Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

मरमेड बेबी मत्स्यकन्येबाबतचे सत्य जाणून घ्या

मेरमेड बेबी सिंड्रोम हा एक सर्वांना माहिती झालेला आजार आहे. वैद्यकीय क्षेत्रात याला सिरेनोमेलिया असे संबोधले जाते.१००००० बाळांमध्ये एक बाळ सिरेनोमेलीया हा जन्मजात आजार घेऊन जन्मते. हा दुर्मिळ आजार झालेल्या बाळास ‘मरमेड बेबी’ असे देखील म्हणतात. आजारामध्ये बाळाचे दोन्ही पाय कमरेखाली एकमेकांना जन्मजात जोडलेले असतात. या आजारामुळे स्टील बर्थ सुद्धा होऊ शकतो. हा आजार झालेली बाळे जन्म झाल्यानंतर १ किंवा २ दिवसापेक्षा जास्त जगण्यास अनुकूल नसतात. किडनी आणि मुत्राशयाशी निगडीत काही शारीरिक गुंतागुंतीच्या स्थितीमुळे त्यांचा लगेच मृत्यू होतो.

या आजाराचे कोणतेही ठोस असे कारण आजपर्यंत समोर आलेले नाही. गर्भाशयात लोवर आर्टरीला नॉर्मल व्ह्यास्क्युलर सप्लाय न झाल्यामुळे बाळाच्या बाबतीत असे होऊ शकते. अशी गुंतागुंतीची स्थिती गर्भात निर्माण झाल्याने खूप कमी बालके जन्मानंतर जिवंत राहतात.

यास अपवाद शिलोह पिपीन ही बालिका ठरली आहे. अमेरिकेतील मैन या ठिकाणी मरमेड सिंड्रोम झालेल्या शिलोहचा जन्म झाला. ती तब्बल १० वर्षे जगली. अमेरिकेतील सर्वात प्रभावशाली टीव्ही मुलाखतकार आॅपरा विनफ्रे यांनी तिची मुलाखत देखील घेतली होती. तिच्या उदाहरणामुळे लोकांना इतर आजारी लोकांविषयी सद्भावना बाळगण्याची प्रेरणा मिळाली. वयाच्या १० व्या वर्षानंतर न्युमोनिया झाल्यामुळे तिचा लगेच मृत्यू झाला. तिचे १० वर्षांचे जीवन देखील एक मैलाचा दगड ठरला आहे, कारण हा आजार घेऊन जन्माला आलेली बालके काही तासच जिवंत राहतात. तिची ही कथा सेरेब्रल पाल्सी असणाऱ्या देखील अनेक जणांना त्यांची कथा सगळ्यांसमोर मांडण्यासाठी आणि जीवन उत्स्फूर्तपणे जगण्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे.

शिलोह सारख्याच ज्या बालकांना हा आजार असतो त्यांना योग्य आणि तत्काळ वैद्यकीय मदतीची गरज असते. किडनीच्या दोषामुळे डायलिसीस ते दोन्ही पाय वेगळे करण्यासाठी करावी लागणारी सर्जरी इथपर्यंत वैद्यकीय निकड या बालकांसाठी असते. काही केसेसमध्ये या बालकांना ट्रान्सप्लांटद्वारे अवयव दान देखील होते.

सिरेनोमेलीया हा अतिशय दुर्मिळ आजार असून याचे निदान जन्म होण्याआधी अल्ट्रासाऊंड किंवा रेडीओग्राफ द्वारे करता येते. असे निदान झाल्यास प्रसूती नंतरच्या गुंतागुंतीच्या स्थिती टाळण्यासाठी गर्भपात करण्याचा पर्याय उपलब्ध असतो.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon