मेकअप केल्यावरच तुम्ही सुंदर दिसता हि कल्पना चुकीची आहे. मेकअप शिवायही सुंदर दिसता येते, पण कसे ? तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खाली काही उपाय सांगितले आहेत, त्याच्याने तुम्ही मेकअपला टाळून नैसर्गिक सौंदर्य तुमच्या चेहऱ्यावर आणू शकता.
१) त्वचेत ओलावा राहील याची काळजी घ्या
त्वचेत ओलावा कमी झाल्यास कोमल त्वचा खरखरीत होऊन त्वचेवरची बंद होतात,आणि त्वचा निस्तेज होते. त्वचेतील तेलकटपणाच्या आवरणाखाली पेशीमध्ये पाणी टिकून राहते, त्यामुळे तेल आणि पाणी यांचा सुयोग्य संगम ही त्वचेच्या उजळपणाची गुरुकिल्ली आहे.तुमच्या त्वचेत दिवसभर ओलावा राहील याची दक्षता घेणे महत्वाचे आहे, त्यासाठी काही क्रीम्स मिळतात तसेच तूप, साय, अश्या विविध घरगुती गोष्टींचा व[पर आठवड्यातून एकदा करायला हरकत नाही.
२) सकस आहार घ्या
सकस आहार घेणे हे त्वचेच्या आरोग्यासाठी गरजेचे असते पण ते तितके ते सोपेही नाही, कारण त्याकरता तुम्हाला फास्ट फूड, जंक फूड, खाण्याचे सोडावे लागेल. तुमच्या आहारात जास्तीत जास्त जीवनसत्त्वयुक्त व पौष्टिक पदार्थ यायला हवेत जेणेकरून तेवढे पोषकमूल्य त्वचेला मिळतील.आणि यामुळे नवीन पेशी तयार होऊन त्वचा कोमल आणि निरोगी होईल.
३) व्यायाम करा
निरोगी आरोग्य आणि त्वचेसाठी व्यायाम महत्वाचा आहे. व्यायाम केल्यामुळे घामावाटे दूषित घटक उसर्जित होतात. तसेच योगा केल्याने काही दिवसातच तुमच्या चेहऱ्यावर ग्लो दिसून येईल
४) फळांचे रस /ज्यूस
आहारात विविध फळांच्या रसांचा समावेश करा.फळाचा आहारातील समावेश हा निरोगी त्वचेसाठी उपयुक्त ठरतो.
५) शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखा
आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण ७०% असते. तेव्हा पाणी पिणे हे खूप गरजेचे आहे नितळ त्वचेसाठी शरीरात पाण्याची पातळी योग्य असणे गरजेचे असते त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी प्या . वाटल्यास आपल्या मोबाईलवर पाणी पिण्याचे ऍप डाउनलोड करून ठेवा.
६) मसाज आणि फेशियल
त्वचेवरील मृतपेशींचा थरामुळे त्वचा निस्तेज होते आणि काळवंडते त्यासाठी बाजारात मिळणारे नॅचरल फेसपॅक किंवा घरगुती पॅक जसे हळद-डाळीचे पीठ यांनी मसाज करा.तसेच हल्ली पार्लरमध्ये फेशियल, विविध पर्याय उपलब्ध असतात त्याचा देखील वापर तुम्ही शकता.त्यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जाऊन त्वचा कोमल होते.
७) घरगुती मास्क
तुम्ही घरगुती पद्धतीने नैसर्गिक मास्क तयार करून लावू शकता, आणि ते तुमच्यासाठी स्वस्तही आहे. त्यासाठी एक चमचा काकडीचा रस घ्या, एक चमचा लिंबूचा रस, एक चमचा हळद आणि तुमची त्वचा शुष्क असेल तर एक चमचा ग्लिसरीन घ्यावे. हे सर्व एकत्र करून हे सर्व मिश्रण चेहऱ्यावर १५ मिनिटापर्यंत राहू द्या.या मास्क मुले तुमची त्वचा उजळ होण्यास मदत होईल.
८)रक्तशुद्धी
वातावरणातील दूषित घटक ,प्रदूषण, जंकफूड , कामातील ताण -तणाव यामुळे रक्तात दूषित घटकांचे प्रमाण वाढते, त्याचा परिणाम देखील त्वचेवर होतो. त्यासाठी रक्तशुद्धी हा देखील एक उपाय आहे. विशेष प्रकारचे डाएट, आयुर्वेदिक उपचार, अश्या रक्तशुद्धीचा विविध पद्धती आहेत, या पद्धतींचा वापर करून रक्तशुद्धी करता येते
९) चेहऱ्यावर नेहमी हास्य असू द्या
चेहऱ्यावर असणाऱ्या हास्याने व्यक्ती नेहमीच सुंदरदिसते. तसेच तुमचे हास्य इतरांसाठी प्रेरणादायी असतेच, तुम्हालाही त्याच्याने आत्मविश्वास वाटतो. दिवसही छान जातो. व याचमुळे तुम्ही ताजेतवाने व तरुण राहतात.
