Link copied!
Sign in / Sign up
21
Shares

मासिक पाळीत अतिस्त्राव असताना, तुम्ही सुद्धा या चुका करता का?

     मासिक पाळी सगळ्याच महिलांसाठी वेदनादायक असते. दर महिन्याला या ४ दिवसात तणाव, चिडचिड आणि कंबरदुखी अशा अनेक गोष्टींमधून तुम्ही जाता. या काळात शरीरात काही नैसर्गिक बदल घडत असतात. या बदलांचा परिणाम म्हणून तुमच्या मूडमध्ये फरक पडतो. नेहमी साधी साधी वाटणारी कामे सुद्धा नकोशी वाटतात. मासिक पाळीत काही स्त्रियांमध्ये तणाव, अपचन, ब्लोटिंग अशा समस्या आढळतात.

तेंव्हा मैत्रिणींनो तुम्ही या काळात स्वतःची योग्य काळजी घेणे आणि स्वच्छता राखणे तितकेच महत्वाचे आहे. सामान्यपणे स्त्रियांकडून या काळात घडणाऱ्या चुका नकळतपणे आरोग्यावर देखील परिणाम करत असतात. या लेखात आपण कोणत्या गोष्टी करणे टाळावे याविषयी माहिती घेणार आहोत.

   १ . असुरक्षित संभोग.

मासिक पाळी सुरु असतांना कंडोम न वापरता संभोग (सेक्स) करणे तुमच्यासाठी असुरक्षित असू शकते. या द्वारे संसर्ग होण्याचा धोका असतो. तेंव्हा रक्तस्त्राव पूर्णपणे थांबल्याशिवाय कॉंडोम न वापरता संभोग करणे टाळा. शक्य तितके स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करा.

२. पॅड्सची चिंता करू नका.

रक्तस्त्राव जास्त असतांना जास्त वेळ एकाच पॅड वापरणे योग्य नसते. यामुळे संसर्ग होतो तसेच दुर्गंधी देखील येते. संसर्ग होण्यापासून वाचण्यासाठी या काळात तुम्ही दर ३ तासांनी पॅड बदलणे गरजेचे आहे. तुम्हाला कम्फर्टेबल वाटण्यासाठी तुम्ही तुमच्या सोयीनुसार पॅडची लांबी निवडा. वापरलेल्या पॅडला कागदात गुंडाळून त्याची योग्य विल्हेवाट लावणे देखील तितकेच महत्वाचे आहे.

३. जेवणाच्या वेळा चुकवू नका.

मासिक पाळीच्या काळात स्त्रीचे शरीर कमजोर होते. रक्तस्त्राव चालू असतांना शरीराला उर्जेची अवशक्यता असते तेंव्हा या काळात जेवण चुकवणे अत्यंत चुकीचे आहे. दररोज तुमच्या वेळेनुसार योग्य आणि पोषक आहार या काळात घ्या. तुमच्या शरीरातील उर्जा टिकवण्यासाठी आहारावर लक्ष केंद्रित कारणे गरजेचे असते. अनेकदा स्त्रिया कामात व्यग्र असतांना जेवण चुकवतात किंवा फस्त फूड खातात. अशाने तुम्हाला मासिक पाळीत होणाऱ्या वेदना अजून वाढतील. तेंव्हा मैत्रिणींनो, स्वच्छतेसोबत तुमच्या आहाराला प्राधान्य द्यायला विसरू नका.

४. कपड्यांची योग्य निवड करा.

मासिक पाळीत तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटणे साहजिक आहे. आहेर जाणार असाल तर तंग किंवा हलक्या रंगाचे कपडे घालणे टाळा. तंग कपड्यांमुळे तुम्हाला अजूनच असहज वाटेल आणि डागांची भीती असेल तर पांढरे, पिवळे किंवा गुलाबी असे हलके रंग घालणे तर नकोच. तुमच्या सोयीप्रमाणे तुम्हाला सहज वाटेल असे सैल कपडे घाला.

५. जास्त काम करणे टाळा.

रक्तस्त्राव जास्त असेल तर शक्यतो धावणे. जड वस्तू उचलणे, व्यायाम किंवा जास्त थकवणारे काम करणे यापासून दूर राहा. यामुळे तुमच्या कंबरदुखी, पाठदुखी यांच्या वेदना वाढतील शिवाय तुमची उर्जा खर्च झाल्यामुळे तुम्हाला जास्तीचा थकवा येऊ शकतो. पुरेशी झोप आणि आराम या काळात महत्वाचा आहे.

६. थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग करू नका.

मासिक पाळीत जर तुम्ही वॅक्सिंग किंवा थ्रेडिंग करण्याचा विचार करत असाल तर ते पूर्णतः चुकीचे आहे. या काळात तुमची त्वचा नेहेमीपेक्षा जास्त संवेदनशील झालेली असते तेंव्हा त्वचा ओढली जाईल अशा गोष्टी तुम्ही करणार असाल तर तुम्हाला नक्कीच जास्त दुखेल. तेंव्हा तुम्ही तुमची ब्युटीपार्लरची अपोइन्त्मेन्त मासिक पाळीच्या दिवसात असेल तर ती पुढे ढकललेली बरी. 

याशिवाय जर तुम्हाला अतिरक्तस्त्राव होत असताना काही अडचणी येत असतील तर शकतो आराम करा आणि घरातच रहा. तुम्ही स्वतची काळजी घेणे तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. तुमच्या मनात काही शंका असतील तर तुमच्या डॉक्टरांना विचारण्यास अजिबात संकोच करू नका.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon