Link copied!
Sign in / Sign up
25
Shares

मासिकपाळी पुढे ढकलणे कितपत योग्य आहे ?


मासिकपाळी येणे हे नैसर्गिक आहे. असे असले तरी आपल्याकडे अजून देखील मासिकपाळी आल्यास अनेक पूजा विधींपासून त्यांना दूर ठेवले जाते. तसेच लग्नानंतर देखील जर मासिकपाळी येणार असल्यास मासिकपाळी पुढे ढकलण्यासाठी औषधगोळ्या घेण्याचा सल्ला घरातल्या काही व्यक्तींकडून दिला जातो. तसेच आपल्याकडे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मासिकपाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या उपलब्ध असल्याने त्याच वापर मोठ्या-प्रमाणात होतो. या गोळयांमुळे त्या मुलीच्या त्या स्त्रीच्या आरोग्यवर होणाऱ्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करण्यात येते.

 

मासिकपाळी पुढे ढकलण्यासाठी काही औषधे, इंजेक्शनचा वापर करण्यात येतो. किंवा काही घरगुती उपायांनी मासिकपाळी पुढे ढकलण्याचा पर्यन्त करण्यात येतो. जे निसर्ग नियमाच्या विरोधात आहे. मासिकपाळी पुढे ढकलणाऱ्या औषधे कसे काम करतात आणि त्याचे परिणामाबाबत आपण जाणून घेणार आहोत.

 

मासिकपाळी पुढे ढकलणाऱ्या गोळ्या कसे काम करतात.

तुमच्या अपेक्षित तारखेच्या 3-4 दिवस आधीपासून त्या घ्यायला सुरवात केल्यास तुमची मासिकपाळी पुढे जाते. या मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्यांंमध्ये progesterone हार्मोन असते.

मासिकपाळी चक्राचे दोन भाग केल्यास, पहिल्या टप्प्यात estrogen या संप्रेकची निर्मिती होते. यामुळे गर्भाशयाजवळच्या आवरणाची वाढ होते. तर progesterone हे हार्मोन्स टप्प्यात निर्माण होते. यामुळेही गर्भाशयाच्या आवरणाची वाढ होण्यास मदत होते.

त्यामुळे progesterone कमी होते तेव्हा गर्भाशयाजवळील आवरण गळून पडते आणि मासिक पाळी येते. परंतू जेव्हा मासिकपाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेतल्याने औषधामधील progesterone घटक आवरण पडू न देता ते लांबवण्याचा प्रयत्न करतात. परिणामी मासिकपाळी उशिरा येते. काही औषधांमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांच्या घटकांचा समावेश होतो.

घरगुती पद्धतीने मासिकपाळी पुढे ढकलली तर ?

कोणत्याही पद्धतीने मासिकपाळीच्या चक्रात हस्तक्षेप करणे चुकीचे आहे. त्यामुळे घरगुती किंवा औषधे घेऊन मासिकपाळी पुढे ढकलणे टाळावे.

 मासिकपाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेणे किती योग्य आहे ?

मासिकपाळी ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. यामध्ये हस्तक्षेप करणे चुकीचेच आहे. परंतु काही कारणास्तव अगदीच काही पर्याय नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने या गोळ्या घ्याव्या. स्त्री रोग तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठीच्या गोळ्या घेऊ नयेत. संबंधित महिलेचे वय, आरोग्याच्या तक्रारी, या सगळ्याची माहिती असल्याशिवाय अशा गोळ्या देता येत नाहीत.

 मासिकपाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्यांमुळे होणारे दुष्परिणाम

 

डोकेदुखी, नैराश्य, नंतर येणाऱ्या मासिकपाळीमध्ये रक्तस्रावात बदल होणे, वजन वाढणे, शरीरावर जास्तीची वाढणारी लव, चक्कर येणे, यकृताच्या कार्यातील बिघाड हे बरेच दुष्परिणाम या गोळ्यांच्या अति सेवनामुळे होतात. कमी वयात या गोळ्या घेण्याने पीसीओडी सारख्या समस्या तसेच गर्भधारणेमध्ये देखील समस्या निर्माण होऊ शकते. तसेच निरीक्षणात असे देखील आढळून आले आहे कि एकदाच ही औषधे घेतल्याने देखील अनेक महिलांना वरील दुष्परिणाम जाणवले आहेत.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon