Link copied!
Sign in / Sign up
25
Shares

असा करा मसूर भात/पुलाव

रोज तेच तेच खाऊन कंटाळा येतो पण अश्यावेळी काहीतरी सोप्पे हेल्थी आणि चविष्ट आणि सगळ्यांना पुरेल असा पदार्थ करायचा झाला कि भात आणि पुलावाचे  पर्याय डोळ्यासमोर येतात आम्ही तुम्हांला असाच एक भाताचा प्रकार सांगणार आहोत. तो म्हणजे मसूर पुलाव

साहित्य

दिड वाटी बासमती तांदूळ

२ चमचे तूप

१/२ कप मसूर

२ वेलची, २-३ काळी मिरी

फोडणीसाठी थोडी हळद

१ चमचा लाल तिखट

१ चमचा आलं पेस्ट

१ चमचा लसूण पेस्ट

१/२ कप दही

१ चमचा धणे पूड

१/२ चमचा जिरे पूड

१ चमचा गरम मसाला

१/२ कप बारीक चिरलेला कांदा

थोडे बेदाणे, थोडेसे काजू

तुम्हांला आवडणाऱ्या भाज्या (गाजर,फरजबी )

चवीनुसार मीठ

कृती

मसुराची ग्रेव्ही

१. प्रथम सात ते आठ तास मसूर भिजत ठेवा. त्यानंतरमसूर थोडं मीठ घालून कूकरमध्ये पाणी न घालता १ शिट्टी करून शिजवून घ्यावे.

२. त्यानंतर कढईत किंवा लोखंडी पातेल्या तूप गरम करून त्यात वेलची आणि मिरी घालावी. १० सेकंद परतावे. हळद, लाल तिखट आणि आलेलसूण पेस्ट घालून परतावे. त्यानंतर कांदा गुलाबी होई पर्यंत परता. (यात तुम्ही पळवाट घालणाऱ्या तुम्हांला  आवडणाऱ्या भाज्या देखील टाकू शकतात. 

३. या नंतर त्यात आता शिजलेले मसूर आणि १/२ कप पाणी घालावे. थोडा वेळ शिजू द्यावे. थोडे शिजल्यावर गरम मसाला, धणे-जिरेपूड, बेदाणे, काजू घालून मिक्स करावे.त्यानंतर थोडी चव घेऊन मीठ आणि मसाला घालावे.हे मिश्रण अति पातळ अति घट्ट न करता माध्यम प्रकारचे ठेवा. आता गॅस बंद करा.

भात

१. बासमती तांदूळ १० मिनीटे पाण्यात भिजवून ठेवावा. नंतर पाणी काढून टाकावे त्यानंतर १५ मिनटे त्यातले पाणी निघून जाईल असा ठेवावा.

२. त्यानंतर एक कढईत किंवा लोखंडी पातेल्यात दोन चमचे तूप घाला.त्यात तमालपत्र घालून परता आणि त्यात पाणी काढून टाकलेला तांदूळ परता. तांदूळ चांगला परतला गेला की गरम पाणी घालावे. भात व्यवस्थित पुलावासाठी लागतो तसा (मोकळा) होई पर्यंत शिजू द्या. किंवा हा भेट तुम्ही मोठया कुकरमध्ये देखी नुसत्या तुपाच्या फोडणीने करू शकता.

३. भात शिजला कि थोडासा कोमट झाला मोठ्या पातेल्यात किंवा कढईत (लोखंडी) काढा त्यात मसुराची ग्रेव्ही मिक्स करा आणि त्यावर झाकण ठेवून ५ ते ७ मिनटे वाफ येऊ द्या.

४. नंतर हा भात कोशिंबीर किंवा रायत्या बरोबर वाढा. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon