Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

जेव्हा पहिल्यांदा सोनम कपूरला मासिक पाळी येते ! आणि मासिक पाळी म्हणजे काय ?

      मासिक पाळीविषयी खूप लेख आम्ही दिली आहेत. पण हा विषय खूप मोठा आहेत. अजूनही मासिक पाळीविषयी खूप काही लिहिण्यासारखे आहे. पण काही स्त्रियांनी सांगितले की, मासिक पाळीविषयी पहिल्यापासून सविस्तर सांगा. आणि सध्या सोशल मीडियामध्येही मासिक पाळी आणि सॅनिटरी पॅड विषयी खूप बोलले जात आहे. तेव्हा ह्याविषयी आणखी चांगल्या व सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न. 

अभिनेत्री सोनम कपूरने एका कार्यक्रमात म्हणाली की, तिला १५ व्या वर्षीच मासिक पाळी आली होती.

‘माझ्या सर्व मैत्रिणींना माझ्याआधीच मासिक पाळी आली होती, त्यामुळे मी सुरुवातीला निराश झाली होती. माझ्यात काही कमी आहे का, असा प्रश्न मी आईवडिलांना विचारायचे. पण जेव्हा वयाच्या १५ व्या वर्षी मला पहिल्यांदा पाळी आली, तेव्हा मी खूप खूश झाले,’ असे सोनम म्हणाली. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये घेतली जाणारी काळजी आणि त्या दिवसांबद्दल असणाऱ्या काही समजुतींबद्दलही सोनमने काही गोष्टी स्पष्ट केल्या. अनेकांना या दिवसांत आराम करण्यास सांगितले जाते, पण आराम न करता काही काम करावे किंवा शारीरिक हालचाली करायच्या.’’ 

मासिक पाळी ही सामान्यतः सर्वच स्त्रियांच्या जीवनात येत असते. आम्हा अभिनेत्रींना सुद्धा ह्यातुन जावे लागत असते. म्हणून खूप ह्याबाबत निराश आणि मलाच हा त्रास होतोय असे वाटून घेऊ नका. उलट खूप खुश व्हा आनंदित व्हा. मीही माझ्या मासिक पाळीच्या वेळी आनंदित झाली होते. असे सोनम म्हणाली. 

१) मासिक पाळी कशी येत असते

एन्डोमेट्रिअम व रक्त गर्भाशयातून होणारे उत्सर्जनआणि त्यामुळे दर महिन्याला येणारी मासिक पाळी. मासिक पाळीची सुरुवात म्हणजे मुलीचे स्त्रीमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया होय. परिणामी ती गरोदर राहून आई बनू शकते.

आपण अगोदर स्त्री प्रजननसंस्थेची रचना कशी आहे ते घेऊ. ह्या रचनेत अनेक अवयव आहेत जसे की, अंडाशय (ovaries)अंडनलिका (fallopian tube) गर्भाशय (uterus) योनिमार्ग (cervix) आणि योनी (vagina). अंडाशये बदामाच्या आकाराची असतात व त्यात हजारो लहान लहान बीजांडे असतात, जी उघड्या डोळ्यांनी दिसत नाही.

२) मासिक पाळीच्या दरम्यान गर्भाशयाच्या भिंतींवर एन्डोमेट्रियम नावाचा जाड थर तयार होतो. याच वेळी अंडाशयातून एक बीजांड अंडनलिकेतून गर्भाशयात जाते. ह्या बीजांडाचा शुक्रजंतुशी संयोग झाल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता असते व एन्डोमेट्रियमचा थर गर्भाचे पोषण करतो. बीजांडांचा शुक्रजंतुशी संयोग झाला नाही तर एन्डोमेट्रियमच्या थराचा उपयोग नसतो. अशा वेळी हा थर व त्यात असलेले रक्त योनीद्वारे शरीराबाहेर टाकले जाते. ह्या प्रक्रियेस मासिक पाळी असे म्हणतात व ही प्रक्रिया ३-७ दिवसात पूर्ण होते.

 

३) दोन मासिक पाळीच्या दरम्यान २८ दिवसांचा कालावधी असतो. शारीरिक दृष्ट्या प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. त्याचप्रकारे प्रत्येक मुलीची मासिक पाळी देखील वेगळी असते. मुलींच्या मासिक पाळीचा कालावधी कमी-जास्त असू शकतो. काही मुलींना १५ दिवसात तर काहींना ३ महिन्याच्या कालांतराने पाळी येते. पाळी नियमित होण्यासाठी काही वेळ लागतो. पहिल्या वर्षांनंतर पाळी नियमित होणे गरजेचे आहे व स्त्राव प्रत्येक महिन्यात सारखे दिवस असला पाहिजे. पाळी साधारण २८ दिवसांच्या कालांतराने येते पण हा कालावधी २०-३५ दिवस असू शकतो.

तेव्हा मुक्तपणे तुमच्या मासिक पाळीविषयी बोला. बिन्दास्त तुमच्या पाळीविषयी बोला. #BleedSafe  With Tinystep मराठी.  

      साभार - hygieneandyou 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon