Link copied!
Sign in / Sign up
5
Shares

मातीचा तवा वापरल्याचे फायदे

तुम्ही मातीची भांडी वापरता आहात का? असा प्रश्न जर विचारला तर त्याचे काय उत्तर एखाद्या वेळी 'नाही' असेच मिळेल. कारण मातीची भांडी कदाचित तुम्ही वापरने बंद केले असेल. पण मातीच्या तव्याविषयी काही गोष्टी समजून घेऊ.  जाणून घेऊया मातीच्या तव्यावरची पोळी खाल्ल्यावर काय काय होते?

* ज्यावेळी तुम्ही मातीच्या तव्यावर पोळी बनवत असतात. त्यावेळी त्या पोळीमधून एकही पोषकतत्त्व नष्ट होत नाही. आणि अॅल्युमिनियमच्या भांड्यात पदार्थ बनवल्याने त्यातील ८७ टक्के पोषकतत्त्वे कमी होऊन जातात. 

* फक्त मातीच्या भांड्यात बनवलेल्या पदार्थांमध्ये १०० टक्के पोषकतत्वे कायम राहतात. कारण ते नैसर्गिक आहे. 

* पितळ सुद्धा चांगलेच आहे पण त्यातही  पदार्थ बनवल्याने ७ टक्के पोषकतत्वे कमी होतात.

* ज्यांना व्यक्तींना गॅसेसचा त्रास आहे, त्यांनी मातीच्या तव्यावर बनलेल्या पोळ्या खाल्ल्याने गॅसची समस्या दूर होते.

* मातीच्या तव्यावर बनलेल्या पोळ्यांना चटपटीत  वास येतो. त्या स्वादिष्ट आणि पौष्टिक असतात. पोळ्या त्यावर बनवताना मातीचे तत्व पोळ्यांमध्ये शोषले जाते यामुळे त्याची पौष्टिकता अधिक वाढते.

* सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठतेची समस्या साधारण झालीये. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतोय त्यांनी मातीच्या तव्यावर बनवलेली पोळी खाल्ल्याने त्रास दूर होतो.

पण ह्याही गोष्टी लक्षात घ्या 

* ज्यावेळी मातीचा तवा वापराल तेव्हा मंद आचेवर करा.

* हा तवा पाण्याने न धुता, त्याचा वापर झाल्यावर कपड्याने स्वच्छ करा.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon