Link copied!
Sign in / Sign up
88
Shares

अंकुरित (मोड आलेल्या) मुगाच्या सेवनाने होणारे फायदे

        मूलतः मूग थंड गुणाचे असतात. मूग पचायला हलके आहेत. शरीराला आवश्यक असणारी ए, बी ही व्हिटामिन, लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ही द्रव्ये मुगाच्या टरफलात भरपूर प्रमाणात आहेतमूग हिरवे, पिवळे, काळे तीन प्रकारचे मूग असतात. यापैकी हिरवे मूग हे औषधी आणि गुणकारी मानले जातात. मूग कफ, पित्त व रक्तासंबंधी विकारात फार उपयुक्त असतात. मुगाला मोड आणून खाण्याने मुगाची गुणवत्ता वाढते. अश्या मोड आलेल्या मुगाच्या सेवनाने काय फायदे होतात ते आपण पाहणार आहोत.

१. मोड आलेल्या मुगामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन सी असतं. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते.

२. रक्त शुद्ध व्हायला मदत होते. फळं आणि भाज्यांमध्ये मिळतं त्यापेक्षा 100 पट जास्त एंजाईम तुम्हाला मोड आलेले मूग खाल्याने मिळते .

३. अंकुरीत म्हणजेच मोड आलेल्या मुगामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेट्री गुण असल्याने संधिवातात (अर्थारायटिस )उपयुक्त ठरतात.

४. अंकुरित मुगामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

५. भरपूर प्रमाणात प्रोटीन आल्यामुळे स्नायू बळकट होण्यास मदत होते.

.५ . मोड आलेले मुगामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही कमी होतात.

६. मोड आलेल्या मुगाच्या सेवनाने ब्लड-शुगर पातळी योग्य राखली जाते. तसेच याचे सेवन मधुमेही व्यक्तीसाठी उपयुक्त ठरते.

७. याच्या सेवनाने शारिरीतलं विषारीद्रव्ये कमी होऊन त्वचा आणि शरीर निरोगी राहते.

८. यामध्ये मेदाचे प्रमाण कमी असते त्यामुळे याच्या खाण्याने वजन वाढत नाही तर नियंत्रणात राहते.

९. यातील पॉलिफेनॉल्स कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात.

१०. मोड आलेल्या मुगाच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते, आणि बऱ्याच आजारापासून संरक्षण होत

 सहसा मोड आणूनच कच्ची कच्ची किंवा उकडून खावीशी वाटल्यास ही कडधान्य उकडून सालीसकट खावीत. त्याबरोर त्याच्या पाण्याच स्वयंपाकात वापर करावा 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon