Link copied!
Sign in / Sign up
74
Shares

डोकेदुखी आणि मायग्रेन ह्यात काय फरक आहे....जाणून घ्या

       हल्ली बरेच जण म्हणतात मला मायग्रेनचा त्रास आहे पण मायग्रेन म्हणजे नक्की काय ? याची लक्षणे कोणती आणि वरील उपाय काय हे आपण पाहणार आहोत.

मायग्रेन म्हणजे काय 

मायग्रेन हा एक डोकेदुखीचा प्रकार आहे याला अर्धशिशी देखील म्हणतात. यामध्ये मेंदूतील रक्तप्रवाहात काही असमतोल होऊन तो मेंदूच्या काही भागात वाढतो आणि काही भागात कमी होतो. रक्तप्रवाहातील या कमी-जास्त प्रमाणामुळे मेंदूत काही विशिष्ट संप्रेरकांचे स्रवण होते. या संप्रेरकांच्या असमतोला होण्याने डोके एकाच बाजूस दुखू लागते. अर्धशिशी ही साधारणतः १५ ते १७ वर्षांपासून ६० वर्षे या वयोगटात मुखत्वे आढळते.

मायग्रेनचे प्रकार

काही लक्षणांनंतर येणारे मायग्रेन (डोकेदुखी)

काही लक्षणांनंतर होणाऱ्या या अर्धशिशीला मायग्रेन विथ ऑरा ’. काही रुग्णांना अर्धशिशीचा त्रास सुरू व्हायच्या आधी आपल्या

रुग्णाला काही सारखीच लक्षणे आढळून येतात. डोळ्यांसमोर तारे चमकल्यासारखे वाटणे. जे दृष्य दिसते ते मध्यभागी गडद आणि बाजूला खूप प्रकाशमान दिसते. ज्या बाजूचे डोके दुखते त्याच बाजूला डोळ्यांसमोर तारे चमकल्यासारखे दिसते.

काही जणांना अर्धशिशीच्या त्रासापूर्वी विचित्र वास येऊ लागतात आणि मग अर्धशिशीचा त्रास सुरु होतो.यालाच ‘मायग्रेन विथ ऑरा म्हणतात.

 

अचानक होणारी डोकेदुखी 

पण बऱ्याच जणांना शरीराकडून कोणतीही पूर्वसूचना न मिळता अचानक अर्धशिशी सुरू होते याला ‘मायग्रेन विथआऊट ऑरा म्हणतात. हा प्रकार बहुतांश लोकांमध्ये पाहायला मिळतो.

अर्धशिशीचा त्रास अनेक स्त्रियांमध्ये मासिक पाळी दरम्यान किंवा मासिकपाळी संबंधित असू शकतो. तर काही स्त्रियांना गर्भावस्थेत खूपच वाढतो किंवा कमी देखील होण्याची शक्यता असते.

 

अर्धशिशीची लक्षणे

१. डोके दुखायला लागणे

२. खूप घाम येणे,मळमळणे ,उलट्या होणे

३. बैचेन होणे

४. एक बाजूचे डोके दुखणे.

५. ज्या बाजूला डोके दुखते त्या बाजूच्या डोळ्याने अस्पष्ट दिसणारे

६. प्रकाश सहन न होणे.

७. काही जणांना शरीराची एक बाजू बधीर झाल्यासारखी वाटते(पण हे क्वचित आढळते) अश्यावेली त्वरित डॉक्टरांकडे जावे.

 

अर्धशिशीची कारणे

१. रक्तदाब,अनुवंशिकता, ताण-तणाव, हार्मोन्सचे असंतुलन (विशेषतः स्त्रियांमध्ये )

२. हल्लीची जीवनशैली, आहार पद्धती, वेळी यावेळी आहार

३. वातावरणातील बदल,डोळ्यांवर अचानक खूप प्रकाश येणे,खूप गोंगाटच्या ठिकाणी जाणे.

४. मसालेदार पित्तकारक आहार घेणे,जंक फूड खाणे

५. लॅपटॉप ,फोन मुळे डोळ्यांवर येणारा ताण-तणाव,खूप प्रखर प्रकाश डोळयांवर येणे

६. जास्त प्रमाणातील मद्यपान आणि धुम्रपान

उपाय

१. संतुलीत सर्व जीवनसत्वयुक्त आहार घ्यावा, योग्यप्रमाणत पाणी प्यावे.

२. पित्तकारक,मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.

३. लॅपटॉप आणि फोनचा वापर कामापुरताच करावा

४. मद्यपान आणि धूम्रपान करणे टाळावे.

६. पोट साफ राहील याची काळजी घ्यावी.

७. खूप वेदना होत असतील तरी सतत वेदनशामक गोळ्या घेणे टाळावे

८. चहा-कॉफीचे प्रमाण कमी करावे. 

९. ज्या भागात दुखत आहेत तिथे गार पाण्याची पट्टी ठेवावी.

१०. आल्याचे चाटण किंवा आल्याचा तुकडा तोंडात ठेवावा.

११. डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय कोणतेही उपचार करू नये. 

हॅलो मॉम्स... आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया... हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon