Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

मेकअप मुळे काहीवेळा ह्या समस्या येतात !

१) मेकअपच्या अनेक वस्तूंमध्ये आरोग्याला हानिकारक असे घटक असतात. यातील काही रसायने इतकी घातक असतात की त्यामुळे ही प्रसाधने दिर्घकाळ लावल्यास त्याचा थेट परिणाम होऊन डोके दुखू शकते. तुम्ही नियमित मेकअप करत असाल आणि तुमचे दिर्घकाळ डोके दुखत असेल तर काही काळ मेकअपविना राहून पहा. यामुळे डोकेदुखी थांबण्यास निश्चित मदत होऊ शकते.

२)सातत्याने चेहऱ्यावर मेकअपचा थर चढविल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. त्वचा हा शरीरावरील एक महत्त्वाचा घटक असतो, त्याची योग्य पद्धतीने काळजी घेतली गेली नाही तर त्याचा त्वचेवर वाईट परिणाम होतो. त्वचेलाही योग्य प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता असते, तो पुरेशा प्रमाणात मिळाला नाही तर त्वचेवर पिंपल्स येण्यास सुरुवात होते. याची सुरुवात ब्लॅक हेड्सनी होते आणि नंतर त्याचे पिंपल्समध्ये रुपांतर होते.

३) सौंदर्यप्रसाधनांमध्ये पॅराबेन केमिकल नावाचा एक पदार्थ असतो. या पदार्थामुळे सौंदर्यप्रसाधनांमधील जिवाणूंची वाढ रोखली जाते. मात्र त्वचेच्या दृष्टीने हे पदार्थ घातक असतात. या पदार्थांमुळे चेहऱ्यावर रॅश येणे, काळे डाग येणे, फोड येणे, खाज येणे अशी विविध प्रकारची अॅलर्जी होण्याची शक्यता असते.

४) डोळ्याला लावण्यात येणाऱ्या काजळ, आय लायनर, आय शॅडो, मस्कारा अशा अनेक गोष्टी लावून आकर्षक बनवले जाते. एकीकडे डोळ्यांचे सौंदर्य वाढवत असताना त्यामुळे होणाऱ्या परिणामांकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसते. पण डोळ्यांना सातत्याने विविध प्रसाधने लावणे डोळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने निश्चितच घातक ठरते. यामुळे डोळे सुजणे, लाल होणे, खाज येणे अशा समस्या उद्भवू शकतात.

५) सध्या बाजारात विविध शाम्पू, कंडिशनर, हेअर ऑईल यांच्या विविध कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा दिसून येते. या सर्व प्रसाधनांमध्ये मोठ्या प्रमाणात रसायने वापरली जातात. या प्रसाधनांचा मर्यादेपेक्षा जास्त वापर करणे आरोग्याच्यादृष्टीने धोक्याचे ठरते. यामुळे ऐन तारुण्यात केस मोठ्या प्रमाणात गळणे, पांढरे होणे, कोंडा होणे यांसारख्या समस्या उद्भवतात.

      साभार - लोकसत्ता 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon