Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

मासिक पाळीच्या सामान्य प्रश्नावर चर्चा ..... भाग २


मासिक पाळी विषयी सामान्य प्रश्न प्रत्येक मुलीला माहित असायला हवेत. कारण आपल्याकडे मासिक पाळी विषयी खूप मुलींना काहीच माहित नसते. आणि ती बिचारी एकदम वयात आल्यावर तिच्या शरीरात होणाऱ्या बदलांना घाबरून जाते. आणि ह्या वयात ती भेदरल्यासारखी होऊन जाते. तेव्हा ह्या लेखमालेतून तुम्हाला मासिक पाळी म्हणजे काय ? असे सामान्य प्रश्नावर माहिती देणार आहोत. ह्याबत तुम्हाला काय सुचवायचे असेल तर नक्कीच सांगा. 

* मुलगी वयात आल्यावर तिच्या शरीरात अनेक बदल घडतात. आणि तिच्यात हे बदल होत असताना तिलाही ह्या बदलाबाबत जाणीव व्हायला लागते. आपण हीच गोष्ट थोडं सायंटिफिक समजून घेऊ. ह्या रचनेत अनेक अवयव आहेत जसे की – अंडाशय (ovaries), अंडनलिका (fallopian tube), गर्भाशय, योनिमार्ग आणि योनी (. अंडाशये बदामाच्या आकाराची असतात व त्यात हजारो लहान लहान बीजांडे असतात. मासिक पाळीची सुरुवात म्हणजे मुलीचे स्त्रीमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया होय. परिणामी ती गरोदर राहून आई बनू शकते. ज्यावेळी मुलगी वयात येत असते त्यावेळी दर महिन्याला योनीमार्गातून अंदाजे ३ ते ५ दिवस रक्त वाहत असते. ह्यालाही शारीरिक क्रियेला मासिक पाळी असे म्हणतात.

१) मासिक पाळीत रक्तस्त्राव का होत असतो

मुलगी वयात आली की दर महिन्याला एक स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते. त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादनही तयार केले जाते. योग्य काळात स्त्री व पुरुषाच्या वीर्यातील पुरूषबीज व स्त्रीच्या गर्भाशयातील स्त्रीबीज यांचा संयोग होऊन गर्भ तयार होतो. पण ज्यावेळी हे स्त्रीबीज फलित होत नाही त्यावेळेस फलित ण झालेल्या बिजासहित आच्छादन बाहेर टाकले जाते. ते रक्ताच्या स्वरुपात योनीमार्गाद्वारे बाहेर टाकले जाते म्हणून हा रक्तस्त्राव होतो.

२) मासिक पाळीत काही काम करता येत नाही का?

मासिकपाळी चालू असताना पूर्ण विश्रांतीची अजिबात गरज नाही. अतिकष्टाची कामे करू नयेत. पण घरातील नेहमीची कामे करावीत. ज्यांना पोटदुखी किंवा कंबरदुखी याचा अधिक त्रास असेल किंवा अंगावरून जास्त जात असेल तर मात्र विश्रांती घ्यावी.

३) मासिक पाळी किती दिवसांनी येते ?

मासिक पाळी दर २८ दिवसांनी येते पण कोणाला २९/३० दिवसांनी तर काहींना २४/ २५ दिवसांनी असा थोडा फार फरक पडू शकतो. मासिक पाळी सुरु झाल्यानंतर सुरुवातीला ती अगदी नियमितपणे येईल असे नाही. त्यातही दोन दिवस अलीकडे-पलीकडे असा फरक पडू शकतो. पण पुढे काही दिवसांनी त्यात नियमितपणा येतो.

४) पाळी किती दिवस अंगावरून जाते ?

पाळी आल्यावर २ ते ६ दिवस अंगावर जाऊ शकते. सुरुवातीस त्यात थोडा अनियमितपणा असू शकतो व अंगावरही कमी जास्त प्रमाणात जाऊ शकते पण काही दिवसांनी त्यातही नियमितपणा येतो.

मासिक पाळी विषयीच्या लेखमालेतील हा दुसरा भाग आहे. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon