Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

मासिकपाळी येणे हे निरोगी आणि प्रजननक्षम असण्याचे लक्षण आहे.


वेळच्यावेळी तुमच्या मासिकचक्रानुसार मासिकपाळी येणे हे अपवित्रपणाचे लक्षण नसून हे निरोगी आणि प्रजननक्षम असण्याचे लक्षण मानण्यात येते. जाणून घेऊया मासिकपाळी का येते आणि मासिकपाळी येते म्हणजे नेमके काय होते.

मासिकपाळी येते म्हणजे काय ?

मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षांची झाली की, मासिकपाळी सुरु होते काही मुलींमध्ये या आधी देखील सुरु होते. नियमित मासिक पाळीच्या दरम्यान गर्भाशयाच्या भिंतींवर एन्डोमेट्रियम नावाचा जाड थर तयार होतो. याच वेळी अंडाशयातून एक बीजांड अंडनलिकेतून गर्भाशयात जाते. ह्या बीजांडाचा शुक्रजंतुशी संयोग झाल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता असते व एन्डोमेट्रियमचा थर गर्भाचे पोषण करतो. बीजांडांचा शुक्रजंतुशी संयोग झाला नाही तर एन्डोमेट्रियमच्या थराचा उपयोग नसतो. अशा वेळी हा थर व त्यात असलेले रक्त योनीद्वारे शरीराबाहेर टाकले जाते. ह्या प्रक्रियेस मासिकपाळी असे म्हणतात. प्रत्येक स्त्रीनुसार हा कालावधी निरनिराळा असू शकतो,परंतु साधारणतः ३ ते ७ दिवस स्त्रीमध्ये रक्तस्त्राव सुरु राहतो. दोन मासिक पाळीच्या दरम्यान २८ दिवसांचा कालावधी असतो. शारीरिक दृष्ट्या प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. त्याचप्रकारे प्रत्येक मुलीची मासिक पाळी देखील वेगळी असते. मुलींच्या मासिक पाळीचा कालावधी कमी-जास्त असू शकतो. काही स्त्रियांचा हा काळ  २०-३५ दिवस असू शकतो.

नियमित मासिकपाळी निरोगीपणाचे लक्षण

नियमित मासिकपाळी हे महिलमधील संप्रेरकांचे कार्य योग्य आणि सुरळीत चालू असल्याचे लक्षण आहे.नियमित येणारी मासिकपाळी ही त्या स्त्रीची प्रजननसंस्था आणि क्षमता उत्तम असल्याचे दर्शवते. नियमित येणारी मासिकपाळी ही फक्त एक शाररिक प्रक्रिया असून ती वेळच्या वेळी येणेच योग्य आहे. सर्व अवयवांचे काम व्यवस्थित चालू असल्याची ती पावतीच आहे. म्हणूनच मासिक पाळीस निसर्गाचे वरदान मानतात. 

 मासिकपाळी येणे हे एक वरदान

मासिकपाळीला बऱ्याचदा अपवित्र, मानण्यात येते परंतु मासिकपाळी म्हणजे माणसाचा वंश चालविण्याचे महत्त्वाचे कार्य स्त्रीच्या हातून पार पाडण्याची निसर्गाची योजना आहे. मासिकपाळी सुरु झाली म्हणजे मुलीची माता बनण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी सुरु झालेली असते. प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील ती एक महत्त्वाची घटना असते. सर्व अवयवांचे काम व्यवस्थित चालू असल्याची ती पावतीच आहे. म्हणूनच मासिक पाळीस निसर्गाचे वरदान मानतात आणि मानावे....

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon