Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

मासिक पाळीत कापड किंवा सॅनिटरी पॅड ह्यांच्यामध्ये फरक काय आहे ?

       कापड वापरणे अतिशय सोपे आहे व आपल्या पूर्वीच्या पिढ्यांनी कापडच वापरले आहे. पण आजच्या वेळी कापड धुणे, सुकवणे आणि पाळी संपल्यानंतर ती व्यवस्थित जपून ठेवणे ही गोष्ट आजच्या काही स्त्रियांना कठीण वाटत असते. पण एकदा त्याची सवय झाली की तो आयुष्यातला एक भाग बनतो.

पुन्हा वापरता येणारी पॅड्स बद्दल काही सामान्य प्रश्न 

१) ह्या पॅडला किती वेळ वापरता येते आणि किती तासांनी बदलता येईल

कुठल्याही साधारण पॅड्स सारखेच हा कालावधी तुमच्या रक्तस्त्रावावर आणि पॅडच्या शोषणक्षमतेवर अवलंबून आहे. साधारण ३-७ तासांनी पॅड्स बदलले पाहिजे. पॅड्स वेगवेगळ्या आकारात उपलब्ध आहेत. जास्त स्त्राव असेल त्या दिवशी मोठे/लांब व जास्त शोषून घेणारे पॅड्स वापरावेत.

२)  ह्या पॅड्सला वास येत असतो का ? 

मासिक पाळीच्या स्त्रावाला सौम्य वास असतो. तुमच्या जीवनशैलीनुसार म्हणजे आहार, व्यायाम इत्यादी गोष्टींचा त्यावर परिणाम होतो. डिस्पोझेबल सॅनिटरी पॅड्सना कुबट दुर्गंध येतो कारण रक्तस्त्राव पॅड्समधील रासायनिक पदार्थांच्या संपर्कात येतो. मासिक पाळीचा कप / कापडी पॅड्सने तुम्हाला रक्तस्रावाचा मूळ वास लक्षात येईल.

3) कापडी पॅड्स आरोग्यदायी आहे ना? 

होय, पूर्णतः. कापड वापरणे मुळात हानिकारक नाही. पण व्यवस्थित धुणे, सुकवणे (शक्यतो उन्हात) व पाळी संपल्यानंतर स्वच्छ कोरड्या ठिकाणी ठेवणे महत्वाचे आहे. आधुनिक पॅड्स छान डिसाईन्स व उत्तम प्रतीच्या कपड्यात उपलब्ध आहेत. ते सहजपणे धुतल्या जातात व कुठलाही डाग त्यावर राहात नाही. 

४) डिस्पोसेबल सॅनिटरी नॅपकिनऐवजी कापडी पॅड्स का वापरावेत?

टीव्ही वरच्या सॅनिटरी नॅपकिन्स च्या जाहिराती आपल्याला त्यातील घटकांची माहिती देत नाहीत – खूप जास्त शोषणक्षमता असलेले पॉलीमर्स, ऍक्रेलिक आधारित जेल, रक्तस्त्राव बाहेर येऊ नाही म्हणून वापरला जाणारा थर – ह्या सगळ्या रासायनिक पदार्थामुळे खाज,पुरळ, त्वचा सोलवटणे इत्यादी प्रकार आपल्याला नवीन नाहीत. कितीतरी मुली व स्त्रिया वर्षानुवर्षे हे सगळे त्रास सहन करतात.

ग्रामीण भागांत विविध योजनांद्वारे मोफत सॅनिटरी नॅपकिन्स दिले जातात. अनेक तरुण मुली व महिला प्रती 10-12 तास पॅड बदलत नाहीत. शिवाय पॅड्स व टॅम्पॉन्सला शुभ्र, सुरेख पांढरा रंग देण्यासाठी पॉलीमर्सना ब्लीच केले जाते. ह्यासाठी क्लोरीनचा वापर करतात. ह्या प्रक्रियेत विषारी dioxin आणि trihalomethane तयार होते. हे सर्व लक्षात घेता शरीराचा अतिशय सवेंदनशील भाग पॅड्सच्या संपर्कात असल्याने तुमच्या आरोग्याला धोका आहे हे नाकारता येत नाही.

बंगळुरूच्या मॉमसाठी, खुशखबर .

टाईनी स्टेप नैसर्गिक घटक असणारे  फ्लोर क्लीनर लॉन्च करत आहे जे आपल्यासाठी, आपल्या बाळाला आणि आपल्या घरासाठी सुरक्षित आहे. तर मग आता  जंतू आणि रसायनयुक्त फ्लोर क्लीनर नाही म्हणा! प्रीलाँच ऑफरचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon