Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

जाणून घ्या..मेडीकेटेड प्रसूती आणि अनमेडीकेटेड प्रसूती म्हणजे काय

बाळाला जन्म देण्याबद्दल काही गरोदर स्त्रियांना खूप कुतुहूल आणि आनंद असतो पण ही गोष्ट वाटते तितकी सोप्पी नक्कीच नसते. खास करून जेंव्हा प्रसुतीबद्दल तुम्ही नीट विचार कराल तेंव्हा तुमच्या लक्षात येईल की एक संपूर्ण आकाराचे बाळ तुमच्या पोटातून बाहेर येणार आहे, पण कसे ??

ज्या स्त्रियांसाठी आधीपासूनच पाळीचे दिवस अत्यंत वेदनादायक ठरले आहेत त्यांना ही प्रसूती म्हणजे एक मोठे आव्हानच वाटू शकते, आणि याबाबत काही बोलण्याची आणि समजून घेण्याचीही त्यांची इच्छा नसते. 

अशावेळी गरोदर स्त्रिया प्रसूतीसाठी मेडीकेटेड प्रसूतीच्या पर्यायाचा विचार करू शकतात.

ज्यांना याबद्दल फारशी माहिती नाही त्यांच्यासाठी सांगायचे झाले तर मेडीकेटेड प्रसूती म्हणजे सी-सेक्शन नाही. मेडीकेटेड प्रसूती म्हणजे गरोदर स्त्रीला प्रसुतीच्या वेळेस येणाऱ्या वेदनादायक कळांच्या असहायतेला औषधी देऊन बधीर करणे. तुम्ही ‘एपीड्यूरल‘ विषयी ऐकले असेल. मेडीकेटेड प्रसूतीत वापरल्या जाणाऱ्या पद्धतींपैकी एक पद्धत म्हणजे ‘एपीड्यूरल’ होय. ह्यात पाठीच्या कण्यात इंजेक्शन द्वारे औषध दिले जाते, यामुळे बधीरपणा येऊन कमरेच्या भागातील वेदना जाणवत नाहीत.

याउलट नैसर्गिक प्रसूती म्हणजे नावाप्रमाणेच नैसर्गिकरीत्या होते. यात कोणत्याही प्रकारची औषधे दिली जात नाहीत व नैसर्गिकरित्या होणाऱ्या कोणत्याही प्रक्रियेच्या गोष्टीत बाह्य घटकांचा हस्तक्षेप केला जात नाही.

तुम्हाला एक समंजस निर्णय घेण्यासाठी आम्ही दोन्ही प्रकारच्या प्रसुतींबद्दल माहिती खाली दिलेली आहे.

१. अनमेडीकेटेड प्रसूती.

फायदे :

१. यात मातेला बाळाच्या गर्भातील स्थितीचा अंदाज येतो त्यामुळे जोर नक्की कोणत्या दिशेने लावायचा हे मातेला कळते. बाळाची योग्य पोझिशन व हालचाल कळण्यास मदत होते.

२. आईला होणाऱ्या वेदना आणि बाळाच्या हालचाली यावरून प्रसूतीसाठी कोणती पोझिशन योग्य आहे हे आईला कळते.

३. अनेक मातांनी असे नोंदविले आहे की नैसर्गिक प्रसूतीमुळे त्यांना आई झाल्यानंतर आत्मविश्वास वाढला आहे.

४. काहीच्या मते नैसर्गिक प्रसुतीनंतर रिकव्हरी लवकर होते.

५. बाळाच्या जन्मानंतर हालचाल करणे, फिरणे सोपे जाते.

तोटे:

१. वेदना.

२. यामुळे योनी फाटण्याची शक्यता असते.

३. ज्या स्त्रियांसाठी वेदना सहन करणे ही एक असामान्य गोष्ट आहे किंवा ज्यांना वेदना सहन होत नाहीत त्यांना ही गोष्ट मानसिक रित्या परीणामक ठरू शकते.

४. अनेक मातांनी नैसर्गिक प्रसुतीनंतर मलविसर्जन करतांना अवघडल्यासारखे झाल्याचे नोंदवले आहे.

मेडीकेटेड प्रसूती.

फायदे :

१. यामुळे वेदना लाक्षणिकरित्या कमी होतात.

२. ज्या मातांना शारीरिक वेदना सहन करणे अवघड वाटते त्यांच्यासाठी एक मानसिक आधार राहतो.

३. कळांचा वेग जास्त असेल तर औषधांमुळे त्रास कमी होतो.

४. अनेकदा माता प्रसुतीच्या ताणाखाली असतात. अशावेळी शरीराला रिलॅक्स ठेवण्यासाठी औषधी मदत करतात व प्रसूती सहज होते.

५. कमी मातांनी नोंदवले आहे की मेडीकेटेड प्रसूतीनंतर आईपणात त्यांना आत्मविश्वास मिळाला आहे.

तोटे

१. यामुळे कळा आणि श्रमकाळ वाढू शकतो. बधीरपणामुळे मातेचा जोर लावण्याचा वेग कमी असतो त्यामुळे श्रमकाळ वाढतो.

२. काही मतांच्या मते, यामुळे सूज येते व प्रसुतीनंतर रिकव्हर होण्याचा काळ वाढतो.

३. या प्रक्रियेत मातेच्या आरोग्यावर औषधींचा परिणाम होत असल्यामुळे सतत लक्ष ठेवावे लागते.

४. औषधींचा साईड इफेक्ट म्हणून डोके दुखू शकते.

तुम्हाला आता बरीच अशी माहिती मिळाली आहे. अजून एक महत्वाचे सांगायचे म्हणजे – मेडीकेटेड प्रसूतीमध्ये औशाडी घेऊन कळांना बधीर केल्याने तुमचे आईपण कमी होत नाही. यात स्वतःला दोषी मानण्याची मानसिकता ठेवू नका. यात चुकीचे असे काहीच नाही. याचप्रमाणे नैसर्गिक प्रसूतीमध्ये मागासलेपण मुळीच नाहीये.

तुम्हाला प्रसूतीसाठी कोणता पर्याय निवडायचा आहे तो सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. हा निर्णय प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत वेगळा असू शकतो. हा निर्णय परिस्थिती व गरज यावर अवलंबून आहे. काही मातांनी प्रक्रिया सुरु असताना मेडीकेटेड प्रसुतीचा पर्याय निवडला आहे. शेवटी तुमचे गोंडस बाळ जन्म घेणार आहे, तेच महत्वाचे आहे.

ही एक अशी गोष्ट आहे जिथे सुधृढ बाळाचा जन्म महत्वाचा आहे, तो कसा झाला हे महत्वाचं नाही.  

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon