्ही हे वाक्य बोलल्यास काय होईल याची कल्पना करा. कदाचित तुमच्या मित्रमैत्रिणींना ते पालकत्वासाठी तयार नाहीत असं वाटत असेल. किंवा त्या दाम्पत्यापैकी एकाला मुलं हवं असेल आणि दुसऱ्याला नको असेल. तसेच काही वैद्यकीय समस्यमुळे ते मुलं जन्माला घालण्यास सक्षम नसतील. अशाप्रकारे प्रत्येक दाम्पत्याचं मुलं नसण्यामागची वैयक्तिक कारणे असू शकतात. त्यामुळे तो संवेदनशील विषय असतो. म्हणून या विषयावर खासगीमध्येच चर्चा करणे कधीही चांगले.

२) इतके वय झालेय आणि तरीही मुलं नाही ?

हा वाक्य खूप मनाला लागणारं आहे. आपल्याला बऱ्याचवेळा ज्यांना मुलं नाही अशा मित्रमैत्रिणींना मुलांच्या विषयावर बोलणं आवडतं नाही असं वाटतं. पण कदाचित त्यांना त्या विषयावर तुमच्यापेक्षाही जास्त बोलायला आवडतं असावं. त्यांना तुमच्या आयुष्यात काय सुरू आहे, हे तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडतं असेल. तसेच तुम्हीही त्यांच्या आयुष्याविषयी ऐकून घ्यावं असं त्यांना वाटतं असेल.

३) 'तुमच्याकडे पाहून असं वाटतं की तुम्हाला मुलं न झालेलंच चांगलं'

तुमच्या मुलाच्या गोंधळ आणि गैरवर्तनाने ज्यांना मुलं नाही त्यांना त्रास होतं असेलच असे नाही. लहान मुलं गोंधळ करणारचं. त्यावर पालक काहीच करू शकत नाहीत याची त्यांनाही कल्पना असते. ही गोष्ट भविष्यात त्यांना मुलं होऊ देण्यास परावृत्त करू शकत नाही.

४) चांगलेच आहे तुम्हाला मुलं नाही, तू सुखाने झोपत असशील 


 हो, हे सत्य आहे की तुमच्या आयुष्यात बाळाचं आगमन झाल्यानंतर तुम्ही पुरेशी झोप घेऊ शकत नाही. ही गोष्ट तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींनाही सांगत असाल. पण मित्रमैत्रिणींना मुलं नसण्यामागे पुरेशी झोप घेता येणार नाही, हे कारण नसू शकतं. कदाचित त्यापेक्षाही गंभीर कारण असू शकतं. 

५) जोपर्यंत तुम्हाला मुलं होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला ते प्रेम कळणार नाही'

- तुम्हाला मुलं झाल्यावर तुम्हा त्याच्यावर इतर कुणापेक्षाही त्याच्यावर सर्वात जास्त प्रेम करत असाल. पण त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलं नसलेल्या त्या मित्रमैत्रिणींनाही तसं म्हणू शकत नाही. कदाचित ते त्यांच्या कुटुंबावर, आई-वडिलांवर, पाळीव प्राण्यांवर, मित्रांवर त्यापेक्षाही जास्त प्रेम करत असत नाही. लक्षात ठेवा की तुम्हा मुलं होण्यापुर्वीही तुम्हा इतर कुणावर तरी प्रेम करतच होतात. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon