Link copied!
Sign in / Sign up
5
Shares

मासिकपाळी दरम्यान वर्गात मिळालेल्या वाईट वागणुकीमुळे मुलीने आत्महत्या केली

महिन्यातील त्या वेळी आपल्या कपड्यांवर डाग पडू नयेत; या भीतीने आपण बहुतेकदा गडद कपडे परिधान करतो. तरीसुद्धा कधीकधी पॅडची अयोग्य ठेवण वा जास्तीचे वाहून जाणे; यांमुळे आपल्या कपड्यांवर नजरेत येतील असे डाग पडतात. यापेक्षाही लाजिरवाणी गोष्ट म्हणजे- आपली तयारी नसते तेव्हाच पाळी येणे! पॅडही उपलब्ध नसतात आणि आसपास कुठलेच मेडिकल स्टोअरही नसते.

(सर्वच नाही; पण) पुष्कळ महिलांनी त्यांच्या पौगंडावस्थेत किमान एकदातरी पाळी असताना आपल्या कपड्यांवर डाग पडण्याचा अनुभव घेतला असेलच! आपण लहान असतानाच्या तुलनेत जरी आता आपल्याला पाळी हाताळण्याची सवय झालेली आहे; तरी कपड्यांवर डाग पडणे हे आजही आपल्याला शरमिंदा करून टाकते. तमिळनाडूतील या बारा वर्षांच्या मुलीचेही कपड्यांवर असेच डाग पडले. पण त्यानंतर काय झाले, हे वाचून तुमच्या रागाला सीमा राहणार नाही.

ही घटना ऑगस्ट २०१७ मध्ये घडली. तिच्या बरोबरच्या मुलीने सांगितले की, तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग पडले आहेत. तिने आपल्यातील बहुतेक जणींनी जे केले असते; तेच केले- तिने मदतीची याचना केली. तिला मदत करण्याऐवजी, ज्या शिक्षिकेला तिने संपर्क केला होता; तिनेच तिला वाईट वागणूक दिली  "त्या शिक्षिकेने विचारही केला नाही की, त्या वर्गात मुलेही आहेत! तिने माझ्या मुलीला तिच्या सलवारचा वरचा भाग वर करायला सांगितला आणि डस्टर चा कपडा पॅड म्हणून वापरायला दिला." तिच्या आईने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मग त्या मुलीला वर्गाबाहेर उभे केले गेले.या घटनेने त्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. 

तिने एका दिवसानंतरच २५ फूट उंच इमारतीवरून उडी मारली. तिच्या आत्महत्येच्या चिठ्ठीमध्ये तिने इतकाच उल्लेख केला की, तिच्या शिक्षिकेने तिचा खूप छळ केला; पण तिने त्या पाळीच्या घटनेचा उल्लेख केला नाही. भूतकाळातही त्या शिक्षिकेने गृहपाठ न केल्याबद्दल त्या मुलीला मारले होते. तिच्या सहाध्यायींकडून या पाळीच्या घटनेची माहिती तिच्या पालकांना मिळाली. संतप्त होऊन पालकांनी त्वरित त्या शिक्षिकेविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली.

अवघ्या काही काळाअगोदरच उत्तर प्रदेशातील एका शाळेतील वॉर्डनने बाथरूमच्या फरशीवर रक्ताचे डाग पाहून ७० मुलींना त्यांचे पूर्ण कपडे काढून त्यांची तपासणी करण्याची मागणी केली होती. मुलींनी आज्ञा पाळण्यास नकार दिला; तेव्हा तिने त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली. क्रोधित पालकांनी याबाबत निदर्शने केली. परिणामी वॉर्डनचे निलंबन झाले.

या सर्व समस्यांच्या तळाशी आपल्या समाजातील एक मूलभूत समस्या आहे. पुष्कळ लोकांना मासिक पाळी नेमकी का होते; हेच माहिती नसते. जर आपणाला याबाबत प्रगती हवी असेल; तर आपल्या विचारसरणीत बदल करायला हवा. चांगल्या दर्जाची शिक्षणव्यवस्था हा या समस्या सोडवण्याचा एक मार्ग आहे. पण प्रथम आपल्याला आता जे शिक्षण व्यवस्थेत आहेत; त्यांना या छोट्याछोट्या घटना कशा हाताळाव्यात याची माहिती आहे ना, याची खात्री करून घ्यायला हवी.

विद्यार्थिनींना अपमानित किंवा वाईट वागणूक देण्याऐवजी  शाळा, हॉस्टेल्स आणि सार्वजनिक ठिकाणांवर सॅनिटरी पॅड देणारी केंद्रे उपलब्ध करून द्यायला हवीत; म्हणजे स्त्रियांना मासिक पाळीविषयक स्वच्छता राखणे अधिक सोपे जाईल. कचरापेट्याही सर्वत्र उपलब्ध असाव्यात; म्हणजे वापरलेल्या नॅपकिन्सची योग्य विल्हेवाट लावता येईल. विद्यार्थिनींना या पॅड्सच्या मशीन्स कशा वापराव्यात; यांचे शिक्षण द्यायला हवे. तसेच सार्वजनिक ठिकाणांवर प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी महिलांना त्या मशीन्सचा वापर करण्यात सहायता करायला हवी.

मासिक पाळी आणि त्याविषयक आरोग्य यांबाबत जागरूकता निर्माण करणारी शिबिरे आयोजित केली जावीत; म्हणजे लोक मासिक पाळीबाबत पूर्णपणे सज्ञान होतील. जर मासिकपाळी नसती; तर तुम्ही आज हे वाचत बसायला जिवंत नसता. ती एक जन्मदायी प्रक्रिया आहे; लहान मुलींना अपमानित करणारी घृणास्पद गोष्ट नव्हे!

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon