Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

मासिक पाळीच्या काही चुकीच्या गोष्टी

मासिक पाळी येणे म्हणजे काही पाप किंवा गुन्हा नाहीच. कारण खूप स्त्रियांच्या ह्याबाबत खूप चुकीच्या गैरसमजूती आहेत. आणि त्या समजुतीला अजूनही काही स्त्रिया चिकटून आहेत. पण खूप स्त्रिया ह्या चुकीच्या गैरसमजुतीहून बाहेर आल्या आहेत. तेव्हा तुम्हीही ह्यातून बाहेर या. कारण ही गोष्ट पाप किंवा चुकीची आहे असे कोणत्याच ग्रंथात आणि कुठेच सांगितले नाही. ही एक नैसर्गिक आणि आवश्यक असणारी गोष्ट आहे. तेव्हा ह्यामधून मुक्त व्हा आणि स्वतःला उत्साहित ठेवा. 

१)  पाळीच चक्र हे प्रत्येक स्त्रीच्या प्रकृतीवर अवलंबून असते. त्यात काही कमी जास्त होत असते. २० दिवसांपासून ते ३५ दिवसांदरम्यान केव्हाही मासिक पाळी येऊ शकते. मासिक पाळी  येण्यात काही दिवस उशीर झाला तर असं नाही की तुम्ही गर्भवती आहात. कारण काहीवेळा शरीरात काही बदल होण्यामुळे असे होत असते. जर पाळी येण्यास थोडाच उशीर झाला असेल तर घाबरण्याची गरज नाही. 

२)  ह्याविषयी आम्ही एक लेखच लिहला आहे तो तुम्ही वेबसाईटवर वाचू शकता. पाळीदरम्यान आपल्या जोडीदारासोबत समागम करणे पसंत करत नाहीत. पण मासिक पाळी असतांना समागम केल्यानं आपल्याला आडकाठी व  उबळपासून आराम मिळत असतो. संशोधकांच्या मते पाळीदरम्यान सेक्स केल्यानं वेदना कमी होतात.

३) आपण मासिक पाळीदरम्यान गर्भवती राहू शकता. ज्या महिलांचं मासिक चक्र 28 दिवसांहून कमीचं असतं, त्यांच्यात पाळीदरम्यान गर्भवती होण्याची शक्यता अधिक असते.

४)  मासिक पाळी दरम्यान जर तुम्हाला उबळ आल्यास त्यांचा संबंध आंबट खाद्यपदार्थांसोबत अजिबात नाही. मसालेदार जेवणानं पोट खराब होऊ शकतं. पण त्याचा पाळीतील वेदनांवर काही परिणाम होत नाही. 

५) पाळीदरम्यान व्यायाम त्रासाला कमी करतो. कारण व्यायाम स्नायूंमध्ये ऑक्सीजन पुरवठा सुधारतो, ज्यामुळं शरीराला आराम मिळतो. आणि व्यायाम शरीराला ताजेतवाने  व स्वस्थ बनवत असतो. 

६)  मासिक पाळीमध्ये शरीरातून रक्तस्त्राव होतो ज्यामुळं घाबरण्याचं कारण नाही.  एका दिवसात जवळपास चार चमचे रक्तस्त्राव होत असतो. आणि खूपच रक्तस्त्राव होत असेल तर आराम करायचा असतो. पण खूप रक्तस्त्राव होणे हे दुर्मिळ असते. म्हणून स्त्रियांनी ह्या दरम्यान आपली दैनंदिन कामे करू शकता. 

७) मासिक पाळीतील रक्त हे इतर रक्तासारखं सामान्यच असतं. आणि  आंघोळ केल्यानं, केस धुतल्यानं रक्तस्त्राव कमजोर होतो, असा समज आहे. मात्र असं काहीच नाहीय. मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आंघोळ करू शकता. अनेक लोकांना वाटतं की, कुमारीकांनी कॉटनचा वापर करू नये. त्यांनी कॉटनचा वार केला तर त्यांचं कौमार्य नष्ट होतं. पण याचा काहीही संबंध नाही. 

तेव्हा मासिक पाळीविषयी तुमच्या गैरसमजुती दूर करूया आणि स्त्रीला मोकळी, उत्साही, आत्मविश्वास असलेली बनवूया. #Bleedsafe 

ह्याविषयी तुमचे जेही मत असेल, चांगले किंवा वाईट ते तुम्ही ह्या लिंकवर जाऊन आम्हाला लिहू शकता. https://goo.gl/forms/ay3ws116o46FebBd2

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon