Link copied!
Sign in / Sign up
16
Shares

मासिक पाळी लवकर का येते ?


काही वेळेला काही स्त्रियांची मासिक पाळी लवकर का येत असते ? असा प्रश्न बऱ्याच स्त्रियांना पडत असतो. आणि मासिक पाळीच्या ह्या गोष्टीविषयी खूप गोंधळ असतो. ह्या अगोदरच्या ब्लॉगमधून बरीच ह्याविषयी माहिती दिलेली आहे. पण ह्यातही मासिक पाळी लवकर का येते ? व्हायचे उत्तर ह्या ब्लॉगमधून देणार आहोत.

१) मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येक महिलेला दर २८ दिवसांनी मासिक पाळी येणं अपेक्षित असतं. मात्र अनेकदा हे चक्र बिघडतं. बऱ्याचदा मासिक पाळी लवकर आली अशी अनेक स्त्रियांची तक्रार असते. असं झाल्यास महिला लगेच घाबरून जातात आणि डॉक्टरांकडे धाव घेतात. मात्र अशा परिस्थितीत घाबरून न जाता मासिक पाळी लवकर येण्याची कारणं समजून घ्या.

२) जर थायरॉईड, पीसीओएस (पॉलिस्टिक ओवरी सिंड्रोम) असे आजार असतील तर मासिक पाळी लवकर येण्याची शक्यता असते. कारण अशा परिस्थितीत शरीरातील हार्मोन्सवर परिणाम होतो ज्यामुळे मासिक पाळी लवकर येते. त्यामुळे महिलांना अशी परिस्थिती आढळल्यास स्त्रीरोगतज्ज्ञांची भेट घ्यावी.

३) अनेकदा वजन कमी करण्यासाठी आपण डाएट फॉलो करतो. डाएट फॉलो केल्यामुळे मासिक पाळी येण्याच्या वेळेत फरक पडतो. डाएटमुळे जर तुम्ही अचानक वजन कमी केलं तर मासिक पाळी लवकर येऊ शकते.

४) गर्भनिरोधक गोळ्यांचा मासिक पाळीवर परिणाम होतो. जर या गोळ्यांच्या वेळा दोन किंवा तीन वेळा चुकवल्या गेल्या तर मासिक पाळी लवकर येण्याची शक्यता असते. शिवाय काही ठराविक प्रकारच्या औषधांमुळेही मासिक पाळी लवकर येऊ शकते.

५) वयाची चाळीशी ओलांडली असेल तर तो तुमचा रजोनिवृत्तीच्या काळ असतो. महिलांना रजोनिवृत्ती येण्याच्या अगोदरच्या काळात मासिक पाळीच्या चक्रात बदल जाणवतात. शिवाय पाळीच्या दिवसांत स्रावातही फरक जाणवतो. त्यामुळे रजोनिवृत्ती येण्याच्या काहीकाळ अगोदर स्त्रियांना मासिक पाळी लवकर येते.  

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon