Link copied!
Sign in / Sign up
9
Shares

मुलींच्या मासिक पाळीविषयी जाणून घ्या. . .


      खूप स्त्रियांची पाळी त्या त्या तारखेला येत नाही. ती ३ ते ४ दिवसांनी येते किंवा येताच नाही. आणि ही समस्या गरोदर होणाऱ्या मातांना जास्त त्रास देते. आणि ह्यामुळे ती स्त्री अस्वस्थ आणि खूप नैराश्य येते. आणि तिला एकच प्रश्न पडतो की, नेमक्या कोणत्या कारणाने माझी मासिक पाळी आली नाही. तेव्हा ह्याविषयी काही चर्चा करू जेणेकरून त्याच्या समस्या कोणत्या ते लक्षात येईल.

१) योनीमार्गातून किंवा गर्भाशयाच्या पोकळीतून येणारा पांढर्‍या किंवा पिवळ्या रंगाचा चिकट द्रव वाहणे म्हणजे अंगावरून पांढरे जाणे असे म्हटले जाते. (ह्याविषयी आम्ही एक ब्लॉग अगोदर लिहला आहे) मासिक पाळी येण्याआधी किंवा बीजकोषातून बीजांड बाहेर पडण्याच्या वेळी या स्त्रावात वाढ होते. त्याशिवाय लैंगिक उत्तेजना यामुळेही अंगावर पांढरे जाऊ शकते. पण काहीवेळा अतिप्रमाणातील अंगावर जाणे हे अयोग्य आहे. पिवळ्या किंवा दुधी रंगाचा घट्ट स्त्राव असेल तर ते संसर्ग झाल्याचे लक्षण आहे. अशा स्त्रावात पू समाविष्ट असू शकतो.

२) पॉलीसिस्टीक ओव्हेरियन डिसीज प्रत्येक शंभरपैकी दहा स्त्रियांना ह्या आरोग्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. पीसीओसी ही समस्या हार्मोन्स म्हणजेच संप्रेरकांच्या असंतुलनामुळे होते ज्यामध्ये टेस्टॉस्टेरॉनची पातळी अचानक वाढते आणि या विकाराची काही लक्षणे दिसू लागतात.

३) ह्याचा मासिक पाळीवर असा परिमाण होतो : पीसीओसी असणार्‍या महिलेमध्ये अचानक वजनवृद्धी होताना दिसते तसेच ओटीपोटाच्या वेदना, नैराश्य आणि अनियमित मासिक पाळी असे त्रास होतात. काही रुग्णांमध्ये पीसीओडीमुळे गर्भधारणा होण्यासही अडचणी निर्माण होतात. (ह्याविषयी PCOD म्हणजे काय?)

४) मासिक पाळीत काही स्त्रियांना अतिरक्तस्त्राव होतो. मासिक पाळी नियमित येते; परंतु प्रचंड प्रमाणात रक्तस्त्राव होतो. काही स्त्रियांमध्ये सहा ते सात दिवस अंगावरून जाते त्यामुळे मासिक पाळीत अशक्तपणा आणि इतरही आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

५) रक्तस्त्रावातील दुर्गंधी अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान आणि नंतर रक्तस्त्रावास दुर्गंध येण्याचा त्रास होतो. स्वच्छता बाळगूनही अनेकदा हा त्रास होत असल्याचे आढळून आले आहे. सर्वसाधारणपणे योनीस्त्रावाला कोणताही वास नसतो, पण वास येणारा रक्तस्त्राव हाच व्यवस्थित येणारी मासिक पाळी आणि चक्र बिघडलेली मासिक पाळी यातील फरक आहे. मासिक पाळीदरम्यान येणारा खराब वास ही गंभीर समस्या आहे. योनीमार्ग किंवा गर्भाशयात असणार्‍या संसर्गामुळे हा वास येऊ शकतो.

तुम्हाला ह्यापैकी जी समस्या येत असेल आणि ती का येते त्याचे उत्तर ह्या ब्लॉगमधून देण्याचा प्रयत्न करू. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon