मासिकपाळीच्या वेळी होणाऱ्याजास्तीचा रक्तस्त्रावामागे ही कारणे असू शकतात.
मासिक पाळी ही नैसर्गिक येत असते. आणि प्रत्येक महिलेला येत असते. आणि ह्यावेळी त्या स्त्रीला किंवा मुलीला खूप अडचणी येत असतात. कारण बहुतेक स्त्रियांचे आणि मुलीचे ह्या मासिक पाळीच्या वेळी पोट दुखते, कंबर दुखते, मूड बदलून जातो, आणि खूप निराशा वाटायला लागते. आणि ह्या गोष्टी ह्या दरम्यान प्रत्येक स्त्री आणि मुलीला येत असतात, म्हणून ह्याबाबत खूप चिंता करून तुम्ही नैराश्य मध्ये जाऊ नका. तेव्हा ह्याबाबत काही महत्वाची गोष्ट ह्या ब्लॉगमधून समजून घेऊ.

१) ह्या दरम्यान आणखी एका गोष्टीची खूप त्रास होत असतो तो म्हणजे योनीतुन निघणारा रक्तस्त्राव (ब्लीडिंग) काही -काही स्त्री आणि मुलीला खूप मोठया प्रमाणात रक्तस्त्राव होत असतो. पण एखाद्यावेळी होत असेल तर ठीक आहे पण जर सतत होत असेल तर तुम्हाला त्याविषयी काहीतरी करावे लागेल. आणि जर तुम्हाला दिवसातून खूप वेळा पॅड बदलावे लागत असतील तर समजून घ्यावे की,मासिक पाळीच्या वेळी ह्या इतर कारणांनी खूप जास्त रक्तस्त्राव होत असतो काहीतरी समस्या नक्कीच आहे.

२) खूप स्त्रिया ह्या गर्भधारणा होऊ नये म्हणून गर्भनिरोधक गोळ्या घेत असतात. आणि ह्यामुळेही मासिक पाळीच्या वेळी रक्तस्त्राव होत असतो. ह्यानंतर काही गोळ्या आणि औषधीमुळे साईड इफेक्ट होऊन त्याचा परिणाम हा मासिक पाळीच्या रक्तस्राव वरती होत असतो. आणि जर ह्यावेळी तुम्ही नवीन गोळी किंवा औषध घ्यायला सुरुवात केले असेल आणि असा त्रास व्हायला लागला तर तुम्ही त्या गोळ्या आणि औषध एकदा डॉक्टरांकडून तपासून घ्या.

३) काही वेळेस तुमच्या गर्भाशयात सूज किंवा इन्फेक्शन येऊन जात असते. आणि ह्यावेळी त्या गर्भवती स्त्रीला रक्तस्रावची समस्या येऊ शकते. त्यामुळे अगोदरच्याही ब्लॉगमधून तुम्हाला सांगितले आहे की, अशा वेळी तुम्ही प्रसूतीतज्ज्ञाला जर भेटून समस्या सांगा.
४) कधी -कधी गर्भाशयात ट्युमर सुद्धा असू शकतो. आणि ह्या कारणाने सुद्धा रक्तस्राव होऊ शकतो. पण बऱ्याचदा हे ३० ते ४० पेक्षा जास्त वय असलेल्या स्त्रियांबाबत होत असते. त्यामुळे ह्या वेळी तुम्ही हीसुद्धा शक्यता तपासून घ्यावी. दुर्लक्ष करू नका.
५) मासिक पाळीच्या वेळी हार्मोनमध्ये बदल होणे सामान्य बाब आहे. पण काही स्त्रियांमध्ये हा बदल खूप वेगाने होत असतो. आणि त्यामुळे काही वेळेस रक्तस्त्राव होत असतो. आणि मोनोपॉज च्या एक वर्षाअगोदर खूप हार्मोन्स परावर्तित होत असल्याने खूप रक्तस्त्राव होऊ शकतो. म्हणून अशावेळी तुम्ही गॉयनोकोलॉजिस्टला भेटून ह्या समस्या सांगून द्या.
