Link copied!
Sign in / Sign up
13
Shares

मासिक पाळी का येत नाही .........भाग २


सध्याच्या वेळी मॉम्स सुद्धा खूप काही न कामात व्यस्त असतात. जसे की, तान्ह्या बाळाची देखभाल, जर नोकरी करत असतील तर, घरातल्या कामात व्यस्त आणि ह्यामुळे त्यांच्या स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष दिले जात नाही. म्हणजे बऱ्याचदा आपल्या शरीरात काय बदल होत आहेत ह्याविषयी सुद्धा ते अनभिद्य असतात. आणि अचानक त्यांना लक्षात येते की, आपल्याला मासिक पाळीची अनियमितता आहे. पण ही समस्या जर १ किंवा २ वेळेस आली तर ठीक आहे पण ती नेहमी - नेहमी आली तर ती गोष्ट चिंतेची होऊन जाते.

१) मानसिक ताण - तणाव

       मासिक पाळी अनियमित होण्याचे कारण हे मानसिक तणाव आहे. काय कारण आहे नेमके मानसिक ताण तणावाचे. तर ह्याचा परिणाम तुमच्या हार्मोन्सवर पडत असतो. आणि त्या हार्मोन्सवरील मेंदूच्या हाइपोथैलेमस ह्या भागाला प्रभावित करत असतो. आणि हाच भाग तुमच्या मासिक पाळीच्या चक्राला नियंत्रित करत असतो. त्यामुळे खूप काळजी किंवा चिंता करत बसू नका. आणि खूप नैराश्य आले असेल तर तुमच्या आवडीच्या गोष्टी करा.

२) रोजच्या दिनचर्येत बदल

काही स्त्रिया जॉब करत असतात आणि त्यामुळे त्यांची दिनचर्या खूप बदलत असते. आणि जरी तुम्ही जॉब करत नसाल पण तरी सुद्धा बाळाची देखभाल करणे त्यासाठी रात्री - बेरात्री उठणे, त्यामुळे तुमचीही दिनचर्या विस्कळीत होत असते. तेव्हा ह्यामुळे झोप होत नाही आणि ह्याचा परिणाम हार्मोन्स असंतुलनावर होऊन जातो. आणि मासिक पाळीमध्ये अनियमितता येऊन जाते.

३) गर्भनिरोधक गोळ्या

जर तुम्ही गर्भनिरोधक घेत असाल तर त्याचा परीनं तुमच्या मासिक पाळीवर १०० टक्के परिणाम होत असतो. आणि खूप स्त्रियांनी ह्याविषयी तक्रार सुद्धा केली आहे.

४) प्रेग्नेंसी

काही वेळा प्रेग्नेंसी मुळे सुद्धा मासिक पाळी ही मिस होऊन जात असते. कारण जर तुम्ही विना प्रोटेक्शन संबंध ठेवले आणि तुमची मासिक पाळी मिस झाली तर तपासून घ्या तुमच्या गरोदरपणाला. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon