Link copied!
Sign in / Sign up
12
Shares

मातृत्व म्हणजे काय ? : आईच्या कथा

काय आहे मातृत्व? आई होणे म्हणजे नेमके काय? हे प्रश्न दिसायला जरी अगदी सोपा असला तरी त्याचे नेमके उत्तर देणे अवघड आहे. मातृत्व म्हणजे केवळ बाळाला जन्म देणे इतकेच नसून त्यापेक्षाही बरेच काही आहे. नऊ महिने एक स्त्री आपल्या गर्भात पोषण करते आणि आयुष्य देते आणि नंतर ते आयुष्यभर हृदयात सामावून ठेवते. तुम्ही एकमेकांना भेटण्यापूर्वीच बिनशर्त, कधीही न संपणारे अशा प्रेमळ आत्म्याची काळजी घेत असता. मातृत्व म्हणजे आपल्या हाडामांसापासून एक नवीन जीव तयार करणे. हा आत्मा तुमच्या प्राधान्यक्रमात नेहमी पहिला असतो. ही भावना शब्दांत व्यक्त कारण्यापेक्षाही किती तरी मोठी आहे.मातृत्वाची भावना ही खरोखरी खूप सुंदर आहे.

 मातृत्व फुलपाखरू किंवा इंद्र्धनुष्यासारखे अल्पायुषी नाही. मातृत्व म्हणजे प्रचंड वेदनादायी असले तरी मुलांबरोबर राहण्यासाठी धैर्य आणि आपली कार्यशक्ती आजमावण्याचे काम आहे. मातृत्व एक सशक्त आत्मा आहे याला घडविण्यासाठी आपल्या शरीरास वेगवेगळ्या बदलांना सामोरे जावे लागते. या बदलांपैकी ओटीपोटावर आलेले स्ट्रेच मार्क्सकडे एखाद्या मोराप्रमाणे आपण अभिमानाने स्वतःकडे बघतो. आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी अधिक पटीने जास्त असलेली ही प्रेमाची भावना आहे. हे प्रेम दिवसेंदिवस वाढतच असते.

 मातृत्वामध्ये आईचे आपल्या मुलावर अंतःकरणापासून प्रेम असते तरीही ते कठोर आणि संरक्षणात्मक असते. आपल्या मुलांसाठी आयुष्यातील प्रत्येक परिस्थिती ​हि सारखीच नसते ​त्यामुळे त्यांच्या पाठीशी कायम उभे राहणे गरजेचे असते. मातृत्वाचे काम हे आयुष्यभर घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे अखंड सुरूच असते. हे काम पहाटे पाच पासून ते मध्यरात्री साधा पाण्याचा ग्लास लागला तरी उठविणारे, एका आलिंगनासाठी, खेळणी मागण्यांसाठी, ते अगदी खोलीतील दिवा बंद करण्यापर्यंत सर्व गोष्टी अविरत सुरू असतात. आईला कोणताही वीकेंड सुट्टी नसते. ​आपल्याला रात्रीची स्वस्थ झोप कधी मिळाली होती हे आठवायला लागते. मातृत्व म्हणजे नेहमी सौम्य आजारपण आहे, पण दुःखात भर घालण्याची वेळ कधीच येत नाही. झोपेची नितांत गरज असताना सुद्धा आपल्या बाळा​ला कुशीत घेऊन झोपल्याशिवाय चैन पडत नाही. मातृत्वामध्ये आपल्या बाळा​ला आलिंगन देणे आणि गोड पापा देणे हे अपेक्षितच असते.

मातृत्व म्हणजे एकाचवेळी विविध जबाबदाऱ्या सांभाळून, विविध कौशल्ये आत्मसात केलेले तज्ज्ञ. तुम्ही तुमच्या मुलांचे पहिले शिक्षक असता. प्रत्येक आई मुलाला हात धरून चालायला, फिरायला, धावायला, बोलायला शिकवते. त्याच्या समोर तुम्ही एक आदर्श असता जो सतत त्यांना प्रोत्साहन देत असतो. या पुढे तुम्ही त्याचे मित्र-मैत्रीण,पालक, संरक्षण करणारे आणि मुख्य म्हणजे ज्यावेळी आपला मुलगा जेव्हा उतरत्या दिशेने जातो तेव्हा त्याचे पॅराशूट असता. मातृत्वामध्ये आपल्या बाळा​ला जगातील सर्वात अवघड गोष्ट शिकविण्याचे देखील धैर्य असते. ​अत्यंत कठीण परिस्थितीत स्वतःचे अश्रू आणि दुःख बाजूला ठेवून तुम्हाला त्याची अडचण सोडविण्यासाठी त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहायला लागते. मातृत्व म्हणजे प्रचंड अपेक्षांचे ओझे मानेवर घेऊन फिरल्यासारखे आहे. हे ओझे असूनही ताठ मानेने आयुष्याचा पुढील प्रवास सुरू ठेवायचा असतो. आपण आधीच स्वतःला कमकुवत समजत असताना आपल्यासाठी ते मजबूत असतात.​ ​जेव्हा ते आनंदाने हसत असता तेव्हा तुमच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू असतात. मातृत्व हे विविध भावभावनांचे मिश्र स्वरूप आहे.

मातृत्व म्हणजे सतत कामामध्ये व्यग्र असणे तरीही मुलांशी संयमाने आणि धीराने वागणे. लक्षात घ्या हे कपडे वाळत टाकून काढण्या इतके किंवा घराला कुलूप लावण्या इतके सोपे नाही. मातृत्व म्हणजे सर्वकाही नियोजित केले असते, तरीही अनपेक्षित असे काही तरी घडते. मातृत्व म्हणजे रोज सकाळी एकटीने जोडीदार कामावर जाताना घामाघूम होऊन मुलाच्या झोपेचा, खाण्या-पिण्याचा, औषधांचा विचार करणे. कधी-कधी आपले मित्र-मैत्रिणींसोबत जेवायला, मजा करायला जाणे शक्य होत नाही, तेव्हा आपण बंद दारा आड मुलांचे खाणे-पिणे, झोप, औषध, अंघोळ ही कामे करत बसतो. हा विचार आईला कधी-कधी नकारात्मकतेकडे नेतो. मातृत्वाची भावनेचे इतर सर्व भावनांवर ​चांगले वर्चस्व असते कारण, त्या भावनेपोटी केलेली सर्व कृत्ये ही योग्य ठरतात.

वर दिलेली सर्व उदाहरणे मातृत्वाची भावना कशी कौतकास्पद आहे हे दर्शवणारी आहेत. पण अगदी जवळचे उदाहरण घेयचे झाले तर तुम्ही आणि तुमच्या आई मध्ये असलेले नाते पहा, एक आई म्हणून तोच प्रयत्न तुमची आई करत असते आणि तोच प्रयत्न तुमच्या मुलाशी वागताना करत असता. एकूणच मातृत्वाची भावना आणि भूमिका ही आदर आणि अभिमानास्पद अशीच आहे. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon